बेलापूर (प्रतिनिधी )- बेलापूर ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे महत्वाची कागदपत्रे गायब होण्याची दाट शक्यता असुन ग्रामपंचायतीची कागदपत्रे बाहेर गेलीच कशी ?महत्त्वाची कागदपत्रे नेणार्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केली आहे ग्रामपंचायत कार्यालयाचे दप्तर व इतर कागदपत्रे जुळवा जुळव करण्यासाठी खाजगी ठिकाणी नेण्यात आली होती आम्ही त्या ठिकाणी पोहोचताच संबधीत इसमांनी पळ काढला असे शरद नवले यांनी सांगितले आहे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यामुळे ग्रामपंचायतीवर एस एस गडधे यांची प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच ग्रामविकास आधिकारी संग्राम चांडे यांचीही बदली झाली असुन त्यांच्या जागी नविन ग्रामविकास अधिकारी तगरे हे हजर झाले आहेत बेलापूर ग्रामपंचायतीचा पदभार सोपविण्याकरीता टाळाटाळ केली जात असुन बोगस केलेल्या कामाची कागदपत्रे ग्रामविकास अधिकारी व एक इसम जुळवा जुळव करण्यासाठी खाजगी ठिकाणी बसले असल्याची माहीती जिं प सदस्य शरद नवले यांना मिळताच अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे भाजपाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे यांना घेवुन नवले संबधीत ठिकाणी गेले असता ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीचा कर्मचारी व आणखी दोन इसम त्या ठिकाणी कागदपत्राची जुळवा जुळव करत असल्याचे नवले यांच्या लक्षात आले आम्हांला पहाताच त्या दोन इसमानी एका दरवाजाने व ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी दुसर्या दरवाज्याने पळून गेल्याचे नवले व खंडागळे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले त्या नंतर आपल्या सहकार्यासह नवले ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले प्रशासक गडधे व नविन आलेले ग्रामविकास अधिकारी तगरे यांना ग्रामपंचायत कार्यालयातील दप्तर व महत्वाची कागदपत्रे बाहेर गेलीच कशी कुणाच्या परवानगीने ही कागदपत्रे कार्यालयाच्या बाहेर गेली असा सवाल जि प सदस्य नवले यांनी केला असुन आडीच वर्षाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार करण्यात आला आहे अधिकार्यांना हाताशी धरुन बोगस कामाची बिले काढण्यात आलेली आहे त्या बाबत तक्रारी दाखल झाल्या असुन संबधीत ग्रामसेवक व इतरावर कारवाई होणारच आहे त्यामुळे बोगस कामाच्या कागदपत्राची जुळवा जुळव करण्यासाठीच महत्वाची कागदपत्रे बाहेर नेली असुन संबधीतावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जि प सदस्य शरद नवले यांनी केली आहे.
Post a Comment