Latest Post

बुलडाणा - 21 जून
शिव प्रतिष्ठाणचे धारकरी विजय लहाने वय ७३ वर्ष यांनी १९ जून रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तर २० जून रोजी ४० वर्षीय राकेश नारडीया यांनी आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. शहरात दोन दिवसात दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या या वृत्ताने बुलडाणा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
        बुलडाणा शहरातील जुनागांव परिसरातील ३७ वर्षीय विजय लहाने हे शिव प्रतिष्ठानचे धारकारी होते. त्यांनी १९ जून रोजी सायंकाही जुनगावातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी बुलडाणा शहर ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर दूसरी घटना ही येथीलच जुनागांव लगत असलेल्या मलकापुर रोड वरील ४० वर्षीय राकेश नारडिया यांनी २० जून रोजी आपल्या घरात गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपविली. रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना समोर आल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शहर  पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या दोन्ही घटनांचा अधिक तपास बुलडाणा शहर पोलिस करीत आहे.

हळगाव : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे बारावीच्या विद्यार्थीनीचा मुतदेह एका विहीरीत आढळुन आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.मुक्ता संभाजी वारे असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. सदर घटना ऑनर किलींगचा प्रकार आहे की खुनाचा यादृष्टीने जामखेड पोलिस अधिक वेगाने तपास करत आहेत. या प्रकरणात एका संशयिताला चौकशीसाठी जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील मुक्ता संभाजी वारे ही विद्यार्थीनी गुरूवारी दुपारी बेपत्ता झाली होती. शुक्रवारी ती बेपत्ता असल्याची तक्रार मयत मुलीचे आजोबा शहाजी कोंडिबा यादव यांनी पोलिसात दाखल केली होती. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बेपत्ता तरूणीचा मृतदेह डोणगाव शिवारातील अशोक यादव या शेतकर्याच्या शेतातील विहीरीत आढळून आला.जामखेड पोलिस स्टेशनला मुलीचे वडील संभाजी वारे यांनी खबर दिली होती.मयत मुक्ता वारे ही विद्यार्थीनी लहाणपणापासुन डोणगाव या
आपल्या आजोळी राहण्यास होती. तीने यावर्षी बारावीची परिक्षा दिली होती. तीचे मुळगाव जामखेड तालुक्यातील रत्नापुर आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, हेड काँस्टेबल शिवाजी भोस , काँस्टेबल विष्णू चव्हाण, बाजीराव सानप, अजय साठे, शशिकांत म्हस्के, पोलिस मित्र अमोल यादव, शुभम यादव, पोलिस पाटील बिभीषण यादव यांनी भेट देत विहीरीतून मृत विद्यार्थीनीचा मृतदेह बाजेच्या सहाय्याने बाहेर काढला. मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी जामखेडच्या ग्रामीण आरोग्य रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.सदर विद्यार्थीनीच्या मृत्यूप्रकरणाचा तपास अधिक वेगाने जामखेड पोलिस करत आहेत.या प्रकरणात डोणगाव - अरणगाव परिसरातून एका संशयित तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे.

श्रीगोंदा दि.२०- तालुक्यातील येळपणे येथील खंडोबा मंदिरात चोरी करणारे सराईत चोरटे मुद्देमालासह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. हर्षद उर्फ हर्षा हबऱ्या  काळे(वय२९,रा.देवळगावसिद्धी,ता.जि.अहमदनगर), संतोष उर्फ सक्तेश रकड्या भोसले (वय २९, रा.देलवाडी, ता.दौंड, जि.पुणे), श्रीखंड्या जिवालाल चव्हाण (वय ३५, रा.रेणुकामाता मंदिरमागे,केडगाव,अहमदनगर),भिवसेन रखमाजी पडोळकर (रा.देऊळगावसिद्धी, वाघमोडेवस्ती,ता.जि.अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे असून, याच्यात अजून एक अल्पवयीन आरोपी आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१३ जूनच्या रात्री येळपणे (ता.श्रीगोंदा) गावाजवळील बंद खंडोबा मंदिराच्या दरवाज्याचा अज्ञात चोरट्यांनी कडीकांयेडा तोडून आतील लोंखडी तिजोरीतील १ लाख ७० हजार रु.किंमतीचे चांदीचे व पिताळी पंचधातूचे खंडोबा देवाचे मुखवटे, चांदीचे लहान घोडे, सोन्याचा बदम, दोन मनीमंगळसूत्रासह अन्य मुद्देमाल चोरीप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता,जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पो.नि.दिलीप पवार यांचा तपास सुरु होता. या दरम्यान, पो.नि. पवार यांना तांत्रिक व गोपनीय माहितीनुसार हा गुन्हा हर्षा काळे (देवळगावसिद्धी) याने व त्याच्या साथीदाराने केल्याची माहिती मिळाली. ठिकाणी जाऊन पोलिसांनी आरोपींच्या वास्तव्याबाबत माहिती काढली, यात देवळगावसिद्धी येथील डोंगरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथके तयार करून सापळा लावून आरोपी हर्षा काळे याला पाठलाग करून पकडले. गुन्ह्याबाबत आरोपी काळे याला विचारल्या प्रथम उडावाउडवीची उत्तरे दिली. तद्नंतर पोलीस खाक्या दाखविताच, गुन्हा हा साथीदार संतोष उर्फ सक्तेश रकड्या भोसले (वय २९, रा.देलवाडी, ता.दौंड, जि.पुणे), श्रीखंड्या जिवालाल चव्हाण (वय ३५, रा.रेणुकामाता मंदिर मागे, केडगाव, अहमदनगर) आणि एक (अल्पवयीन) असे मिळून केल्याचे सांगितले. या सर्वांना पोलीसांनी ताब्यात घेतले.आरोपी हर्षद काळे व श्रीखंड्या जिवालाल चव्हाण याने ३ हजार रु.किंमतीचा ५ किलो २६६ ग्रँम वजनाचा पितळी पंचधातूचे मुखवट, पितळी प्लेट काढून दिल्याने रितसर पंचनामा करून जप्त करण्यात आले.उर्वरित चोरीचा माल भिवसेन रखमाजी पडोळकर (रा.देऊळगावसिद्धी, वाघमोडे वस्ती ता.जि.अहमदनगर) याला विक्री केल्याचे सांगितले. त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून ६७ ग्रँम वजनाचे २ हजार ६८० रु.चे सहा चांदीचे घोडे पंचनामा करून ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली ४० हजार रु.कि.ची शाईन दुचाकी आरोपी हर्षा काळे याच्या कडून जप्त केली, असा एकूण ४५ हजार ६८० रु.चा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला. पकडण्यात आलेले सर्वच आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यात हर्षा काळे याचावर पारनेर, बेलवंडी व नगर तालुका पोलीस ठाण्यात तर श्रीखंड्या चव्हाण याचा वर कोतवाली, श्रीगोंदा, नगर तालुका पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव मार्गदर्शनाखाली कर्जत विभागाचे पोहेकाँ अंकुश ढवळे, स्था.गु.शा.चे संदीप पवार यांना माहिती मिळाली. यानंतर पो.नि.दिलीप पवार यांच्या पथकातील सपोनि संदीप पाटील, पोहवा दत्तात्रय हिंगडे, विजयकुमार वेठेकर, पोना संदिप कचरु पवार, संदिप पोपट पवार, भागिनाथ पंचमुख, रविंद्र कर्डीले, पोकाँ विनोद मासाळकर, योगेश सातपुते, सुरज वाबळे, मेघराज कोल्हे, पोना दीपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, चापोहवा बाळासाहेब भोपळे आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी  )- गरीब कल्याण योजनेंतर्गत धान्य दुकानदारा मार्फत वाटप करण्यात आलेल्या धान्याचे प्रति क्विंटल १५० रुपये या प्रमाणे कमिशन दुकानदारांना दिले जाणार असुन अन्न पुरवठा विभागाने तसे आदेश दिले असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे      केंद्र शासनाच्या गरीब कल्याण योजनेंतर्गत माहे एप्रिल मे व जुन महीन्यासाठी कार्डधारकांना प्रति व्यक्ती  पाच किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात आला होता या मोफत वितरीत केलेल्या धान्याचे कमिशन दुकानदारांना तात्काळ देण्यात यावे तसेच कोरोना संकटात काम करणार्या धान्य दुकानदारांना विमा सुरक्षा कवच देण्यात यावे अशी मागणी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स फेडरेशनने केली होती या मागणीसाठी संघटना १जुन पासुन संपावर गेलेली होती मात्र वित्त मंत्री नामदार अजित दादा पवार यांनी संघटनेचे  पदाधिकारी गणपतराव डोळसे निवृत्ती कापसे  यांच्या बरोबर चर्चा करुन मागण्या मान्य करण्याचे अश्वासन दिले होते फेडरेशनने मागणी केल्याप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा विभागाने धान्य दुकानदारांना गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत वाटप  केलेल्या धान्याचे प्रति क्विंटल १५० रुपये या प्रमाणे कमिशन देण्याचे आदेश दिले असुन स्वस्त धान्य दुकानदारांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार आहे गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील जवळपास साडे सहा लाख कुटुंबाना १८८३ धान्य दुकानदारांच्या माध्यमातून मोफत धान्याचे वितरण करण्यात आले आहे धान्य दुकानदारांना कमिशन मिळवुन दिल्याबद्दल फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर सचिव बाबुराव ममाणे खजिनदार विजय गुप्ता निवेत्ती कापसे गणपतराव डोळसे  नितीन पेंटर मुबारक मौलवी आदिंचे अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असल्याचेही देसाई  यांनी म्हटले आहे.

श्रीरामपूर -  आपल्या शेजारील राष्ट्र चीनने लद्दाखच्या गलवान वॅली मधे कब्जा करण्याच्या उद्देशाने भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्यात  20 जवान शहीद झाले या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजा कडुन शुक्रवारच्या नमाज नंतर मौलाना आझाद चौक  येथे निषेध सभा झाली. 
 मोदी सरकारच्या काही नितींचा विरोध असला तरी देशाच्या संरक्षण आणि आत्मसन्माना साठी सगळा मुस्लिम समाज आणि सर्व भारतीय हे सरकारच्या पाठीशी उभे आहे. शहीद जवानांचा सरकारने बदला घ्यावा, चीन सोबत असलेले सगळे आर्थिक संबंध  तोडण्यात यावे  यासाठी गरज पडल्यास संपूर्ण समाज तन मन धनाने देशासोबत आहे असे संविधान समितीचे संयोजक अहमदभाई जहागिरदार यांनी सांगितले.
यावेळी शहर काझी मौलाना अकबर अली, एम आय एम चे साजिद मिर्झा, आरिफ बागवान, डॉ. सलीम शेख, समाजवादीचेजोएफ जमादार यांची भाषणे झाली
प्रास्ताविक फिरोज दस्तगिर यांनी केले. 
मुन्नाभाई पठाण, नागेश भाई सावंत, पत्रकार असलम बिनसाद, फिरोज पठाण, भाजपचे फहीम शेख,एम आय एम चे नाझीम शेख, जावेद तांबोळी,आदिल मखदुमी,इफ्तेखार शेख, शाहीद कुरेशी, सलिम झुल्ला, मुस्तकीमबागवान,नाजिश शहा, इकबाल रमजान, अबु पेंटर नदिम तांबोळी असे बरेच बांधव उपस्थित होते. 
शेवटी दोन मिनिटे मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

बुलडाणा - 19 जून
आज 19 जून रोजी खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय मोताळा येथे ठेवण्यात आला होता सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली असून पहिले महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले एड.संजय राठोड  मागास्वार्गिय सेलचे प्रदेशअधक्ष विजय अंभोरे,लक्ष्मणराव घुमरे, आंबेकर सर, शैलेश खेडकर, दीपक रिंठे, ढगे संतोष पाटील, मुक्तारसिंग राजपूत,
एड. विजय साळवे,बाबासाहेब भोंडे, एकनाथ खर्चे, तुळशीराम नाईक, सुनील जयस्वाल, मिलिंद पाटील, सोपान पानपाटील,  सुमिता अवकाळे,सौ लताताई पारस्कर,मनोरमा सातव, अब्दुल हसन अब्दुल तायर, मिलिंद आहिरे, सब्जीलाल जाधव, पुंडलिक जावरे,एकनाथ चव्हाण,महेश जाधव,विशाल राठोड, अविनाश चव्हाण, संजय शेळके, किशोर चव्हाण,विष्णू शिराळ, पवन जाधव, गणेश बसी, अल्ताफ खान, नितीन राठोड, संतोष पाटील आदींची उपस्थिती होती या रक्तदान शिबिराचे उद्दिष्ट एक हजार युनिट होते पण रक्तसाठा संपादित करण्यासाठी अडचण येत असल्यामुळे काहीच लोकांनी याठिकाणी रक्तदान केले बाकी 1000 रक्तदात्यांची यादी ही सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकिस्तक यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.

मुंबई - यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळाला केले आहे.
आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्रीद्वय सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार, आमदार महोदय, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमविर सिंह, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई.रवींद्रन व इतर वरिष्ठ अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे, याबद्दल तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. शिर्डी सिद्धिविनायक व या सारख्या संस्थांनी त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, हे खरे आहे की नेहमीप्रमाणे यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका सम्पलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता , योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल. 
ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू,यासाठीचा कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू असे ही मुख्यमंत्री म्हणाले. 
गणेश मंडळांच्यामार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा आपण विचार करू व हा उत्सव साजरा करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget