Latest Post


बुलडाणा - 5 ऑक्टोबर 

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरातील राजकारण तापले होते.अनेक सिने कलाकार ड्रग्स घेतात याची चौकशी सुरु झाली आहे.करोडो चाहत्यांना आपल्या अदाकारीने भुरळ पाडणार्‍या परंतु ड्रग्स प्रकरणात मलीन झालेल्या कलाकारांना आता आझाद हिंद संघटनेच्या वतीने "ड्रग्जभूषण पुरस्कार" जाहीर करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर ड्रग्ज प्रकरणातील कलाकारांना मिळालेले भारताचे सर्वोच्च पुरस्कार त्यांनी प्रकरणातून निर्दोष मुक्तता होईपर्यंत परत करावे. अन्यथा अशा कलाकारांच्या चित्रपटांवर बंदी घालून चित्रपटांचे प्रदर्शन थांबविण्यात येईल असा इशारा आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अड.सतीशचंद्र रोठे यांनी बुलडाणा येथे दिला आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- कोरोना महामारीला घाबरुन न जाता कोरोनाशी सामना करायला शिका कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय अधिकार्याचा सल्ला घेवुन उपचार सुरु करा असे अवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केले.  माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजने अंतर्गत  जिल्हा परिषद अहमदनगर पंचायत सामिती श्रीरामपुर  व बेलापुर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने व बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या पुढाकारातुन आज पासुन बेलापुरात मोफत रँपीड चाचणी सुरु करण्यात आली त्या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की कोरोना विषयी नागरीकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भिती आहे आपला जिव अनमोल आहे त्यामुळे भिती न बाळगता तपासणी करुन घ्यावी योग्य व वेळेवर उपचार मिळाल्यास कोरोना बरा होवु शकतो असेही नवले म्हणाले या वेळी बोलताना बेलापुर प्राथमिक आरोग्य केद्रांचे आरोग्याधिकारी डाँ देविदास चोखर म्हणाले की आता गावात असलेले रुग्ण शोधुन त्यांच्यावर वेळेवर उपचार होणे गरजेचे आहे आपल्या केंद्रात आज पासुन दररोज २५ रुग्णांची तपासणी केली जाणार आहे गरज पडल्यास ही मर्यादा ५० रुग्णापर्यत वाढविण्यात येईल प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९७ तपासण्या करण्यात आल्या त्यात १० रुग्ण पाँजिटीव्ह असल्याचे उघड झाले असुन त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवतात अशा रुग्णांनी आपणहुन तपासणी करुन घ्यावी असे अवाहनही डाँ चोखर यांनी केले आहे या वेळी पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे बेलापुर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा जेष्ठ पत्रकार विष्णूपंत डावरे प्रसाद खरात आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँ हेमंत निर्मळ प्रशांत गायकवाड संतोष निर्मळ तान्हाजी गडाख गणेश टाकसाळ राम पौळ मास्टर हुडे सुहास शेलार पुरुषोत्तम भराटे पोलीस पाटील अशोक शरद पुजारी  प्रधान किशोर कदम मोहसिन सय्यद आदि उपस्थित होते या वेळी विष्णूपंत डावरे देविदास देसाई शरदा पुजारी दिपक कदम कलेश सातभाई यां सर्वांची रँपीड तपासणी करण्यात आली असुन सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे डाँ चोखर यांनी सांगितले  कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई  यांनी केले तर डाँ हेमंत निर्मळ यांनी आभार मानले.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता विना मास्क आपण जर स्वस्त धान्य दुकानात रेशन घेण्यासाठी गेला तर आपल्याला रिकाम्या हाताने परतावे लागणार आहे नो मास्क नो रेशन असा निर्णय जिल्हा धान्य दुकानदार संघटनेने घेतला असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे                          सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असुन स्वस्त धान्य दुकान चालकही कोरोनाच्या विळख्यात सापडलेला आहे अनेक दुकानदारांना कोरोनाची बाधा झालेली आहे संगमनेर , राहुरी , पाथर्डी , श्रीरामपुर , कोपरगाव , नेवासा या तालुक्यातील दुककानदारांना कोरोनाची बाधा झाली आहे . अनेक जण त्यातुन सुखरुप घरी परतले आहेत तर काही दुकानदारावर अजुनही उपचार सुरुच आहेत काहींना तर वेळेवर बेड पण मिळाले नाही रेशन दुकानातुन धान्याचे वाटप करत असताना येणार्या प्रत्येक कार्डधारकाचा अंगठा हातात धरुनच पाँज मशिनवर ठेवावा लागतो त्या नंतरच तो अंगठा जुळतो हे करत असताना कोण व्यक्ती कशी असेल ते ही सांगता येत नाही दुकानदाराने जरी काळजी घेतली तरी एखादा बाधीत रुग्ण आल्यास संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे रेशन खरेदी करण्यासाठी येणार्या ग्राहकाने देखील आपली व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहीजे या संकट काळात सर्व जण घरीच बसलेले असताना धान्य दुकानदार हा जिव मुठीत धरुन धान्याचे वाटप करत होता  हे करत असताना राज्यातील ३५  दुकानदारांना आपला जिव गमवावा लागला आहे आता प्रत्येकाला आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी ओळखुन नियमांचे पालन करुनच सर्व कामे करावी लागणार आहे  त्यामुळे प्रत्येकाने मास्क घालुनच घराबाहेर पडावे आता रेशनचे धान्य खरेदी करीता येणार्या ग्राहाकासाठी मास्क सक्तीचे केले जाणार आहे  आता या पुढे नो मास्क नो रेशन ही संकल्पना सर्व दुकानदार राबविणार असुन रेशनचे धान्य खरेदीसाठी येणार्या प्रत्येक व्यक्तीने मास्क घालुनच धान्य घेण्यासाठी यावे असे अवाहनही अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, विश्वासराव जाधव , बाळासाहेब दिघे ,  सुरेशराव उभेदळ , ज्ञानेश्वर वहाडणे , गणपतराव भांगरे , गजानन खाडे , कैलास बोरावके , बजरंंग दरंदले ,माणिक जाधव , बाबा कराड , रावसाहेब भगत , बाबासाहेब ढाकणे , मोहीते पाटील आदिंनी केले आहे.


बुलडाणा - 4 ऑक्टोबर बुलडाणा जिल्हा हा अस्वलांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. पोषक वातावरण असल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अस्वलांचे वास्तव्य आहे.अधून मधून अस्वल व मानवी संघर्षच्या घटना समोर येत असतात.अशीच एक घटना आज 4 ऑक्‍टोबरला चिखली तालुक्यातील करनखेड शिवारात घडली यात अस्वलाच्या हल्ल्यात एक 48 वर्षीय शेतमजूर जखमी झाला आहे.घटनेची माहिती मिळताच आरएफओ गणेश टेकाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुण गावकऱ्याशी चर्चा केली.

    या बाबत अधिक माहिती अशी की बुलडाणा वन परिक्षेत्रात येत असलेल्या करनखेड येथील रहिवासी राजेंद्र दिलीप सपकाळ शेतमजूर असून आज सकाळी ते गावालागतच्या गट क्र.56 मधील माणिकराव सपकाळ यांच्या शेतातून बैल घेऊन जात असतांना मोठी नालीत बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला आवाज ऐकून इतर लोकांनी आरडा ओरड केली असता अस्वल पळून गेला मात्र राजेंद्र सपकाळ जाखमी झाले.त्यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आरएफओ गणेश टेकाळे जिल्हा रुग्णालयात पोहोचले व जख्मीची विचारपुस केली. त्या नंतर आरएफओ गणेश टेकाळे,वन रक्षक विजय भोसले करनखेड गावात गेले व घटनास्थळचा पंचनामा केला. यावेळी गावाचे सरपंच,तंटामुक्ति अध्यक्ष व इतर ग्रामस्थ हजर होते.सद्या जख्मीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.


बुलडाणा - 4 ऑक्टोबरकोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागात हातभट्टी दारूचा महापूर वाहत आहे.याकडे दारूबंदी विभागाचा स्पष्टपणे दुर्लक्ष दिसून येत आहे. तर पोलीस प्रशासनाकडून अनेक ठिकाणी धाड टाकून गावठी दारूच्या अवैध हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहे.आज 4 ऑक्टोबर रोजी डोंगरखंडाळा शिवारात बुलडाणा ग्रामीण पोलिसच्या पथकाने दारुची एक हात भट्टी उध्वस्त केली आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम डोंगरखंडाळा लगतच्या जंगलात अवैधरीत्या दारूच्या हातभट्ट्या उभारुन गावखेड्यात दारू विक्री केली जात आहे.मागील 28 सप्टेंबर रोजी ज्ञानगंगा अभयारण्य लगतच्या जंगलात जाऊन 3 ठिकाणच्या दारू भट्ट्या ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त केले होते.आज 4 ऑक्‍टोबरला सुद्धा बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआई सुनील दौड,एएसआई बनसोडे, बीटजमादार जनार्दन इंगळे व दीपक डोळे यांनी डोंगरखंडाळा जवळ असलेल्या जंगलात धाड टाकून अवैद्य दारूची हातभट्टी उद्ध्वस्त करून त्याच्या साहित्याची तोडफोड केली आहे. याप्रकरणी आरोपी गणेश उत्तमराव पवार यांच्याविरोधात बुलढाणा ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या कडून 3 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त कण्यात आला आहे.


बुलडाणा - 4 ऑक्टोबरमागील 29 सप्टेंबरला कुवेत देशाचे राजे शेख सहाब अल अहेमद अल सबेर अल सहाब यांचे निधन झाल्याने शासनाने रविवारी एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. या दुखवट्यात राष्ट्रध्वज थोडा खाली उतरवून फडकवून सन्मान दिल जातो.मात्र बुलडाणा जिल्हा कारागृहात 4 ऑक्टोंबरला राष्ट्रध्वज हा खांबाच्यावरच पूर्ण ऊंची वर फडकत असल्याने कारागृह प्रशासनाचा दुर्लक्षितपणा दिसून आला आहे.

      रविवारी 4 ऑक्टोबरला सरकारने एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला त्यामुळे या दिवशी होणारे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले तसेच अप्पर जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी 1 ऑक्टोबर रोजी आदेश काढून राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवन्या बाबत सुचित केले. त्यामूळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांवर फडकविण्यात येणारा राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला गेला.मात्र आदेश  असतांनाही बुलडाणा जिल्हा कारागृहात आज 4 ऑक्टोबर रोजी राष्ट्रध्वज वरच फडकत असल्याचे दिसले. त्यामूळे एका देशाच्या राजाचा मृत्यूनंतरचा हा अवमान असल्याचे बोलल्या जात असून संबधितांवर कार्यवाहीची मागणी केली जात आहे.या विषयी जिल्हा कारागृह अधीक्षक संजय गुल्हाने यांच्याशी संपर्क साधन्यात आला परंतु त्यांनी फोन उचलला नाही,तर तुरुंग अधिकारी हिवाळे यांनी या राष्ट्रीय दुखवटयाबद्दल अनभिज्ञता दर्शवली व आम्हाला या बाबत काही माहित नाही,असे उत्तर देत आपली जबाबदारी झटकली.


बेलापुर (प्रतिनिधी  )- बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र बेलापुर या ठिकाणी सोमवार दिनांक ५ आँक्टोंबर  पासुन मोफत कोरोना चाचणी करण्यात येणार असुन नागरीकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन बेलापुर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे बेलापुर पत्रकार संघाच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम बेलापुर गावात सुरु करण्यात आली असुन बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील प्रत्येक नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहै  सोमवार दिनांक ५ आँक्टोंबर पासुन सकाळी १० ते १ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी कोरोना तपासणी करण्यात येणार आहे सध्या गावात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे आपणच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावयाची आहे त्या करीता ज्यांना कोरोनाची लक्षणे आहे असे वाटते त्यांनी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी ही टेस्ट करुनच घ्यावी अनेक जण भितीपोटी खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत व योग्य उपचार केले जाणार असुन बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँक्टर देविदास चोखर हे स्वतः तपासणी करणार आहे त्यामुळे नागरीकांनी घाबरुन न जाता आपली व आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे अवाहन बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सचिव देविदास देसाई खजिनदार सुनिल मुथा उपाध्यक्ष सुनिल नवले प्रा ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ शरद नवले मारुती राशिनकर  विष्णूपंत डावरे दिलीप दायमा शरद पुजारी अतिश देसर्डा भिमराज हुडे सदाशिव नागले रणजित श्रीगोड  दिपक काळे दिपक क्षत्रीय आदिंनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget