बेलापूर (प्रतिनिधी )- बेलापूरगावाच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे कोरोना समीतीने तातडीची बैठक घेवुन मास्क न वापरणार्यावर शंभर रुपये दंड व सँनिटायझर व सोशल डिस्टनचे पालन न करणार्या व्यवसायीकांना २००० रुपये दंड आकारण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. केसापूर तालुका राहुरी येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे बेलापूरात भितीचे वातावरण पसरले आहे कारण केसापूर येथील त्या रुग्णचा वावर हा बेलापूर गावातच होता त्यामुळे कोरोना कमीटीने तातडीची बैठक घेवुन विनाकारण गावात फिरणार्यावर कायदेशिर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे गावात मास्क न वापरणार्या नागरीकांना शंभर रुपये दंड तसेच सँनिटायझर सोशल डिस्टन्स व ईतर नियमाचे उल्लंघन करणार्या व्यवसायीकांना दोन हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला तसेच गावातील सर्व नागरीकांची घरोघर जावून आरोग्य तपासणी करणार असल्याचे आरोग्य अधीकारी डाँ देविदास चोखर यांनी बैठकीत सांगुन नियमाचे पालन करा कोरोनावर मात करण्यासाठी सर्वानी सहकार्य करा बाहेर गावातील व्यक्ती गावात आल्यास तातडीने कळवा सायंकाळी पाच नंतर जी दुकाने दरवाजा बंद करुन चालु राहतील त्या दुकानावर देखील दंडात्मक कारवाई करण्याची सुचना सुनिल मुथा यांनी केली रविवारी जनता कर्फ्यू लागू करावा अशी मागणी काही सदस्यांनी केली त्यावर एकमत होवु शकले नाही त्यामुळे जनता कर्फ्यूचा निर्णय स्थगीत करण्यात आला लग्न व इतर समारंभास ५० पेक्षा अधिक गर्दी झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी अंत्यविधी दशक्रिया विधीच्या वेळेसही गर्दी कमी असावी असेही बैठकीत ठरविण्यात आले बाहेर गावातील व्यापारी व्यवसायीकास गावात येवु देवु नये गावात नविन आलेल्या व्यक्तीचे नाव पंचायतीस कळविणे आवश्यक आहे असेही सर्वानुमते ठरविण्यात आले नाभिक संघटनेच्या वतीने दहा दिवस व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचे सर्वांनी अभिनंदन केले या वेळी भरत साळुंके डाँ देविदास चोखर बाजार समितीचे संचालक सुधीर नवले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा किराणा असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण पत्रकार देविदास देसाई सरंपच राधाताई बोबले पोलीस पाटील अशोक प्रधान अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार राम पौळ अजय डाकले सुनिल मुथा प्रफुल्ल डावरे मोहसीन सय्यद अनिल मुंडलीक चंद्रकांत नाईक नामदेव बोंबले आदि उपस्थित होते शेवटी ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांनी आभार मानले.
Post a Comment