Latest Post

बुलडाणा - 4 ऑक्टोबरमागील 29 सप्टेंबरला कुवेत देशाचे राजे शेख सहाब अल अहेमद अल सबेर अल सहाब यांचे निधन झाल्याने शासनाने रविवारी एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. या दुखवट्यात राष्ट्रध्वज थोडा खाली उतरवून फडकवून सन्मान दिल जातो.मात्र बुलडाणा जिल्हा कारागृहात 4 ऑक्टोंबरला राष्ट्रध्वज हा खांबाच्यावरच पूर्ण ऊंची वर फडकत असल्याने कारागृह प्रशासनाचा दुर्लक्षितपणा दिसून आला आहे.

      रविवारी 4 ऑक्टोबरला सरकारने एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला त्यामुळे या दिवशी होणारे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले तसेच अप्पर जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी 1 ऑक्टोबर रोजी आदेश काढून राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवन्या बाबत सुचित केले. त्यामूळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांवर फडकविण्यात येणारा राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला गेला.मात्र आदेश  असतांनाही बुलडाणा जिल्हा कारागृहात आज 4 ऑक्टोबर रोजी राष्ट्रध्वज वरच फडकत असल्याचे दिसले. त्यामूळे एका देशाच्या राजाचा मृत्यूनंतरचा हा अवमान असल्याचे बोलल्या जात असून संबधितांवर कार्यवाहीची मागणी केली जात आहे.या विषयी जिल्हा कारागृह अधीक्षक संजय गुल्हाने यांच्याशी संपर्क साधन्यात आला परंतु त्यांनी फोन उचलला नाही,तर तुरुंग अधिकारी हिवाळे यांनी या राष्ट्रीय दुखवटयाबद्दल अनभिज्ञता दर्शवली व आम्हाला या बाबत काही माहित नाही,असे उत्तर देत आपली जबाबदारी झटकली.


बेलापुर (प्रतिनिधी  )- बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र बेलापुर या ठिकाणी सोमवार दिनांक ५ आँक्टोंबर  पासुन मोफत कोरोना चाचणी करण्यात येणार असुन नागरीकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन बेलापुर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे बेलापुर पत्रकार संघाच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम बेलापुर गावात सुरु करण्यात आली असुन बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील प्रत्येक नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहै  सोमवार दिनांक ५ आँक्टोंबर पासुन सकाळी १० ते १ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी कोरोना तपासणी करण्यात येणार आहे सध्या गावात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे आपणच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावयाची आहे त्या करीता ज्यांना कोरोनाची लक्षणे आहे असे वाटते त्यांनी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी ही टेस्ट करुनच घ्यावी अनेक जण भितीपोटी खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत व योग्य उपचार केले जाणार असुन बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँक्टर देविदास चोखर हे स्वतः तपासणी करणार आहे त्यामुळे नागरीकांनी घाबरुन न जाता आपली व आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे अवाहन बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सचिव देविदास देसाई खजिनदार सुनिल मुथा उपाध्यक्ष सुनिल नवले प्रा ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ शरद नवले मारुती राशिनकर  विष्णूपंत डावरे दिलीप दायमा शरद पुजारी अतिश देसर्डा भिमराज हुडे सदाशिव नागले रणजित श्रीगोड  दिपक काळे दिपक क्षत्रीय आदिंनी केले आहे.


लाल बहादुर शास्त्री यांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि माजी पंतप्रधान म्हणून देशासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. 'जय जवान, जय किसान' या घोषमंत्रातून देशवासियांना प्रेरित केले. भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!करण्यात आले


भा ज पा शहर अध्यक्ष श्रीरामपूर मारूती भाऊ बिंगले यांच्या हस्ते महात्मा गांधी यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच 

माजी शहर अध्यक्ष श्रीरामपूर राजुभाऊ कांबळे यांच्या हस्ते लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले... या वेळी उपस्थित मान्यवर....

1)गणेश शेठ राठी (जिल्हा उपाअध्यक्ष भा ज पा)

2)मारूती भाऊ बिंगले (शहर अध्यक्ष श्रीरामपूर)

3)बंडुकूमार शिंदे( भा ज पा जिल्हा अध्यक्ष सांस्कृतिक)श्रीरामपूर 

राजाभाऊ कांबळे,युवा मोर्चा अध्यक्ष  विशाल यादव, अक्षय वर्पे, रूपेश हरकल, आनंद बुधेकर,ओंकार झिरेंगे, संदिप रणनवरे, रोहित मिसाळ,गणेश कुर्हे  , धिरज बिंगले आयान जहागीरदार, गणेश अभंग  आदी उपस्थित होते..


