राहाता येथील सार्वजनिक मुस्लीम ईदगा यांच्या मालकीचे क्षेत्र सि.स.नं. १७४६ महाराष्ट्र शासन सनदीप्रमाणे ८४६७ चौ.मी. (८४ गुंगे) क्षेत्रामध्ये खा, बाळासाहेब विखे पाटील उर्दू हायस्कूलचे ५ खोल्या राहाता नगर परिषदेने पहाटे सुमारे ४ वाजेच्या सुमारास ३ जेसीबी व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी, नगरपालिका अध्यक्ष यांच्या समवेत अनाधिकृतपणे सार्वजनिक मुस्लीम इदगा जागेच्या आवारात प्रवेश करुन खा. बाळासाहे६ विखे पाटील उर्दू हायस्कूलच्या ५ खोल्या जेनीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केलेल्या आहेत. सदरील स्कूलच्या शाळेतील खोल्यामध्ये ३ काम्प्युटर, शालेय स्टेशगरी,मुलाचे खेळाचे साहित्य, नमाज पठणाचे साऊंड सिस्टीम, घरई, भांडी सुमारे 5 खोल्या बांधकाम पाडण्यात आले. तसेच समाजाचे इतर विविध प्रकारचे धार्मिक पठणाचे साहित्य आदि साहित्याचे त्या ठीकाणाहून साहित्य गायब केलेले आहे. राहाता नगर परिषदेने दि.११/०९/२०२० रोजी जा.क्र. ७८/२०२० रोजी नोटीस बजावलेली होती, त्याबाबत कायदेशीररित्या नोटीसला सार्वजनिक मुरलीम ईदगा यांच्या वतीने खुलासा दि. २५/०९/२०२० रोजी दिलेला होता. मात्र नगरपरिषदेने कुठलीही सुचना व कागदपत्रांची पडताळणी न करता बे कायदेशीररित्या सार्वजनिक मुस्लीम इंदगा जागेत अनाधिकृत प्रवेश करून शाळेची नुकसान करण्यात आली. सदरील सार्वजनिक मुस्लीम ईदगा शाळेचे बांधकाम हे समाजातील सर्व लोकांच्या सहभागातून करण्यात आलेले होते.समारे १० ते २० लाख रुपयांचे नुकसान करण्यात आलेले आहे. तरी संबंधित अधिका-यांनी बेकादेशीर सार्वजनिक मुस्लीम इदगा शालेय साहित्य, खोल्या. विद्यार्थ्यांची छापील स्टेशनरी, कॉम्प्युटर,बाह्या, पुस्तके, शाळेत असणारे इतर फर्निचर आदिंचे नुकसान करुन मुस्लीम बांधवांवर जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे तरी आपले स्तरारुन गुन्हा दाखल करण्यात येऊन संबंधितांनाकायदेशीर कारवाई करावी अशीमागणी श्रीरामपूर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतींने घटनेचा निषेध करून करण्यात आले या वेळी अहमदभाई जहागीरदार,आमदार लहू कानडे ,तोफिक शेख,जोएफ जमादार,व मुस्लिम समाज उपस्थित होते.
Post a Comment