Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी) गेले साडे तीन महिने कोरोना पासून अलिप्त राहिलेल्या श्रीरामपूर शहरांमध्ये देखील आठवड्याभरात दहा रुग्ण आढळल्याने शहरवासीयांना मध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून इतर शहराप्रमाणे आपल्या श्रीरामपूर शहरात हा रोग अधिक वाढू नये म्हणून प्रशासनाने तातडीने किमान आठवड्याभरासाठी श्रीरामपूर शहरात लॉक डाऊन लागू करावा अशी मागणी शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. नगराध्यक्षाअनुराधा आदिक यांनी याबाबत यापूर्वीच प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र प्रशासनाने नियमावर बोट ठेवत त्या पत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहरांमध्ये आज करोना वाढत आहे. वेळीच उपाययोजना केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. शहरांमध्ये सापडलेले रुग्ण हे वेगवेगळ्या भागातील आहेत. गोंधवणी रोड, वार्ड नंबर 2, कांदा मार्केट परिसर, बेलापूर रोड आदी विविध भागांमध्ये हे रुग्ण आढळून आले आहेत. शहराची बाजारपेठ उघडल्यापासून शहरांमध्ये रस्त्यावरील गर्दी वाढली आहे. ग्रामीण तसेच शेजारच्या तालुक्यातील लोक दररोज बाजारपेठेत येत आहेत. बाजारपेठ सुरू करताना प्रशासनाने जे नियम घालून दिले त्याकडे सर्वच घटक सपशेल दुर्लक्ष करीत आहेत. बहुतांश नागरिक गाडीवर असताना किंवा दुकानात जाताना मास्कचा वापर करीत नाही. दुकानदारांकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही. सॅनिटायझर चा वापर केला जात नाही. सुरक्षित अंतर राखले जात नाही. त्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवल्याने शहरात ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ती रोखण्यासाठी प्रशासन, नगरपालिका आणि गृहखाते यांनी संयुक्तपणे निर्णय घेऊन लॉक डाउन लागू करून त्याची कडक अंमलबजावणी करावी. शहराच्या काही भागांमध्ये प्रशासनाला मदत करण्याच्या नावाखाली काही लोक विनाकारण गर्दी करतात. टोळके बनवून चौकामध्ये उभे राहतात. त्यांनासुद्धा रोखण्याची गरज आहे.  पोलिसांचे हस्तक असणारे काही घटक हे प्रशासनाला मदतीच्या नावाखाली चुकीचे सल्ले देतात अशीही चर्चा असून पोलिसांनी या लोकांना दूर ठेवणे आवश्यक आहे. नगरपालिका कर्मचारी शहरांमध्ये शिस्त लावण्यासाठी कमी पडतात. हे काम पोलिसांना दिले पाहिजे. कारण पालिका कर्मचाऱ्यांचे कोणीच ऐकत नाही. तेव्हा जे रुग्ण सापडले आहेत त्यांच्यापासून बोध घेऊन नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा.घरातील एकाच व्यक्तीने जाऊन सर्व कामे करावीत. विनाकारण रस्त्यांवर किंवा दुकानात किंवा कार्यालयात गर्दी करू नये.अशी अपेक्षाही जनतेतून व्यक्त होत आहे.
मागणीकडे दुर्लक्ष
श्रीरामपूर शहरामध्ये लॉक डाऊन लागू करण्याची नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केलेली मागणी योग्य होती . परंतु त्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची भावना शहरवासीयांमध्ये दिसून येत आहे
कडक अंमलबजावणीची गरज
शहरांमध्ये वाढती रुग्णांची संख्या पाहता बाजारपेठ बंद करून लॉक डाऊन ची कडकअंमलबजावणी करावी . विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी. बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करण्यात यावे, तसेच ही माहिती लपविणाऱ्या लोकांवरही कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात दरोडा टाकण्यार्‍या टोळीचा पर्दाफाश श्रीगोंदा पोलिसांनी केला आहे. अधिक उकल केली असता त्यांनी अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली असून आरोपीकडून दरोड्यातील चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र, सहा मोटारसायकल, तीन इलेक्ट्रिक विद्युत पंप असे मिळून 4 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या गुन्ह्यातील अनिल लहू गायकवाड, चंद्रकांत सुरेश गायकवाड दोघे रा. भिंगाण ता. श्रीगोंदा आणि अनिल संभा काळे रा. पिंपळवाडी ता. कर्जत यांची तुरुंगात रवानगी केली आहे.याबाबत सविस्तर अधिक माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी सांगितले की दि.15 एप्रिल 2020 रोजी पहाटे श्रीगोंदा शहराजवळील भोळेवस्ती वरील एका घरावर सात दरोडेखोरांनी दरोडा टाकून फिर्यादीस मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल चोरला होता.सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे सोपवला असता वरील दरोड्यातील आरोपी शेडगाव ता. श्रीगोंदा शिवारात आलेले आहेत. त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांसमवेत सापळा टाकून 30 जूनच्या पहाटे चार वाजता आरोपींना जेरबंद केले. सदर आरोपींनी नऊ ठिकाणी विविध गुन्हे केल्याची कबुली देऊन अन्य पाच साथीदारांची नावे पोलिसांना दिल्याने पोलीस यंत्रणेने त्यांचा शोध घेतला असता ते आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.अटकेतील आरोपींकडून तीन मोटारसायकल हस्तगत केल्या. त्यांनी अजून विकलेल्या तीन मोटारसायकली इंदापूर जि. पुणे येथून हस्तगत केल्या तर तीन इलेक्ट्रिक मोटारी श्रीगोंदा येथील सोनवणे नामक भंगारवाल्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अहमदनगर-दिनांक ०१/०७/२०२० रोजी पोनि/दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमीदारांकडून
बातमी मिळाली कि, पाथर्डी ते खरवंडी कासार जाणारे रोडवर तुळजवाडी फाटा येथे दोन इसम हे त्यांचे जवळील लाल काळे रंगाचे पल्सर मोटार सायकलवरुन गावठी कट्टा व जिवंत काडतूसे विक्री करण्यासाठी घेवून येणार आहेत. अशी माहीती मिळाल्याने पोनि/दिलीप पवार यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सदरची माहीती देवून मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करणे कामी रवाना केले.त्यानंतर सथानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोना ज्ञानेश्वर शिंदे, रविन्द्र कर्डीले, रवि सोनटक्के, पोकॉरिणजित जाधव, शिवाजी ढाकणे, संदीप चव्हाण, मेघराज कोल्हे, चालक पोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून दोन पंचासह पाथर्डी ते खरवंडी कासार जाणारे रोडवर तुळजवाडी फाटा येथे जावून सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच दोन संशईत इसम हे लाल काळ्या रंगाच्या पल्सर-२२० मोटार सायकलवरुन खरवंडी कासार बाजूकडून येताना दिसले. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची खात्री झाल्याने त्यांनी सदर मोटार सायकल स्वारांना त्यांची मोटार सायकल थांबविण्याचा इशारा केला. मोटार सायकल स्वारांनी त्यांचे मोटार सायकलचा वेग कमी करताच पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. पथकातील अधिकाऱ्यांनी सदर मोटार सायकल स्वारांना पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यांना त्यांची नावे, पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे पत्ते २) रोहीदास उर्फ रोहीत अशोक गायकवाड, वय-२३ वर्षे, रा. खरवंडी कासार, ता- पाथर्डी, २) दादासाहेब उर्फ लक्ष्मण मल्हारी वाळके, वय-२० वर्षे, रा. कोरडगांव, ता- पाथर्डी असे असल्याचे सांगीतले. त्यांना त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये २५,०००/-रु. किं. चे गावठी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टा), ४००/-रु. किं. चे दोन जिवंत काडतूसे व १,००,०००/-रु. किं. ची बजाज पल्सर-२२० मो.सा.नं. एमएच-०३-डीएफ-१२२२ असा एकूण १,२५,४००/-रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. वरील नमुद दोन्ही इसम हे गावठी कट्टा व जिवंत काडतूसे विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिर रित्या कब्नात
बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोकों/३७ संदीप विनायक चव्हाण, नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी पाथर्डी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ॥ ४१३/२०२०, आर्म अॅक्ट कलम ३/२५, ७ प्रमाणे दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही पाथर्डी पो.स्टे. हे करीत आहेत. सदरची कौतुकास्पद कामगीरी ही मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधीक्षक,अहमदनगर, मा. डॉ. श्री. सागर पाटील साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. मंदार जवळे साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर शहरात काल ५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले असून यात दोन मुले, दोन महिला व एका तरुणाचा समावेश आहे. एकाच दिवशी एकदम पाच रुग्ण आढळून आल्याने शहरात एक चिंतेचा विषय बनला आहे.परवा दिवशी पाठविलेल्या १७ करोना चाचणी अहवालापैकी ११ अहवाल काल प्राप्त झाले असून त्यात महावितरण अधिकार्‍यांच्या कुटुंबातील चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून पाचवा रासकरनगर वॉर्ड नं. ७ मधील एका तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. श्रीरामपूर शहरात एकाच दिवशी पाच रुग्ण सापडल्यामुळे शहरात चिंतेचा विषय ठरला आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- बेलापूरगावाच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे कोरोना समीतीने तातडीची बैठक घेवुन मास्क न वापरणार्यावर शंभर रुपये दंड व सँनिटायझर व सोशल डिस्टनचे पालन न करणार्या व्यवसायीकांना २००० रुपये दंड आकारण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. केसापूर तालुका राहुरी येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे बेलापूरात भितीचे वातावरण पसरले आहे कारण केसापूर येथील त्या रुग्णचा वावर हा बेलापूर गावातच होता  त्यामुळे कोरोना कमीटीने तातडीची बैठक घेवुन विनाकारण गावात फिरणार्यावर कायदेशिर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे गावात मास्क न वापरणार्या नागरीकांना शंभर रुपये दंड तसेच सँनिटायझर सोशल डिस्टन्स व ईतर नियमाचे उल्लंघन करणार्या व्यवसायीकांना दोन हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला तसेच गावातील सर्व नागरीकांची घरोघर जावून आरोग्य तपासणी करणार असल्याचे आरोग्य अधीकारी डाँ देविदास चोखर यांनी बैठकीत सांगुन नियमाचे पालन करा कोरोनावर मात करण्यासाठी सर्वानी सहकार्य करा बाहेर गावातील व्यक्ती गावात आल्यास तातडीने कळवा सायंकाळी पाच नंतर जी दुकाने दरवाजा बंद करुन चालु राहतील त्या दुकानावर देखील  दंडात्मक कारवाई करण्याची सुचना सुनिल मुथा यांनी केली रविवारी जनता कर्फ्यू लागू करावा अशी मागणी काही सदस्यांनी  केली त्यावर एकमत होवु शकले नाही त्यामुळे जनता कर्फ्यूचा निर्णय स्थगीत करण्यात आला लग्न व इतर समारंभास ५० पेक्षा अधिक गर्दी झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी अंत्यविधी दशक्रिया विधीच्या वेळेसही गर्दी कमी  असावी असेही बैठकीत ठरविण्यात आले बाहेर गावातील व्यापारी व्यवसायीकास गावात येवु देवु नये गावात नविन आलेल्या व्यक्तीचे नाव पंचायतीस कळविणे आवश्यक आहे असेही सर्वानुमते ठरविण्यात आले  नाभिक संघटनेच्या वतीने दहा दिवस व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचे सर्वांनी अभिनंदन केले या वेळी भरत साळुंके डाँ देविदास चोखर बाजार समितीचे संचालक सुधीर नवले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा किराणा असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण पत्रकार देविदास देसाई सरंपच राधाताई बोबले पोलीस पाटील अशोक प्रधान अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे शिवसेना शहर प्रमुख  अशोक पवार राम पौळ अजय डाकले सुनिल मुथा प्रफुल्ल डावरे मोहसीन सय्यद अनिल मुंडलीक चंद्रकांत नाईक नामदेव बोंबले आदि उपस्थित होते शेवटी ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांनी आभार मानले.

अहमदनगर, दि.३० - कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. तसेच, नगर शहरात सध्या पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेची काळजी न घेता नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. पुन्हा सक्तीचे लॉकडाऊन टाळायचे असेल तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, अत्यावश्यक असेल तर चेहऱ्यावर मास्क घालून घराबाहेर पडावे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.रुग्ण बरे झाल्यानंतर १० दिवसानंतर आणि २८ दिवसाच्या आत प्लाझ्मा दान केले पाहिजे. त्यामुळे रुग्णांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. तेथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही त्यांचे समुपदेशन करून याचे महत्व पटऊन द्यावे, असेही ते म्हणाले.प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात. जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांनी यासाठी पुढे येऊन प्लाझमा दान करण्याचे आवान त्यांनी केले. 

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकारी बँकेने सर्व प्रकारच्या कर्जास ऑगस्ट 2020 अखेर मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिली आहे.जिल्हा बँकेने यासंदर्भात नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या मुदत कर्जाचे दि. 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या 6 महिन्यांच्या कालावधीत वसुलास पात्र वसुलीस स्थगिती देण्यात येत आहे.या कालावधीत येणे बाकीवर व्याज आकारणी करून त्याची वसुली सप्टेंबर 2020 व लगतच्या 5 महिन्यांत करावयाची आहे. तसेच कर्ज परतफेड कालावधी 6 महिन्यांनी वाढवायचा आहे. सदरचे बदल हे सन 2019-20 हंगाम करिता मर्यादित राहतील.याबाबत बँक पातळीवर सर्व प्रकारचे कर्ज, हप्त्यास दि. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा बँक प्रशासनाने घेतला असल्याचे ससाणे यांनी सांगितले आहे.तसेच ज्या सभासदांचे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफी योजनेचे आधार प्रमाणिकरणाचे कामकाज चालू आहे. ज्या शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झालेले आहे व त्याची शासनाकडून रक्कम प्राप्त झालेली आहे असे जमा खर्च पूर्ण करण्यात आलेले आहेत.तथापी ज्या शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झालेले आहे; परंतु शासनाकडून रक्कम प्राप्त झालेली नाही. अशा शेतकर्‍यांना शासन येणे दर्शवून जमा खर्च करणेबाबत शासन निर्णयानुसार जिल्हा बँकेने परिपत्रक जारी करून निर्णय घेतला आहे.बँकेने कर्ज वसुलीस ऑगस्ट अखेर मुदतवाढ दिल्याने शेतकरी, बँक सभासदांना मोठ्या प्रमाणावर याचा लाभ होणार आहे. या निर्णयाबद्दल राज्य शासन, जिल्हा बँकेचे चेअरमन आणि सर्व पदाधिकार्‍यांचे ससाणे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget