Latest Post

बुलडाणा - 17 ऑगस्ट
बुलडाणा तालुक्यातील सैलानी परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असल्याने इतिहासात पहिल्यांदा येथील नदी-नाले पाट सोडून वाहत होते. अनेक घरात सैलानी येथे हे पाणी शिरले होते तर दुपारी चार वाजेच्या सुमारास सैलानी येथील बाग जाली परिसरात एक वेडसर इसम शाहनवाज कुरेशी वय 35 वर्ष राहणार बीड हा नाल्यातील पुराच्या पाण्यात वाहून गेला त्याला एका ठिकाणी पुलावर काही लोकांनी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्याला वाचण्यास अपयश आले. जवळपास पाचशे मीटर पुढे शेख अफसर मुजावर यांच्या म्युझियम जवळ एका एंगलला पकडन्यास त्याला यश आले. ही गोष्ट काही लोकांच्या लक्षात आली परिसरात भरपूर पाणी होता चार ते पाच फुटापर्यंत पाणी असल्याने त्याला वाचवँयाची हिम्मत शेख शोएब शेख अफसर मुजावर, शेख अरबाज शेख अफसर मुजावर, शेख हारून शेख सुल्तान ,कैलाश चव्हाण व सुदामा गवारे या पाच लोकांनी दाखवली व रस्सी बांधून ते पाण्यात पोहोचले व पाण्यात पडलेल्या या इसमाला वाचवून बाहेर आणले. अशा प्रकारे या युवकांनी एका वेडसर इसमाला वाहत जात असताना वाचवले आहे. या धाडसी युवकांचे पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर सह ग्रामस्थाननी कौतुक केले आहे.

बुलडाणा - 16 ऑगस्ट
कोरोना संसर्गाच्या संकटकाळात जिल्हा यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याऱ्या पत्रकारांना स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी येथील जमीअत उलमा -ए- हिन्द बुलडाणा जिल्हा शाखाच्या वतीने आरोग्यवर्धक मालेगावच्या प्रसिद्ध मंसूरा काढाचे वाटप पत्रकार भवन येथे करण्यात आले आहे.
    बुलडाणा शहर व जिल्ह्यात कोरोना विषाणुने कहर केला आहे. दोन हजारावर पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पोहचली.या कोरोना माहामारीच्या काळात मात्र कोरोना योद्धयाची भूमिका पार पाडत रस्त्यावर उतरलेला पत्रकार आपली नैतिक जबाबदारी म्हणून जनतेपर्यंत प्रत्येक घटनेची बातमी पोहोचवत आहे. या कोरोना योद्धांची प्रतिकार शक्ति वाढ़ावी या उद्देशाने बुलडाणा शहरातील सर्व पत्रकार बांधवांना जमीअत उलेमा-ए-हिंद,शाखा बुलडाणा जिल्हाच्या वतीने मालेगांवचा मंसूरा काढा वाटप करण्यात आला आहे.हा काढा महेफिल-ए-यारां ग्रुप मालेगांवच्या वतीने जमीअतला देण्यात आला होता.पत्रकार भवन येथे काढा वाटप करतांना जमीअत उलेमा बुलडाणा जिलाध्यक्ष हाफिज़ शेख खलीलउल्लाह,उपाध्यक्ष मौलाना ज़िया,हाफिज़ इरफान,अंसारी मो मतीन,हाफिज़ अफरोज़ व इतर सदस्य हजर होते.

बुलडाणा - 16 ऑगस्ट
तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे एका 27 वर्षीय युवकाने घरासमोरील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री समोर आली आहे.
       बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम डोंगरखंडाळा येथील राहणारे 27 वर्षीय संदीप गोविंदा पवार यांनी काल 15 ऑगस्टच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोरील शेवग्याचा झाडावर दुपट्टा बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी संदीपला फासावर लटकलेला अवस्थेतून खाली काढले व तात्काळ वरवंड येथील प्रा.आरोग्य केंद्रात नेले तेव्हां तो श्वास घेत होता मात्र अधिक उपचारची गरज होती म्हणून बुलडाण्यात जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. याबाबत बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. घरगुती वादातून संदीपने ही  टोकाची भुमिका घेतल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रमेश बंसोड व जनार्धन इंगळे करीत आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील गुन्हेगारांना घाम फोडणार्‍या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील एका पोलीस शिपायाविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने ही कारवाई केली. पोलीस शिपाई रवींद्र आबासाहेब कर्डिले (वय- 35) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामध्ये महत्वाची भूमिका असलेल्या रवींद्र कर्डिले यांच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, नगर शहरातील तक्रारदार यांचे शहरात दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. तक्रारदार यांच्या गॅरेजवर पत्तेचा क्लब सुरू होता. या क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकला. या छाप्यादरम्यान तक्रारदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच, तक्रारदार यांच्या वडिलांवर झालेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी रवींद्र कर्डिले यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.तक्रारदार यांनी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार न करता थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 27 जूलै रोजी लाच मागणी पडताळणीदरम्यान कर्डीले यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 20 हजार रुपयांची मागणी केली. यामुळे रवींद्र कर्डिले यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतीष भामरे, पोलीस हवालदार सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, सुनील गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

🔸बुलडाणा जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
बुलडाणा - 13 ऑगस्ट
चिखली येथील अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अमानुषपणे आळीपाळीने बलात्कार करुन तिला जखमी केल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती.27 एप्रिल 2019 रोजी घडलेल्या या गुन्ह्यातील दोन्ही गुन्हेगारांना आज 13 ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी विविध कलमान्वये दोषी धरले असून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
      बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे एका 9 वर्षीय मुलीला 27 एप्रिल 2019 रोजी रात्री 1 ते 2 वाजेदरम्यान गुन्हेगार सागर विश्वनाथ बोरकर व निखिल शिवाजी गोलाईत या दोघांनी मुलगी झोपलेली असतांना तिचे झोपेतच तोंड दाबून स्कुटीवर पळवून नेत स्मशानभूमी समोरील क्रिकेटच्या सुनसान मैदानात नेले होते. दरम्यान,तिच्यावर आळीपाळीने अमानुषपणे बलात्कार करण्यात आला यात मुलगी जख्मी झाली होती. तिला जिवे मारण्याची धमकी आरोपी कडून देण्यात आली होती.या घटनेची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी चिखली ठाण्यात दिली असता दोन्ही आरोपी विरुद्ध विविध कलमाअन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट झाल्यानंतर 15 साक्ष तपासन्यात आले होते. आज 13 ऑगस्टला विशेष न्यायाधिश चित्रा हंकारे यांनी दोन्ही आरोपींना बलात्कारच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. गेल्या 55 वर्षानंतर बुलडाणा कोर्टातुन ही फाशीची शिक्षा ठोठावन्यात आली आहे.फिर्यादी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.वसंत भटकर, अतिरिक्त सरकारी वकील सोनाली सावजी देशपांडे यांनी सरकारी पक्षाची बाजू प्रभावी व सक्षमपणे मांडली.आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून चिखली ठाणेदार गुलाबराव वाघ व कर्मचाऱ्यांनी फार मेहनत घेऊन भक्कम पुरावे गोळा केले होते.दोन्ही आरोपींना शिक्षा होणार म्हणून चिखली पोलिस ठाण्याला विद्युत रोशनाईने सजवले.

प्रतिनिधी कोपरगाव मधुकर वक्ते 
कोपरगाव - भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असलेल्या बहादराबाद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ शिलाताई अशोक पाचोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच निवडीकरीता आज पार पडलेल्या सभेत उपसरपंचपदी सौ शिलाताई अशोक पाचोरे यांच्या नावाची सूचना गोवर्धन पाचोरे यांनी मांडली तर अनुमोदन सदस्य सौ संगिता पाचोरे यांनी दिले. सरपंच विक्रम पाचोरे यांच्या अध्यक्षस्थानी पार पडली तर सचिव म्हणून ग्रामसेविका सौ अनिता दिवे यांनी काम पाहिले.मावळते उपसरपंच गोवर्धन बन्सी पाचोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली. यावेळी साहेबराव पाचोरे, विकास सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय पाचोरे, माजी सरपंच दतात्रय पाचोरे, पोलीस पाटील आप्पाासाहेब पाचोेरे, आण्णासाहेब पाचोरे,अशोक पाचोरे, लक्ष्मण पाचोरे, दिलीप पाचोरे, बाळासाहेब पाचोरे, वाल्मीक पाचोरे, रामनाथ पाचोरे, संदीप पाचोरे, दिपक आरोटे, निलेश पाचोरे,उपस्थित होते. या निवडीबददल माजी मंत्री शंकररावजी कोल्हे, संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे, कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन विवके कोल्हे यांनी नवनिर्वाचित उपसरपंचाचे अभिनंदन केले. 

बेलापूर  (वार्ताहर)-राज्यातील मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी योग्य व्यक्ती नव्हे तर सरकारी अधिकारीच नेमा, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने काल शुक्रवारी (ता.१४)दिल्याने प्रशासक सरपंच पदाची स्वप्न पहाणार्यांच्या स्वप्नावर विरजन पडले आहे.राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक घेणे या काळात शक्य नसल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत राजकीय व्यक्तींना प्रशासकपदी बसविण्याचा काहींनी घाट घातला होता त्या करीता पालक मंत्र्यांना अधीकार देण्यात आले होते त्यामुळे अनेकांनी प्रशासक सरपंच होण्याकरीता फिल्डींग लावण्यास सुरुवात केली होती काहींनी आपल्या नावाची शिफारसही राजकीय वजन वापरुन करुन घेतली होती प्रशासक पदाकरीता राजकीय पदाधिकार्यात जणू स्पर्धाच सुरु झाली होती अनेकांना प्रशासक झाल्याची स्वप्न पडू लागली होती या चढाओढीत काहीनी उच्च न्यायालयात धाव घेतली जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांनीही कार्यकर्त्यांच्या निवडीवर आक्षेप घेतला होता  त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले होते                                
या आदेशाने राज्य सरकारच्या खासगी व्यक्ती नियुक्तीबाबतच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे. दरम्यान, यामुळे या महिन्यात मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी सरकारी अधिकारी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. 
दरम्यान राज्याच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकपदी योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राज्यभरातून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याबाबतच्या तीन डझन आव्हान याचिका दाखल झाल्या होत्या. उच्च न्यायालयाने याआधी २७ जुलैला सरकारी अधिकारी नियुक्तबाबतचा पहिला अंतरिम आदेश दिला होता. त्यानंतर आज दुसऱ्यांदा असाच अंतरिम आदेश देण्यात आला आहे. पुढील सुनावणी २४ ऑगस्टला होणार आहे
ग्रामपंचायत कायद्यातील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी क वर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. पण राज्याच्या ग्रामविकास विभागाने याला बगल देणारा निर्णय नव्या राजपत्राद्वारा घेतला होता.
उच्च न्यायालयाचा सरकारविरोधी कल पाहता नवीन राजपत्र हे कलम १८२ च्या आधारे प्रसिद्ध केले आहे. या कलमाचा आधार घेऊन जाहीर केलेल्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येत नाही. त्यासाठी सरकारने ही नवी पळवाट शोधली होती. परंतु न्यायालयाच्या परवानगीने एका नव्या याचिद्वारे आव्हान देण्यात आले होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget