श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वृध्दाश्रमात जावुन साजरा केला वाढदिवस.
श्रीरामपुर (प्रतिनिधी )- अनेक जण आपला वाढदिवस पार्टी देवुन मोठ मोठ्या हाँटेलमध्ये साजरा करतात पण श्रीरामपुरातील एका अवलीयाने आपला वाढदिवस चक्क वृध्दाश्रमात जावुन साजरा केला या अवलीयाचे नाव आहे तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपुरचे तहासीलदार प्रशांत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या डामडौलात मोठ्या हाँटेलात साजरा होईल असे कुणालाही वाटणे सहाजिकच आहे पण सामाजिक कार्याची जाण असणारे प्रशांत पाटील यांनी आपला वाढदिवस चक्क श्रीरामपुर येथील माऊली वृध्दाश्रमात जावुन वृध्दांना मिठाई देवुन तसेच वृध्दाश्रमाला आर्थिक मदत देवुन तेथील वृध्दांचे आशिर्वाद घेवुन साजरा केला.श्रीरामपुर येथील सुभाष दशरथ वाघुंडे हे स्वखर्चाने माऊली वृध्दाश्रम या नावाने वृध्दाश्रम चालवतात या वृध्दाश्रमात पाच आजोबा सहा आजीबाई एक किशोरवयीन
अनाथ मुलगा तीन पगारी सेवेकरी असे पंधरा जण राहतात सुभाष वाघुंडे यांनी वैयक्तिक सात लाख रुपये कर्ज काढुन आपल्या छोटेखानी जागेत हा उपक्रम सुरु केलेला आहे आपला आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यासाठी तहसीलदार प्रंशात पाटील वृध्दाश्रमात दाखल झाले तेथील वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांच्याकडून वृध्दाश्रमाची सविस्तर माहीती घेतली कोरोनामुळे सर्व नियमांचे पालन करुन वृध्दांना मिठाईचे वाटप केले अन वृध्दाश्रमास आर्थिक मदतही केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार देविदास देसाई हे होते या वेळी आजचा वाढदिवस आयुष्यातील अविस्मरणीय असुन आपले वरिष्ठ उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळेच कोरोना सारख्या कठीण परिस्थितीतही चांगले काम करण्यासाठी उर्जा मिळाली असेही पाटील म्हणाले या वेळी गोदामपाल शिवाजी वायदंडे किशोर छतवाणी विकी काळे भाऊसाहेब वाघमारे आण्णासाहेब पारखे सुनिल पारखे योगेश नागले अजिज शेख अरुण खंडागळे आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक चंद्रकांत झुरंगे यांनी केले तर माणिक जाधव यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रज्जाक पठाण यांनी केले.
Post a Comment