दरोडा टाकणारी टोळी जेरबंद 4 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश.

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात दरोडा टाकण्यार्‍या टोळीचा पर्दाफाश श्रीगोंदा पोलिसांनी केला आहे. अधिक उकल केली असता त्यांनी अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली असून आरोपीकडून दरोड्यातील चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र, सहा मोटारसायकल, तीन इलेक्ट्रिक विद्युत पंप असे मिळून 4 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या गुन्ह्यातील अनिल लहू गायकवाड, चंद्रकांत सुरेश गायकवाड दोघे रा. भिंगाण ता. श्रीगोंदा आणि अनिल संभा काळे रा. पिंपळवाडी ता. कर्जत यांची तुरुंगात रवानगी केली आहे.याबाबत सविस्तर अधिक माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी सांगितले की दि.15 एप्रिल 2020 रोजी पहाटे श्रीगोंदा शहराजवळील भोळेवस्ती वरील एका घरावर सात दरोडेखोरांनी दरोडा टाकून फिर्यादीस मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल चोरला होता.सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे सोपवला असता वरील दरोड्यातील आरोपी शेडगाव ता. श्रीगोंदा शिवारात आलेले आहेत. त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांसमवेत सापळा टाकून 30 जूनच्या पहाटे चार वाजता आरोपींना जेरबंद केले. सदर आरोपींनी नऊ ठिकाणी विविध गुन्हे केल्याची कबुली देऊन अन्य पाच साथीदारांची नावे पोलिसांना दिल्याने पोलीस यंत्रणेने त्यांचा शोध घेतला असता ते आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.अटकेतील आरोपींकडून तीन मोटारसायकल हस्तगत केल्या. त्यांनी अजून विकलेल्या तीन मोटारसायकली इंदापूर जि. पुणे येथून हस्तगत केल्या तर तीन इलेक्ट्रिक मोटारी श्रीगोंदा येथील सोनवणे नामक भंगारवाल्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget