🔸बुलडाणा जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
बुलडाणा - 13 ऑगस्ट
चिखली येथील अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अमानुषपणे आळीपाळीने बलात्कार करुन तिला जखमी केल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती.27 एप्रिल 2019 रोजी घडलेल्या या गुन्ह्यातील दोन्ही गुन्हेगारांना आज 13 ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी विविध कलमान्वये दोषी धरले असून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे एका 9 वर्षीय मुलीला 27 एप्रिल 2019 रोजी रात्री 1 ते 2 वाजेदरम्यान गुन्हेगार सागर विश्वनाथ बोरकर व निखिल शिवाजी गोलाईत या दोघांनी मुलगी झोपलेली असतांना तिचे झोपेतच तोंड दाबून स्कुटीवर पळवून नेत स्मशानभूमी समोरील क्रिकेटच्या सुनसान मैदानात नेले होते. दरम्यान,तिच्यावर आळीपाळीने अमानुषपणे बलात्कार करण्यात आला यात मुलगी जख्मी झाली होती. तिला जिवे मारण्याची धमकी आरोपी कडून देण्यात आली होती.या घटनेची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी चिखली ठाण्यात दिली असता दोन्ही आरोपी विरुद्ध विविध कलमाअन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट झाल्यानंतर 15 साक्ष तपासन्यात आले होते. आज 13 ऑगस्टला विशेष न्यायाधिश चित्रा हंकारे यांनी दोन्ही आरोपींना बलात्कारच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. गेल्या 55 वर्षानंतर बुलडाणा कोर्टातुन ही फाशीची शिक्षा ठोठावन्यात आली आहे.फिर्यादी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड.वसंत भटकर, अतिरिक्त सरकारी वकील सोनाली सावजी देशपांडे यांनी सरकारी पक्षाची बाजू प्रभावी व सक्षमपणे मांडली.आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून चिखली ठाणेदार गुलाबराव वाघ व कर्मचाऱ्यांनी फार मेहनत घेऊन भक्कम पुरावे गोळा केले होते.दोन्ही आरोपींना शिक्षा होणार म्हणून चिखली पोलिस ठाण्याला विद्युत रोशनाईने सजवले.
Post a Comment