दोन गटात तुंबळ हाणामारी होउन त्यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम लोणी (लव्हाळा) येथे रविवारी रात्री घडली आहे . गावातील काही घरांची व दुचाकींची जाळपोळ करण्यात करण्यात आल्याचे समजते. पोलीसाने 10 आरोपींना अटक केले आहे.
जाळपोळ प्रकरणी शारदा दहिमल भोसले हिने दिलेल्या फियार्दीत नमूद केले आहे की , माझी मुलगी किराणा दुकानावर सामान आणण्यासाठी गेली असता अतूल देशमुख याने शिवीगाळ केली त्यावरुन वाद झाल्यानंतर आमच्या घरांची नासधूस करुन जाळपोळ करून लाठ्या काठ्यांनी मारहाण केली . त्यात माझ्या हाताला मार लागला. यावरुन ठाणेदार संग्राम पाटील यांनी राजू दत्तात्रय देशमुख, महादू शिवाजी देशमुख , विठ्ठल शिवाजी देशमुख, अतुल देशमुख व इतर सात ते आठ लोकांवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले असून घटना स्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया , अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पंखाले , उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावर , ठाणेदार संग्राम पाटील , पोउपनि दीपक राणे यांनी भेट दिली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
भुकेने व्याकुळ झाले पोलीस कर्मचारी
कधी आणि कुठे धावून जावे लागेल हे पोलिसांसाठी काही निश्चित नसते, अनेक वेळी आपले कर्तव्य पार पाळत असतांना पोलिस बांधवांना उपाशी ही राहावे लागतात.काही अशीच परिस्तिथि आज दिसून आली. आमच्या प्रतिनिधीने लोणी गावात जावून घटनास्थळी भेट दिली असता तेथे काल रात्री पासून कर्तव्यवर तैनात काही पोलीस कर्मचारी दिसले व सर्वांचे चेहेरे उतरले होते ते सर्व भुकेने व्याकुळ झालेले दिसून आले.
जर पोलीस वेळेवर पहोचले नसते तर ......
Post a Comment