राहाता येथील सार्वजनिक मुस्लीम ईदगा यांच्या मालकीचे क्षेत्र सि.स.नं. १७४६ महाराष्ट्र शासन सनदीप्रमाणे ८४६७ चौ.मी. (८४ गुंगे) क्षेत्रामध्ये खा, बाळासाहेब विखे पाटील उर्दू हायस्कूलचे ५ खोल्या राहाता नगर परिषदेने पहाटे सुमारे ४ वाजेच्या सुमारास ३ जेसीबी व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी, नगरपालिका अध्यक्ष यांच्या समवेत अनाधिकृतपणे सार्वजनिक मुस्लीम इदगा जागेच्या आवारात प्रवेश करुन खा. बाळासाहे६ विखे पाटील उर्दू हायस्कूलच्या ५ खोल्या जेनीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केलेल्या आहेत. सदरील स्कूलच्या शाळेतील खोल्यामध्ये ३ काम्प्युटर, शालेय स्टेशगरी,मुलाचे खेळाचे साहित्य, नमाज पठणाचे साऊंड सिस्टीम, घरई, भांडी सुमारे 5 खोल्या बांधकाम पाडण्यात आले. तसेच समाजाचे इतर विविध प्रकारचे धार्मिक पठणाचे साहित्य आदि साहित्याचे त्या ठीकाणाहून साहित्य गायब केलेले आहे. राहाता नगर परिषदेने दि.११/०९/२०२० रोजी जा.क्र. ७८/२०२० रोजी नोटीस बजावलेली होती, त्याबाबत कायदेशीररित्या नोटीसला सार्वजनिक मुरलीम ईदगा यांच्या वतीने खुलासा दि. २५/०९/२०२० रोजी दिलेला होता. मात्र नगरपरिषदेने कुठलीही सुचना व कागदपत्रांची पडताळणी न करता बे कायदेशीररित्या सार्वजनिक मुस्लीम इंदगा जागेत अनाधिकृत प्रवेश करून शाळेची नुकसान करण्यात आली. सदरील सार्वजनिक मुस्लीम ईदगा शाळेचे बांधकाम हे समाजातील सर्व लोकांच्या सहभागातून करण्यात आलेले होते.समारे १० ते २० लाख रुपयांचे नुकसान करण्यात आलेले आहे. तरी संबंधित अधिका-यांनी बेकादेशीर सार्वजनिक मुस्लीम इदगा शालेय साहित्य, खोल्या. विद्यार्थ्यांची छापील स्टेशनरी, कॉम्प्युटर,बाह्या, पुस्तके, शाळेत असणारे इतर फर्निचर आदिंचे नुकसान करुन मुस्लीम बांधवांवर जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे तरी आपले स्तरारुन गुन्हा दाखल करण्यात येऊन संबंधितांनाकायदेशीर कारवाई करावी अशीमागणी श्रीरामपूर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतींने घटनेचा निषेध करून करण्यात आले या वेळी अहमदभाई जहागीरदार,आमदार लहू कानडे ,तोफिक शेख,जोएफ जमादार,व मुस्लिम समाज उपस्थित होते. 

अहमदनगर: नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक व सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला वादग्रस्त पोलीस अधिकारी विकास वाघ याच्याविरोधात अखेर मंगळवारी (दि.29) तरुणीचा छळ करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्या शोधासाठी दोन पोलीस पथके रवाना केली असल्याचे कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले. 2019 मध्ये तक्रार देण्याच्या निमित्ताने कोतवाली पोलीस ठाण्यात आलेल्या 26 वर्षीय तरुणीशी वाघ याने ओळख वाढविली. काही दिवसानंतर वाघ हा पीडित तरुणीच्या घरी गेला. तेथे तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वाघ याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने प्रतिकार केला तेव्हा वाघ याने तिला कंबरपट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच ही बाब कुणाला सांगितली तर तुझे कुटुंब संपवून टाकील  अशी धमकी दिली. त्यानंतर वाघ याने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्याची बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने 26 सप्टेंबर 2019 रोजी तिला तो राहत असलेल्या बंगल्यावर नेऊन मारहाण करत जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. या त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. ही बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी दिली तसेच तिच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर 11 सप्टेंबर 2020 रोजी वाघ याने पीडितेला जबरदस्तीने नगर तालुक्यातील मिरावली पाडावर नेऊन तेथेही तिच्यावर अत्याचार करीत जिवे मारण्याची धमकी दिली. असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत पिडीत तरुणीने म्हटले आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून वाघ याच्याविरोधात बलात्कार, मारहाण, जबरदस्तीने गर्भपात आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्या ठाण्यात निरीक्षक तेथेच दाखल झाला गुन्हाविकास वाघ कोतवाली पोलीस ठाण्यात निरीक्षक असताना विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. त्याचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि नगर येथील नाजूक प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरले होते.

श्रीरामपूर :-(प्रतिनिधी) असोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी बरकत अली शेख यांची निवड असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. चंद्रजीत यादव (यु. पी.) व राष्ट्रीय महासचिव उबेद शेख (दिल्ली) व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमीर खान (मुंबई) यांच्या नेतृत्वाखाली भारत भर गरुड झेप घेत असलेल्या भारतातील प्रत्येक राज्यातील प्राइवेट कर्मचारी यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणाऱ्याअखिल भारतीय प्राइवेट कर्मचारी कल्याण असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर सा. राजनीती समाचार चे संपादक व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.बरकत अली शेख यांची निवड झाली असून राष्ट्रीय महासचिव उबेद शेख (दिल्ली )व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमीर खान (मुंबई) यांनी या बाबतचे नियुक्ती पत्र प्रदान केले.

        शेख यांच्या निवडीबद्दल अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातून ॲड.हाजी मन्सूर भाई जागीरदार, ॲड.दारूवाला,

ॲड.शफीक शेख, ॲड.मुजीब शेख, ॲड. आरिफ शेख,

डॉ. मुकुंद शिंदे, डॉ.रवींद्र पांडे, डॉ.मुस्ताक निजामी, विलासराव पठारे, किशोर गाढे,बी. के. सौदागर, शेख फकीर मोहम्मद, अमीरभाई जागीरदार,सुभाषराव गायकवाड, उस्मानभाई शेख, मन्सूर पठाण, वाहाब खान, अनिल देवरे, सूर्यकांत गोसावी, सुखदेव केदारे, राजमोहम्मद शेख, कॉ. सुरेश पानसरे,अन्वर पठाण, रवींद्र केदारे,जावेद भाई शेख,शब्बीर कुरेशी,अक्रम कुरेशी,

कोपरे पाटील, गुलाब वायरमन, शकील शेख,जैनुद्दीन सय्यद, रमेश शिरसाठ,हाजी शकीलभाई शेख, इब्राहिम भाई शेख, राहुल गायकवाड, सदाभाऊ मोरे, लक्ष्मण साठे, अमजद शेख, नसीर शेख, जफर पठाण,हनीफ शेख, दस्तगीर शाह,सज्जाद पठाण, आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

श्रीरामपूर -(प्रतिनिधी) क्रांतिवीर शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने शहरातील बाजारतळ येथील बजरंग ग्रुप येथे शहीद भगतसिंग यांना अभिवादन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड श्रीकृष्ण बडाख,  वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रकाश सावंत, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल सोनवणे, भानुदास धनवटे, भाऊसाहेब धोत्रे,  संतोष त्रिभुवन यांनी क्रांतिवीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारी अभिवादन केले.  यावेळी परिसरातील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. 

अभिवादन सभेला संबोधताना कॉ. श्रीकृष्ण बडाख म्हणाले की, पारतंत्र्यात असताना मार्क्स च्या विचारांवर निष्ठा असलेला नवजवान क्रांतिवीर देशप्रेमी युवक भगतसिंग यांनी देश स्वातंत्र्य साठी इंग्रजांनी इथून चालते व्हावे म्हणून सशस्त्र संघर्ष केला. भगतसिंगचा लढा साम्राज्यशाही विरोधात तर होताच शिवाय तो देशातील सरंजामदारी, जातियवादाच्या विरोधात देखील  हो. तो  भारतीयांच्या समतेसाठी, भयमुक्त व सन्मानपुर्ण जीवनाच्या निर्मीतीसाठी होतायाचं कारण भगतसिंगाचा व्यापक दृष्टीकोन आहे,  त्यांनी सशस्त्र क्रांती केली. एक वैज्ञानिक विचारधारा असलेले भगतसिंग यांच्या विचारातील स्वातंत्र्य आजही मिळालेलं नाही.  शहीद भगतसिंग यांना अभिप्रेत असलेले स्वतंत्र श्रमिक, कामगार, शेतकरी यांना मिळालेले नाही. सत्तेच्या माध्यमातून भांडवलशाही राजवट आलेली आहे. यात बदल घडवून आणण्यासाठी वंचितानी शिक्षित होवून कलमक्रांती घडवून आणण्याची आज गरज आहे. हीच खरी शहीद भगतसिंग यांना आदरांजली ठरेल.  यावेळी अमोल सोनावणे यांनी क्रांतिकारी गीते सदर केली. तर आभार भानुदास धनवटे यांनी मानले. 


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget