
मधुकर वक्ते कोपरगाव प्रतिनिधी. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावचे भुमिपुत्र तसेच जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल,डाऊच खर्द या स्कुल चे संस्थापक सचिव मा श्री सुनिल भास्करराव होन यांचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने हा त्यांचा कार्याचा घेतलेला आढावा.ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी माते मुळे पावन झालेल्या चांदेकसारे गावात एका सधन शेतकरी कुटुंबात सुनिल होन यांचा जन्म दि १८ सप्टेंबर रोजी झाला,प्राथमिक शिक्षण शिर्डी व पुढील शिक्षण चांदेकसारे व कोपरगाव येथुन पुर्ण केले.कुटुंबात समाजसेवेचा वारसा त्यांचे चुलते कै किसनराव नबाजी पा होन यांच्या कडुन मिळाला.शेतकर्याची व मोलमजुरी करणाऱ्या ची मुल शाळा,कॉलेज दुर असल्याने शिक्षणापासुन वंचित राहत होते . हिच गरज आेळखुन सुनिल भाऊ व त्यांच्या सहकार्यानी मिळुन २०१६ साली एक शैक्षणिक संस्था सुरु केली.आज या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातुन जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल , डाऊच खुर्द या ठिकाणी सुरु आहे.कोपरगाव चे आमदार श्री अशुतोष दादा काळे साहेब यांचे अत्यंत विश्वासु व निष्टावान सहकारी आहेत.स्कुल च्या माध्यमातुन चांदेकसारे गावात आई तुळजा भवानी माता मंदिर येथे भाविकांना बसण्यासाठी बाकडे,तसेच भैरवनाथ जोगेश्वरी माता मंदिर येथे सी सी टिव्ही कॅमेरे तसेच ख्वाजापिर दर्गाचे तार कंपाउंड,इ कामे स्वखर्चाने केलेले आहे.सुनिल भाऊंच्या मार्गदर्शना खाली जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल च्या सर्व मुलांचा न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातुन मोफत विमा उतरविला आहे.असा विमा उतरवनारी जोगेश्वरी राज्यात पहिलीच स्कुल आहे.प्रत्येक राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक कार्यक्रमात सुनिल भाऊ चा प्रमुख सहभाग असतो.गरीब घरातील जर कोणी मयत झाले तर दशक्रिया विधी साठी ५० किलो साखर मोफत दिली जाते.कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुनिल भाऊ च्या माध्यमातुन चांदेकसारे गावातील सर्व वैद्यकिय सेवा देणारे डॉक्टर,नर्स,अंगनवाडी सेविका यांना पी.पी.ई किट चे वाटप करण्यात आले.भैरवनाथ जोगेश्वरी उत्सव,उरुस,व सर्व जाती धर्माच्या कार्यक्रमाला सुनिल भाऊंचा सहभाग असतो.सगळयांना जोडुन ठेवायच्या स्वभावामुळे आज सुनिल होन यांच्या बरोबर असंख्य तरुण सहकारी जोडले गेलेले आहे.एका शेतकरी कुटुंबातुन येवुन जनमानसात आपली वेगळी ओळख खुपच कमी लोकांना बनवता येते.सुनिल होन यांनी आपले स्थान व दर्जा मागील बर्याच वर्षांच्या कामातुन अधोरेखित केले आहे.अशा या तरुन,तडफदार,युवा सेवकाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
