श्रीरामपूर - आपल्या शेजारील राष्ट्र चीनने लद्दाखच्या गलवान वॅली मधे कब्जा करण्याच्या उद्देशाने भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्यात 20 जवान शहीद झाले या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजा कडुन शुक्रवारच्या नमाज नंतर मौलाना आझाद चौक येथे निषेध सभा झाली.
मोदी सरकारच्या काही नितींचा विरोध असला तरी देशाच्या संरक्षण आणि आत्मसन्माना साठी सगळा मुस्लिम समाज आणि सर्व भारतीय हे सरकारच्या पाठीशी उभे आहे. शहीद जवानांचा सरकारने बदला घ्यावा, चीन सोबत असलेले सगळे आर्थिक संबंध तोडण्यात यावे यासाठी गरज पडल्यास संपूर्ण समाज तन मन धनाने देशासोबत आहे असे संविधान समितीचे संयोजक अहमदभाई जहागिरदार यांनी सांगितले.
यावेळी शहर काझी मौलाना अकबर अली, एम आय एम चे साजिद मिर्झा, आरिफ बागवान, डॉ. सलीम शेख, समाजवादीचेजोएफ जमादार यांची भाषणे झाली
प्रास्ताविक फिरोज दस्तगिर यांनी केले.
मुन्नाभाई पठाण, नागेश भाई सावंत, पत्रकार असलम बिनसाद, फिरोज पठाण, भाजपचे फहीम शेख,एम आय एम चे नाझीम शेख, जावेद तांबोळी,आदिल मखदुमी,इफ्तेखार शेख, शाहीद कुरेशी, सलिम झुल्ला, मुस्तकीमबागवान,नाजिश शहा, इकबाल रमजान, अबु पेंटर नदिम तांबोळी असे बरेच बांधव उपस्थित होते.
शेवटी दोन मिनिटे मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Post a Comment