Latest Post

बुलडाणा - 10 जून
बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट एका गोठयात वन विभागाने अवैधरित्य ठेवलेले सागवानचे लाकुड पकडले आहे.या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       अवैधरित्य झाडे तोडून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.बुलडाणा तालुक्यात अजिंठा पर्वत रांग असून मोठ्या प्रमाणात जंलातून वृक्षतोड मुळे आज जंगल नामशेष होत आहे.आज 10 जून रोजी बुलडाणा वन परिक्षेत्र अंतर्गतच्या ग्राम देऊळघाट जवळ उमाळा रोडवरील एका गोठयात अवैध रित्य कापलेला सागवान असल्याची माहिती वन विभागला मिळाली असता उपवन संरक्षक संजय माळी,सहायक वन संरक्षक रणजीत गायकवाड व वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन रक्षक शीला खरात, वनसेवक के.एन.चौहान यांनी इतर वन मजूरांच्या सोबत  सदर ठीकाणी दुपारी जावून माहितीची खात्री करुण धाड टाकली असता सदर ठीकाणी सागवानचे गोल व चौकोन असे एकूण 13 नग किंमत 23 हजार 269 रुपयेचा माल मिळून आला.या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वनपाल राहुल चौहान यांच्या नेतृत्वात वनरक्षक शीला खरात  आहे.

बेलापूर: (प्रतिनिधी  )-कोरोना महामारीतुन  सावरत सरकारने लाँक डाऊन च्या नियमात शिथिलता आणुन व्यवसायीकांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली  असली तरी ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या परवानाधारक टॅक्सी व रिक्षा याकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अहमदनगर जिल्हा टॅक्सी  असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुथा  यांनी केला आहे      प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मुथा यांनी म्हटले आहे की सरकारने सर्वच क्षेत्रातील व्यवसाय पूर्व पदावर आणण्यासाठी नियमात टप्याटप्याने  शिथिलता आणली आहे मुंबईसारख्या शहरांमध्ये काही नियम व अटी घालून मीटर टॅक्सीना परवानगी देण्यात आली आहे परंतु शहरात मीटरप्रमाणे भाडे आकारणी असल्यामुळे एक किंवा दोन प्रवासी असले तरी आर्थिक दृष्ट्या परवडते परंतु  ग्रामीण भागात  ही मीटर संस्कृती आज पावेतो रुजलेली नाही म्हणूनच वाहनाच्या  आसनक्षमते एवढी   प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी शासनाने   द्यावी अशी मागणी मुथा  त्यांनी केली आहे सुमारे अडीच महिन्यांपासून परवानाधारकांची  वाहनेच जागेवरच उभे आहेत या काळात व्यासायचं बंद झाल्याने भविष्यासाठी केलेली बचत ही संपली आहे  अनेकांनी कर्ज काढुन वहाने खरेदी केलेली आहेत त्यांना प्रपंच चालविणे अवघड झाले आहे तर गाडीचे हप्ते कोठुन भरणार  आता गाडीचे चाक हलले  नाही तर वाहन धारकाची  चूल पेटणार नाही अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शासनाने या गंभीर परिस्थितीची  दखल घेऊनग्रामीण भागातील टँक्सी चालकांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी  या वाहनधारकांच्या  असंतोषाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो या अडचणीच्या काळात दिल्ली सरकारने प्रत्येक परवानाधारक वाहनधारकांच्या खात्यावर पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही परवानाधारक वाहनचालकांना आर्थिक मदत करून त्यांची आणि त्यांच्या परिवाराची होणारी उपासमार थांबवावी  ग्रामीण भागात वाहनाच्या  आसन  क्षमतेनुसार प्रवासी वाहतुकीला परवानगी देऊन त्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी द्यावी तसेच पर्यावरण कर इन्शुरन्स पासिंग मध्ये सवलत द्यावी अशी मागणी मुथा यांनी  केली आहे.

बेलापूर :(प्रतिनिधी  )-नाभिक समाजाला व्यवसाय करण्याची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ नाभिक बांधवांनी काळ्या फिती लावुन आपली नाराजी व्यक्त करत ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांना निवेदन दिले.शासनाने नाभिक समाजाला व्यवसाया करण्यास परवानगी नाकारली त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा सर्व नाभिक बांधवांनी निषेधा व्यक्त केला मंगल कार्यालय लग्न सोहळे यांना शासनाने परवानगी दिली तसेच काही अटीवर ईतर व्यवसायीकांना देखील परवानगी दिली तशीच परवानगी सलुन व्यवसायीकांना द्यावी अशी मागणी नाभिक संघटनेने केली आहे नाभिक महामंडळाच्या आदेशानुसार स्थनिक नाभिक संघटनेने महाराष्ट्र सरकारचा जाहिर निषेध व्यक्त केला.सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत प्रत्येक नाभिक दुकान चालकाने स्वतःच्या दुकानासमोर हातात निषेधाचे फलक घेऊन व काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला.यावेळी त्यांच्या हातातील निषेधाच्या फलकावरील वाक्ये लक्ष वेधून घेत होती,"आम्ही समजदार,आम्हीहि घेवू काळजी,पण तुम्ही द्या परवानगी","माझं दुकान, माझा अधिकार, न्यायासाठी, हक्कासाठी"अश्या प्रकारचे फलक हातात घेवून आपापल्या दुकानासमोर निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी काही व्यवसायिकांनी आपले मत व्यक्त केले कि,लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कसे तरी चरीतार्थ चालवला पण आज मात्र इतर  सर्व व्यवसाय चालू झाले तरी  सलून व्यवसाय मात्र बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने काढले ते खुपच अन्यायकारक आहे.योग्य ती खबरदारी घेवून तसेच सर्व प्रकारच्या दक्षता घेवून व्यवसाय चालू करायला सरकारने अटि व शर्ती वर परवानगी द्यावी.इतर राज्यांमधे सलून व्यवसायास परवानगी मिळालेली असताना महाराष्ट्र राज्यात दुजाभाव का केला जातो?खरेतर गर्दी होवू शकेल असे उद्योग व्यवसाय चालू असताना मग फक्त काय सलून बंदीमुळेच कोरना आटोक्यात राहिल काय?
तसे पाहिले तर सलून व्यवसायिक आपला जीव धोक्यात घालून ,स्वछतेचे काम करणारा आरोग्य दुतच आहे. शासनाने आमच्या सह घरातल्या सदस्यांना विमा संरक्षण दिले पाहिजे.
या आंदोलन प्रसंगी सर्व समाज बांधवांनी अ.नगर येथे चालू असलेल्या उपोषणाला जाहिर पाठिंबा व्यक्त केला.यावेळी नाभिक समाज संघटणेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन दिले.

मुंबई  (प्रतिनिधी )- कोरोनामुळे एखाद्या स्वस्त धान्य दुकानदारांचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण दिले जाईल तसेच मोफत तांदुळाचेही कमीशन लवकरच दिले जाईल असे अश्वासन वित्त मंत्री नामदार अजित दादा पवार यांनी धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळांला दिले  असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे.  कोरोनाच्या संकट काळात धान्य दुकानदार आपला जिव धोक्यात घालुन काम करत असल्यामुळे त्यांना विमा संरक्षण द्यावे तामीळनाडू राज्या   प्रमाणे दुकानदारांना वेतन देण्यात यावे मोफत धान्य वाटपाचे कमिशन तातडीने देण्यात यावे पाँज मशिनला येणार्या अडचणी दुर करण्यात याव्यात या मागणी करीता  आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष  गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै पासुन संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता या बाबत सर्व संबधीतांना निवेदन पाठविण्यात आले होते संपाचा आज नववा दिवस होता धान्य दुकानदारांच्या संपाबाबत योग्य तो तोडगा काढण्यासाठी विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पुढाकार घेवुन वित्त मंत्री मा नामदार अजित दादा पवार याच्या समवेत बैठक लावुन घेतली या वेळी शिष्टमंडळासमोर बोलताना वित्तमंत्री नामदार अजित दादा म्हणाले की सध्याची कोरोनाची गंभीर परिस्थिती पहाता दुकानदारांनी संप करणे योग्य नाही एखाद्या दुकानदारांचा कोरोनाची बाधा होवुन मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण कवच  दिले जाईल तसेच मोफत धान्य वाटपाचे कमीशनही दुकानदारांना अदा करण्यात येईल शासन धान्य दुकानदारा बाबत सकारात्मक असुन दुकानदारांनीही आपले काम चोख बजवावे  दुकानदारांनी तातडीने संप मागे घेवुन कार्डधारकांना मालाचे वाटप सुरु करावे असेही ते म्हणाले वित्त मंत्री अजित दादा पवार यांनी अश्वासन दिल्यामुळे धान्य दुकानदारांनी वाटप सुरु करावे असे अवाहन जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  सचिव रज्जाक पठाण कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे विश्वासराव जाधवा बाबासाहेब ढाकणे विजय दिघे मोहीते पाटील बाबा कराड सुरेश उभेदळ बजरंग दरंदले माणिक जाधव ज्ञानेश्वर वहाडणे गजानन खाडे गणपतराव भांगरे आदिंनी केले आहे   मंत्रालय मुंबई  येथे झालेल्या बैठकीस विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळअन्न व नागरी पुरवठा मंत्री  छगनरावजी भुजबळ आमदार हिरामन खोसकर आमदार नितीन पवार विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे सचिव गोपाल मोरे आदि उपस्थित होते

बुलडाणा - 9 जून
8 मे रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मका खरेदी करण्यासाठी आदेश दिलेले असतांना बुलडाणा जिल्ह्यात अजूनपर्यंत कुठेही मका खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले नाही. याबाबत दिनांक प्रशासनाला पत्रव्यवहार करून ही  मका खरेदी सुरु झाले नसल्याने आज 9 जून रोजी भाजपा आमदार श्वेता महाले यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकन्यांच्या हितासाठी ठियया आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविला आहे.
    बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत 6 हजाराच्या वर शेतकन्यांनी मका हमीभाव केंद्रात मका देण्यासाठी नोंदणी केलेली आहे . मका नोंदणीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एकाच सेंटर असल्याने जिल्हा भरात अनेक मका उत्पादक शेतकरी असतांना केवळ तालुक्याच्याच ठिकाणी नोंदणी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी पासून वंचित राहावे लागले आहे .शासनाने खरेदी केलेल्या तूर , हरभरा , कापूस याचे पैसे मिळालेले नाही . मका घरात असूनही शासन खरेदी करीत नाही आणि खुल्या बाजारात मकाला किंमत नाही त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरिता तातडीने हमीभावाने मका खरेदी करण्यात यावी . शासनाने खरेदी केलेल्या कापूस , तूर , हरभरा याचे पैसे शेतकन्याच्या खात्यात जमा करा . पीककर्जाचे वाटप जलद गतीने करा .नोंदणी केलेल्या शेतकन्यांची राहिलेली तूर , हरभरा तात्काळ घेण्यात यावे .अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आमदार श्वेता महाले यांनी देत शासकीय धोरणचा निषेध व्यक्त करत आपल्या मागणीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.या वेळी आंदोलनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संक्रापूर  ( प्रतिनिधी  )- पाच सहा गावातील नागरीकांना जाण्यासाठी एका शेतकऱ्यांने आपल्या शेतातून रस्ता करुन दिला असुन फुटभर बांधावरुन एकमेकाची डोकी फोडणार्यांपुढे एक आदर्श ठेवला आहे.गळनिंब तालुका श्रीरामपूर येथुन संक्रापूर येथे जाण्याकरीता प्रवरा नदीवरील  बंधार्या रुन जावे लागते परंतु बधार्या लगत गळनिंब येथील पोपटराव गाडेकर यांची शेत जमीन आहे याच शेत जमीनीतून संक्रापूर आबी दवणगाव अंमळनेर गंगापुर येथील नागरीकांना कसे बसे  वाट काढत जावे लागत होते या बाबत संक्रापूरचे सरपंच रामा पांढरे यांनी पोपटराव गाडेकर यांची भेट घेवुन आपल्या जमीनीतून रस्ता करुन देण्याची विनंती केली पाच सहा गावातील नागरीकांची गैरसोय लक्षात घेता सरपंच पांढरे याच्या मागणीला शेतकरी गाडेकर यांनी लगेच संमती दिली कसलाही गाजावाजा न करता गाडेकर यांनी आपल्या शेतातून चार चाकी वाहन जाईल ईतका रस्ता करुन देण्यास संमती दिली गाडेकर यांची संमती मिळताच सरपंच पांढरे यांनी तातडीने जे सी बी आणला पत्रकार देविदास देसाई  सुभाष जगताप रोहीदासा खपके सुभाष दाते ईब्राहीम शेख राजु चिंधै गंगा भोसले कैलास जाटे संदीप वडीतके गोरख वडीतके यांच्या उपस्थितीत रस्ता तयार करण्यात आला कच्चा मातीचा आसणार्या या रस्त्यावर आता लोकवर्गणीतून मुरुम टाकला जाणार आहे पाच सहा गावातील नागरीकांना जाता येताना त्रास होत होता शेतकरी गाडेकर यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे व सरपंच रामा पांढरे यांनी पुढाकार घेतल्यामुळे परिसरातील नागरीकांनी गाडेकर व पांढरे यांना धन्यवाद दिले आहे .

श्रीरामपूर - येथील बैतुशशिफा हाँस्पिटल व अल-आफाक फौडेशन चे अध्यक्ष डॉ. सलीम सिकंदर शेख यांनी पवित्र रमजान महिन्यात रमजान व कोरोना ,कोविड१९ विषयी अतिविशेष सामाजिक जनजागृती वर महिनाभर अतिउत्तम प्रतिपद्धतीने " ईसलाम समजुन घेताना " ही ३० लेखाची सर्व धार्मियांना समजेल आशी लेख मालिका लिहीली .त्याचबरोबरीने corona,covid वर जानजाग्रुती उत्तम प्रकारे केली ,
मागील १९९९  पासून दरवर्षी कोणत्या ना कोणत्या दैनिक पेपर्स मधून डॉ. सलीम शेख हे आपल्या आभ्यासु लेखातून सामाजिक ,शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील आपले बहुमुल्य योग दान देऊन सर्व समाजात ईसलाम धर्माविषयी गैरसमज दुर व्हावे व ईसलाम विषयी चांगली माहिती सर्व धार्मिय लोकांपर्यंत पोहचवावी   म्हणून सलग महीनाभर ३० लेख व स्वतः रोजे ठेवून व आपले वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्व उत्तम प्रकारे पारपाडुन ईसलाम समजुन घेताना ही लेख विविध दैनिक पेपर्सच्या  व सोशल मेडीयाच्या माध्यमातून सर्व स्थरातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले .यावर्षी हि अगदी उत्तम प्रकारे दैनिक राष्ट्र सह्याद्री या दैनीकातून केले. त्यांच्या या कार्याबद्दल राज्यभरातुन त्यांचे विविध स्थरातुन कौतुक होत आहेत व विविध सामाजिक संघटना कडून त्यांचे अभिनंदन व विशेष सत्कार होत आहेत 
आशिच सामाजिक बांधीलकी जपणारे डॉ सलीम यांचा श्रीरामपूर शहरातील सामाजिक संघटनेचे "मिल्लत-ऐ-ईब्राहीम '
व" संविधान बचाव संघटना " यांच्या वतीने अध्यक्ष अहमदभाई जाहागीरदार ,हाजी साजिदभाई  मिर्जा, आदिलभाई मखदुमी ,राजूभाई दारूवाला ,हाजी ऐजाजभाई दारूवाला व ईकबाल ईसमाईल काकर सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .
सत्काराला उत्तर. डॉ. सलीम यांनी दिले की जो चांगले काम करील त्या सर्वांचे असेच हिम्मत व ऊर्जा देत राहा व धण्यवाद दिले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget