श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर शहरात काल ५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले असून यात दोन मुले, दोन महिला व एका तरुणाचा समावेश आहे. एकाच दिवशी एकदम पाच रुग्ण आढळून आल्याने शहरात एक चिंतेचा विषय बनला आहे.परवा दिवशी पाठविलेल्या १७ करोना चाचणी अहवालापैकी ११ अहवाल काल प्राप्त झाले असून त्यात महावितरण अधिकार्यांच्या कुटुंबातील चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून पाचवा रासकरनगर वॉर्ड नं. ७ मधील एका तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. श्रीरामपूर शहरात एकाच दिवशी पाच रुग्ण सापडल्यामुळे शहरात चिंतेचा विषय ठरला आहे.
Post a Comment