Latest Post

बुलडाणा - 28 जुलै
संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात येत्या 21 ऑगस्ट पर्यंत कडक लॉक डाऊन असल्याने पोलीस बंदोबस्त वाढलेला आहे तरीही काही भुरटे चोर संधीचा सोना करत चोरीच्या घटना करीत असल्याची बाब बुलढाणा शहरातील चर्च समोर उघडकीस आली आहे. येथील सहा दुकाने अज्ञात चोरांनी एकाच रात्री फोडून लाखो रुपयांची चोरी केल्याचे आज 28 जुलै रोजी समोर आले आहे.
      या बाबत प्राप्त माहिती अशी की काल  27 जुलैच्या रात्री बुलडाणा शहरातील चर्च ऑफ नाझरीन समोर नगरपालिकेने बांधून दिलेल्या दुकानां पैकी 3 मोबाइल शॉपी,2 गेरेज व एक पान सेंटर अशा प्रकारे या 6 दुकानांचे छतावरील नट बोल्ट मध्ये फीट केलेले टीन पान्याने उघडून आत प्रवेश करुण अज्ञाताने चोरी केली. हा प्रकार आज सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर बुलडाणा शहर पोलीसाने घटनास्थळी जावून पंचनामा केला असून या प्रकरणी सायंकाळी 5 वाजे पर्यंत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नव्होती.अंदाजे 3 लाख रूपयांची चोरी झाल्याचे बोलले जात आहे.

श्रीरामपूर : संपूर्ण देशात covid-19 या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे,त्यास अनुसरून संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यामध्ये अधिकारी व वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स योग्य त्या सर्व उपाययोजना राबवत आहात म्हणूनच आज श्रीरामपूर तालुक्याची परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत खूपच उत्तम व समाधानकारक आहे.मात्र शहरातील कोणत्याही रुग्णाच्या बाबतीत भेदभाव व्हायला नको,विशिष्ट भागातील रुग्णांना न तपासण्याची भूमिका मानवतेच्या दृष्टीकोनातून योग्य नसून सर्व रुग्णांसोबत सौहार्द्पणे व्यावहार करण्याची मागणी शहरातील मिल्लतनगर भागातील नागरिकांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांचेकडे निवेदनाने केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे कि,मागील आठवड्यात सर्वसाधारण रुग्णांच्या बाबतीत योग्य उपचार किंवा प्राथमिक उपचार देखील न मिळाल्याने व शहरातील काही डॉक्टरांनी सपशेल नकार दिल्याने  याच भागातील दोन व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या ही वाईट घटना असून प्रत्येक रुग्णांना किमान प्राथमिक उपचार अथवा योग्य सल्ला दिला गेला पाहिजे.
विशेषतः शहरात मुस्लिम बहुल विभाग असलेला व सर्व परिचित असलेला वार्ड  नंबर २ या भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवेच्या बाबतीत अनेक समस्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोणतीही व्यक्ती रुग्ण म्हणून जेव्हा शहरातील कोणत्याही रुग्णालयात वा दवाखान्यात जात असेल तर त्या ठिकाणी संबंधित सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी अथवा डॉक्टरांनी रुग्णांना दिलासा देऊन चर्चा करणे गरजेचे आहे,किमान उच्च रक्तदाब,साखरेचे कमी-जास्त प्रमाण यांसारख्या आजारांवर प्राथमिक उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे मात्र अनेक ठिकाणी असे होताना दिसत नाही.
या भागातील नागरिक स्वयस्फूर्तीने आजाराबद्दलची भीती घालवण्यासाठी घरोघरी भेटी देत आहेत. स्वच्छता व आरोग्याची घेण्याचेही आवाहन करीत आहेत.
यावेळी तसेच व्हाट्सअप च्या माध्यमातून दररोज वेगवेगळे मेसेज आल्याने त्या माध्यमातून covid-19 बद्दल लोकांमध्ये भितीचे वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण होतात.वास्तविक या रोगाबद्दल अधिकची माहिती अर्थात शिक्षण लोकांमध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यासाठी अधिकृत अथवा वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कोणताही मेसेज पाठविला जावू नये असाही आग्रह धरण्यात आला.
शिष्टमंडळात अकिल शेख,शकील बागवान,असलम बिनसाद,इमाम सय्यद,अनिस शेख,गणी पिंजारी,अमीन शेख,आदींचा समावेश होता.

बुलडाणा - 27 जुलै
पारिवारिक विवादातून बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत एका 25 वर्षीय महिला पोलीस कर्मचारी यांनी छत्तीसगढ़ येथील रांची येथे विषप्राशन करुन आत्महत्या केल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
    याबाबत प्राप्त माहितीनुसार, बुलडाणा येथील रहिवासी महिला पोलीस कर्मचारी आरती ज्ञानेश्वर सोनुने यांचा बुलडाणा शहरातील सरस्वती नगर येथे राहणाऱ्या दीपक संजय पसरटे सोबत 2018 मध्ये विवाह झाला होता. दीपक हा आर्मीमध्ये कार्यरत आहे.आंतरजातीय विवाह असल्याने दीपकच्या परिवारातील सदस्य आरतीला मान्य करत नव्हते.त्यामुळे त्यांच्यात आपसी वाद-विवाद व्हायचे, अशातच 2019 ला आरतीने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात पती व इतर सासरची मंडळीविरुद्ध 498 चा गुन्हा नोंदविला होता.पती दीपक कडून आरतीवर दुर्लक्ष केले जात होते.मागील दहा दिवसापूर्वी आरतीने सुट्टी घेऊन थेट रांची गाठले.तिथे आर्मी कॅम्प समोर जाऊन आरतीने आपले पति दिपकला कॉल केले.परंतु दिपकने काही प्रतिसाद दिला नाही. दीपकच्या या स्वभावामुळे आरतीने आर्मी कॅम्प समोर विष प्राशन केले. आरतीला आर्मीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु चौथ्या दिवशी म्हणजे 25 जुलै रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. आरतीच्या पर्समधील सुसाइड नोट सुद्धा रांची पोलिसांच्या हाती लागलेली आहे.आरतीच्या मृत्यूपूर्व बयान व चिठ्ठीत समानता असल्याने रांची येथील पोलिस ठाण्यात पती दीपक विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.आरती यांचे पार्थिव काल 26 जुलै च्या रात्री बुलडाणा येथे पोहोचल्या नंतर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले असुन रांची मध्ये आरोपी पति दीपक अटक असल्याचे समजते.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याचे माहीत आसतानाही हलगर्जीपणा दाखवुन किराणा दुकान सुरु ठेवल्याच्या कारणावरुन बेलापूर पोलीसांनी एका किराणा दुकानदारासह दोन जणावर गुन्हा दाखल केला असुन या प्रकारामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.कोरोनामुळे गावातील दुकाने पाच वाजता बंद करण्याचा मा जिल्हाधिकारी यांचा आदेश असताना त्या नंतरही दुकान उघडी ठेवुन कायद्याचा भंग करणार्या व्यापार्या विरुध्द बेलापूर 
पोलीसांनी प्रथमच कारवाई केली आहे कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याचे माहीत असताना तोंडास कोणत्याही प्रकारचे मास्क न लावता कोणतीही खबरदारी न घेता सदर आजार पसरण्याचा संभव असल्याचे माहीत असुनही हरिप्रसाद सोमनाथ मंत्री यांनी  त्याच्या मालकीचे ओंकार किराणा स्टोअर्स नावाच्या दुकानात किराणा मालाचे गीराईक करुन कोरोना आजाराचा संसर्ग होवुन स्वतःचे व इतराच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले तसेच मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशचा भंग केल्यावरुन हरिप्रसाद सोमनाथ मंत्री यांचेविरुध्द पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे  तसेच जाकीर असीफ शेख राहणार गोंधवणी श्रीरामपूर याने आपल्या ताब्यातील मोटार सायकल टी व्ही एस स्टार सीटी एम एच १७सी बी ५९११ ने मास्क न वापरता विनाकारण फिरत असताना आढळून आला पोलिस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाचा भंग केल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेलापूर पोलीसांनी गेल्या काही दिवसात विनाकारण फिरणारे मास्क न वापरणारे यांच्या विरुध्द जोरदार मोहीम सुरु केली असुन ग्रामस्थांनी पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे साईनाथ राशिनकर पोपट भोईटे निखील तमनर यांचे अभिनंदन केले आहे.

डोणगांव पोलीस ठाण्यातील 1 कर्मचारी पोजिटिव्ह
बुलडाणा - 25 जुलै
बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगांव राजा येथील ठाणेदार व काही कर्मचारी यांचा कोरोना अहवाल पोजिटिव्ह आल्यानंतर तेथील ठाण्याला कंटेन्मेंट झोन घोषित करुण तिथला कामकाज शिवाजी नगर खामगांव ठाण्याला अटैच करण्यात आला असून आता मेहकर तालुक्यातील डोणगांव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत एक पोलीस कर्मचारी आज 25 जुलै रोजी कोरोना पोजेटीव्ह निघाल्याने सुरक्षिततेची उपाय योजना म्हणून या पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी हे होम क्वान्टाईन केले व येथील पोलीस स्टेशनचे कारभार मेहकर ठाण्याला अटैच करण्यात आले आहे.
       डोणगांव पोलीस स्टेशन मध्ये एकूण 36 पोलीस अधिकारी व कर्मचारी असून त्यात 2 अधिकारी व 34 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.या ठाण्यात कार्यरत एक पोलीस कर्मचारीची तब्यत बिघडल्याने व त्याचे लक्षण कोरोना सारखे दिसल्याने त्याची कोरोना तपासणी केली असता आज 25 जुलै रोजी अहवाल कोरोना पोजेटीव्ह मिळून आल्याने येथील  पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांना तातडीने मेहकर येथील क्वारन्टाईन सेंटर मध्ये आनले असून त्यांची कोरोना तपासनी केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.डोणगांव पोलीस स्टेशनचा कारभार हा मेहकर ठाण्यातुन चालणार असल्याची माहिती मेहकर विभागीय पोलीस अधिकारी डी. बी.तडवी यांनी दिली आहे.सद्या जिल्ह्यातील 2 पोलीस स्टेशन कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे.

बेलापुर(वार्ताहर)बेलापुर खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना प्रत्येकी वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
माजी सरपंच व सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक बडधे व भारतीय सेना दलातील हवालदार किशोर थोरात यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोनशे पेजेसच्या चार वह्या तसेच शालोपयोगी लेखन साहित्याचे वितरण पालकांना टप्प्याटप्प्याने बोलावून करण्यात आले.
यावेळी तोंडाला मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन करण्यात आले. तसेच कोरोनासंबंधी घ्यावयाची काळजी बाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सर्वश्री सुनील बारहाते, राजीव रणदिवे, वेणूनाथ माने, राजेंद्र कुंकुलोळ, मूलख्याध्यापिका मुख्याध्यापिका सौ. दायमा आदी प्रमुख उपस्थित होते.

बेलापूर- (प्रतिनिधी )         बेलापुरातील एक युवक कोरोना पॉझीटीव्ह निघाल्यानंतर त्याच्या संपर्कातील सुमारे 14 लोकांना स्त्राव तपासणीसाठी श्रीरामपुरला नेले.मात्र त्यांना तेथे रात्रभर ठेऊन स्त्राव न घेताच परत पाठवले.त्यांना काही दिवस होम क्वारांटीन करणे गरजेचे होते मात्र आरोग्य विभागाने तसे काहीच केले नाही.त्यामुळे हे लोक बिनधास्तपणे गावभर फिरत आहेत.अशाच प्रकारामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचा घणागात बेलापुरात अनेक नागरीकांनी केला आहे.
            या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन बेलापुरगावातील सजग नागरीकांनी कोरोना समीतीसमवेत शुक्रवारी बैठक घेतली व अनेक गंभीर त्रुटींचा ऊहापोह केला.या बैठकीला जि.प.सदस्य शरद नवले,उपसरपंच रविंद्र खटोड,सुनिल मुथा,सुधिर नवले,मारुती राशीनकर,देविदास देसाई,नवनाथ कुताळ दिलीप दायमा  अभिषेक खंडागळे,सुधाकर खंडागळे,भरत साळुंके,अजय डाकले,विष्णूपंत डावरे,चंद्रकांत नाईक,पोलीस नाईक.रामेश्‍वर ढोकणे,साईनाथ राशीनकर,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.मोरे,डॉ.शैलेश पवार,कामगार तलाठी कैलास  खाडे,पोलीस पाटील अशोक प्रधान,अशोक पवार,विजय शेलार,अशोक गवते,प्रफुल्ल डावरे प्रसाद खरात सुहास शेलार अशोक शेलार सचिन वाघ ,दिपक क्षत्रीय,  आदींसह अनेक मान्यवर उपस्थीत होते.
      दोन दिवसांपुर्वी बेलापुरातील एक युवक कोरोना पॉझीटीव्ह सापडला होता.त्याच्या संपर्कातील सुमारे 14 लोकांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी व कोरोना समीतीच्या सदस्यांनी तपासणीसाठी कोरोना केअर सेंटरला पाठवले होते.मात्र त्यांचे स्त्राव न घेताच परत पाठवण्यात आले.वास्तविक त्यांच्या हातावर होम क्वारांटीनचा शिक्का मारुन त्यांना क्वारांटीन करणे गरजेचे होते.तसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला व कोरोना समीतीला कळवायला पाहीजे होते.मात्र तसे न झाल्यामुळे ते लोक बिनधास्तपणे गावभर फिरत आहेत.त्यामुळे इतर ग्रामस्थ चिंता व्यक्त करीत आहेत.असाच प्रकार यापुर्वीही घडला होता.एका युवकाचा स्त्राव घेतल्यानंतर त्याचा तब्बल बारा दिवसांनी अहवाल पॉझीटीव्ह आला होता.तोपर्यंत तोही सर्वत्र फिरला.त्यालाही अहवाल येईपर्यंत क्वारांटीन करणे गरजेचे होते.अशा गंभीर त्रुटी आरोग्य विभागाकडून राहत असल्याने त्या कोरोनाला पोषक ठरु शकतात अशी चिंता नागरीक व्यक्त करीत आहेत.
     दरम्यान यापुढे रुग्ण सापडला तर त्याच्या संपर्कातील इतर लोक स्त्राव तपासणीसाठी नेले जातील.त्यांचे स्त्राव घेतले किंवा घेण्याची गरज पडली नाही तरीही त्यांना काही दिवस होम क्वारांटाईन करावे.तसा त्यांच्या हातावर शिक्का मारावा.शिवाय त्याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्र,कोरोना समीती पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतीला कळवावी अशी मागणी बैठकीत  करण्यात आली आहे.तसे पत्रही तालुका आरोग्य अधिकार्‍यांना देण्याचे सर्वानुमते ठरले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget