बुलडाणा - 4 ऑक्टोबर बुलडाणा जिल्हा हा अस्वलांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. पोषक वातावरण असल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अस्वलांचे वास्तव्य आहे.अधून मधून अस्वल व मानवी संघर्षच्या घटना समोर येत असतात.अशीच एक घटना आज 4 ऑक्टोबरला चिखली तालुक्यातील करनखेड शिवारात घडली यात अस्वलाच्या हल्ल्यात एक 48 वर्षीय शेतमजूर जखमी झाला आहे.घटनेची माहिती मिळताच आरएफओ गणेश टेकाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुण गावकऱ्याशी चर्चा केली.
या बाबत अधिक माहिती अशी की बुलडाणा वन परिक्षेत्रात येत असलेल्या करनखेड येथील रहिवासी राजेंद्र दिलीप सपकाळ शेतमजूर असून आज सकाळी ते गावालागतच्या गट क्र.56 मधील माणिकराव सपकाळ यांच्या शेतातून बैल घेऊन जात असतांना मोठी नालीत बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला आवाज ऐकून इतर लोकांनी आरडा ओरड केली असता अस्वल पळून गेला मात्र राजेंद्र सपकाळ जाखमी झाले.त्यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आरएफओ गणेश टेकाळे जिल्हा रुग्णालयात पोहोचले व जख्मीची विचारपुस केली. त्या नंतर आरएफओ गणेश टेकाळे,वन रक्षक विजय भोसले करनखेड गावात गेले व घटनास्थळचा पंचनामा केला. यावेळी गावाचे सरपंच,तंटामुक्ति अध्यक्ष व इतर ग्रामस्थ हजर होते.सद्या जख्मीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Post a Comment