अहमदनगर गुन्हा अन्वेषन विभागाचा कोल्हार येथील जुगार अड्ड्यावर छापा ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त
श्रीरामपूर ( प्रतिनिधी )-अहमदनगर गुन्हा अन्वेषन विभागाने लोणी पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या जुगार अड्डयावर छापा टाकुन
रोख रक्कम , मोबाईल , दुचाकी व चार चाकी वाहनासह एकूण ४४,लाख -रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन या कारवाई मुळे जुगारअड्डा चालकाचे धाबे दणाणले आहे
राहता तालुक्यातील विविध गावांमध्ये जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाला समजल्यानंतर राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे लोणी ते कोल्हार रोड लगत असणाऱ्या एका इमारतीच्या टेरेस वर चालू असलेल्या जुगार अड्ड्यांवर नगरच्या गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच धाड टाकून पोलिसांनी 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ,तसेच कोल्हार येथील या जुगार अड्ड्यावर सुमारे 41 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यामध्ये मोठे प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे, पोलिसांच्या या धाडीमुळे जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावाल्यांना मोठी जरब बसली आहे,
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाला, या विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना रविवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली होती की, कोल्हार परिसरात मुदस्सर शकील शेख रा,कोल्हार बुद्रुक हा कयूम करीम शेख याच्या इमारतीच्या टेरेसवर पंचवीस ते तीस लोकांना घेऊन तिरट नावाचा जुगार खेळत आहे, त्यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी एक टीम तयार करून संबंधित इमारतीला घेतले तर काही कर्मचाऱ्यांनी येथे टेरेस गाठले ,त्यावेळी तेथे एक दोन नव्हे तर चार डाव सुरू होते, त्यामुळे हा एक टाईमपास गेम नव्हे तर हा जुगार असल्याचे पोलिसांना समजून आले, पोलिसांनी या ठिकाणी त्वरित छापा टाकून संबंधित जुगार खेळणारे आरोपींना ताब्यात घेतले, काही पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र या ठिकाणाहून पोलिसांनी एकूण 44 लाख सतरा हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ,तसेच 41 व्यक्तींवर या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या जुगार अड्यावरून दुचाकी, मोबाईल, जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, अन्य मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, यातील बहुतांशी लोकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत , जुगार खेळणाऱ्या मध्ये शिर्डी, रुई, राहता, लोणी ,अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा ,मनमाड, येवला,येथील जुगार्यांचा सामावेश आहे विविध तालुक्यातून हे जुगार खेळणारे जुगारी प्रतिष्ठित असणारे लोक येथे येत होते, कोल्हार येथील जुगार अड्ड्यांवर झालेल्या कारवाईत चेतन विजय वाघमारे,( पिंपळस). मुद्दत शकील शेख.(कोल्हार बुद्रुक. )सागर बेदाडे, व अशपाक जमीर शेख (,मनमाड) ,दिलावर मन्सूर शेख ,(कोल्हार बुद्रुक,)
आरबाज राजू पठाण (,राहता) माहिद कयूम शेख, (कोल्हार बुद्रुक) बुबेरखान निसारखान पठाण संगमनेर ,आसिफ तसलीम शेख (कोल्हार बुद्रुक,) अरशद रशीद मोमीन( येवला), वसंतलक्ष्मणबडे( येवला ,)अमित गाडेकर (राहता ,)लालू मारुती चौधरी (अकोले), कयूम गुलाब पठाण( विसापूर, तालुका श्रीगोंदा,) नवाब हुसेन शेख लोणी, जाहीद दिलावर सय्यद (कोल्हार, )सय्यद अली मोहम्मद, जयहिंद गोविंद माळी( राहुरी,) विलास दत्तात्रय चोथे (वांबोरी ,)सागर मदनलाल वर्मा, (बेलापूर ,तालुका श्रीरामपूर,) गणेश विठ्ठल जेजुरकर( ,शिर्डी,) इम्राण याकुब मोमिन( मनमाड,) शकील सलीम शेख (कोल्हार,) नजीर अजीज शेख (राहुरी).
संतोष बाबुराव चौधरी (अकोले ,)शकील जबर शेख (कोल्हार बुद्रुक),
संजय कांतीलाल पटेल ,(कोल्हार,) नुमान सत्तार शेख (कोल्हार, )भाऊसाहेब रामराव चौधरी (रुई,तालुका राहता )
सचिन बाळाराम पवार (,कोल्हार ),अमोल भास्करराव वाघमारे. (विसापूर तालुका श्रीगोंदा,) गणेश रंगनाथ सोमासे .(येवला ),महेश अण्णा बरकल (,मनमाड.)आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अहमदनगरचे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. या मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यामुळे जिल्ह्यातील इतर जुगार अड्डे ही व त्यांच्या मालकांवर आणि जुगार खेळणाऱ्यांवर मोठी जरब,भिती निर्माण झाली आहे,