क्रांतिवीर शहीद भगतसिंग यांच्या जयंती साजरी.

श्रीरामपूर -(प्रतिनिधी) क्रांतिवीर शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने शहरातील बाजारतळ येथील बजरंग ग्रुप येथे शहीद भगतसिंग यांना अभिवादन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड श्रीकृष्ण बडाख,  वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रकाश सावंत, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल सोनवणे, भानुदास धनवटे, भाऊसाहेब धोत्रे,  संतोष त्रिभुवन यांनी क्रांतिवीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारी अभिवादन केले.  यावेळी परिसरातील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. 

अभिवादन सभेला संबोधताना कॉ. श्रीकृष्ण बडाख म्हणाले की, पारतंत्र्यात असताना मार्क्स च्या विचारांवर निष्ठा असलेला नवजवान क्रांतिवीर देशप्रेमी युवक भगतसिंग यांनी देश स्वातंत्र्य साठी इंग्रजांनी इथून चालते व्हावे म्हणून सशस्त्र संघर्ष केला. भगतसिंगचा लढा साम्राज्यशाही विरोधात तर होताच शिवाय तो देशातील सरंजामदारी, जातियवादाच्या विरोधात देखील  हो. तो  भारतीयांच्या समतेसाठी, भयमुक्त व सन्मानपुर्ण जीवनाच्या निर्मीतीसाठी होतायाचं कारण भगतसिंगाचा व्यापक दृष्टीकोन आहे,  त्यांनी सशस्त्र क्रांती केली. एक वैज्ञानिक विचारधारा असलेले भगतसिंग यांच्या विचारातील स्वातंत्र्य आजही मिळालेलं नाही.  शहीद भगतसिंग यांना अभिप्रेत असलेले स्वतंत्र श्रमिक, कामगार, शेतकरी यांना मिळालेले नाही. सत्तेच्या माध्यमातून भांडवलशाही राजवट आलेली आहे. यात बदल घडवून आणण्यासाठी वंचितानी शिक्षित होवून कलमक्रांती घडवून आणण्याची आज गरज आहे. हीच खरी शहीद भगतसिंग यांना आदरांजली ठरेल.  यावेळी अमोल सोनावणे यांनी क्रांतिकारी गीते सदर केली. तर आभार भानुदास धनवटे यांनी मानले. 


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget