बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र बेलापुर या ठिकाणी सोमवार दिनांक ५ आँक्टोंबर पासुन मोफत कोरोना चाचणी करण्यात येणार असुन नागरीकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन बेलापुर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे बेलापुर पत्रकार संघाच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम बेलापुर गावात सुरु करण्यात आली असुन बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील प्रत्येक नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहै सोमवार दिनांक ५ आँक्टोंबर पासुन सकाळी १० ते १ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी कोरोना तपासणी करण्यात येणार आहे सध्या गावात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे आपणच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावयाची आहे त्या करीता ज्यांना कोरोनाची लक्षणे आहे असे वाटते त्यांनी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी ही टेस्ट करुनच घ्यावी अनेक जण भितीपोटी खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत व योग्य उपचार केले जाणार असुन बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँक्टर देविदास चोखर हे स्वतः तपासणी करणार आहे त्यामुळे नागरीकांनी घाबरुन न जाता आपली व आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे अवाहन बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सचिव देविदास देसाई खजिनदार सुनिल मुथा उपाध्यक्ष सुनिल नवले प्रा ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ शरद नवले मारुती राशिनकर विष्णूपंत डावरे दिलीप दायमा शरद पुजारी अतिश देसर्डा भिमराज हुडे सदाशिव नागले रणजित श्रीगोड दिपक काळे दिपक क्षत्रीय आदिंनी केले आहे.
Post a Comment