श्रीगोंदा दि.२०- तालुक्यातील येळपणे येथील खंडोबा मंदिरात चोरी करणारे सराईत चोरटे मुद्देमालासह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. हर्षद उर्फ हर्षा हबऱ्या काळे(वय२९,रा.देवळगावसिद्धी,ता.जि.अहमदनगर), संतोष उर्फ सक्तेश रकड्या भोसले (वय २९, रा.देलवाडी, ता.दौंड, जि.पुणे), श्रीखंड्या जिवालाल चव्हाण (वय ३५, रा.रेणुकामाता मंदिरमागे,केडगाव,अहमदनगर),भिवसेन रखमाजी पडोळकर (रा.देऊळगावसिद्धी, वाघमोडेवस्ती,ता.जि.अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे असून, याच्यात अजून एक अल्पवयीन आरोपी आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१३ जूनच्या रात्री येळपणे (ता.श्रीगोंदा) गावाजवळील बंद खंडोबा मंदिराच्या दरवाज्याचा अज्ञात चोरट्यांनी कडीकांयेडा तोडून आतील लोंखडी तिजोरीतील १ लाख ७० हजार रु.किंमतीचे चांदीचे व पिताळी पंचधातूचे खंडोबा देवाचे मुखवटे, चांदीचे लहान घोडे, सोन्याचा बदम, दोन मनीमंगळसूत्रासह अन्य मुद्देमाल चोरीप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता,जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पो.नि.दिलीप पवार यांचा तपास सुरु होता. या दरम्यान, पो.नि. पवार यांना तांत्रिक व गोपनीय माहितीनुसार हा गुन्हा हर्षा काळे (देवळगावसिद्धी) याने व त्याच्या साथीदाराने केल्याची माहिती मिळाली. ठिकाणी जाऊन पोलिसांनी आरोपींच्या वास्तव्याबाबत माहिती काढली, यात देवळगावसिद्धी येथील डोंगरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथके तयार करून सापळा लावून आरोपी हर्षा काळे याला पाठलाग करून पकडले. गुन्ह्याबाबत आरोपी काळे याला विचारल्या प्रथम उडावाउडवीची उत्तरे दिली. तद्नंतर पोलीस खाक्या दाखविताच, गुन्हा हा साथीदार संतोष उर्फ सक्तेश रकड्या भोसले (वय २९, रा.देलवाडी, ता.दौंड, जि.पुणे), श्रीखंड्या जिवालाल चव्हाण (वय ३५, रा.रेणुकामाता मंदिर मागे, केडगाव, अहमदनगर) आणि एक (अल्पवयीन) असे मिळून केल्याचे सांगितले. या सर्वांना पोलीसांनी ताब्यात घेतले.आरोपी हर्षद काळे व श्रीखंड्या जिवालाल चव्हाण याने ३ हजार रु.किंमतीचा ५ किलो २६६ ग्रँम वजनाचा पितळी पंचधातूचे मुखवट, पितळी प्लेट काढून दिल्याने रितसर पंचनामा करून जप्त करण्यात आले.उर्वरित चोरीचा माल भिवसेन रखमाजी पडोळकर (रा.देऊळगावसिद्धी, वाघमोडे वस्ती ता.जि.अहमदनगर) याला विक्री केल्याचे सांगितले. त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून ६७ ग्रँम वजनाचे २ हजार ६८० रु.चे सहा चांदीचे घोडे पंचनामा करून ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली ४० हजार रु.कि.ची शाईन दुचाकी आरोपी हर्षा काळे याच्या कडून जप्त केली, असा एकूण ४५ हजार ६८० रु.चा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला. पकडण्यात आलेले सर्वच आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यात हर्षा काळे याचावर पारनेर, बेलवंडी व नगर तालुका पोलीस ठाण्यात तर श्रीखंड्या चव्हाण याचा वर कोतवाली, श्रीगोंदा, नगर तालुका पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव मार्गदर्शनाखाली कर्जत विभागाचे पोहेकाँ अंकुश ढवळे, स्था.गु.शा.चे संदीप पवार यांना माहिती मिळाली. यानंतर पो.नि.दिलीप पवार यांच्या पथकातील सपोनि संदीप पाटील, पोहवा दत्तात्रय हिंगडे, विजयकुमार वेठेकर, पोना संदिप कचरु पवार, संदिप पोपट पवार, भागिनाथ पंचमुख, रविंद्र कर्डीले, पोकाँ विनोद मासाळकर, योगेश सातपुते, सुरज वाबळे, मेघराज कोल्हे, पोना दीपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, चापोहवा बाळासाहेब भोपळे आदिच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment