शिव प्रतिष्ठाणचे धारकरी विजय लहाने वय ७३ वर्ष यांनी १९ जून रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तर २० जून रोजी ४० वर्षीय राकेश नारडीया यांनी आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. शहरात दोन दिवसात दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या या वृत्ताने बुलडाणा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बुलडाणा शहरातील जुनागांव परिसरातील ३७ वर्षीय विजय लहाने हे शिव प्रतिष्ठानचे धारकारी होते. त्यांनी १९ जून रोजी सायंकाही जुनगावातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी बुलडाणा शहर ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर दूसरी घटना ही येथीलच जुनागांव लगत असलेल्या मलकापुर रोड वरील ४० वर्षीय राकेश नारडिया यांनी २० जून रोजी आपल्या घरात गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपविली. रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना समोर आल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शहर पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या दोन्ही घटनांचा अधिक तपास बुलडाणा शहर पोलिस करीत आहे.
Post a Comment