Latest Post

बेलापूर  (प्रतिनिधी )- अन्न व औषध प्रशसनाने बेलापूरातील एका ठिकाणी छापा टाकुन साडे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असुन एका व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन बेलापूर हे गुटखा अन मटका केंद्र बनले असल्याचे उघड झाले आहे.या घटने बाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी साहेबराव विष्णू मुळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अन्न व औषध प्रशासनास मिळालेल्या गुप्त माहीती नुसार फिर्यादी मुळे हे पंच शकुर जब्बार शेख अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त के जी गोरे सुर्यवंशी नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर आदिसह बेलापूरातील पढेगाव रोड येथे दाखल झाले त्या वेळी महींद्रा बोलेरो पिकअप एम एच १८ए ए ६४५० ही आरोपी मदन विजय कणगरे घेवुन जात असताना सदर गाडी अडवुन चौकशी केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली असता त्यात  ६० हजार रुपयांचा हिरा पान मसाला व ९० हजार रुपयांचा राँयल  तंबाखू व टेम्पो असा ४ लाख ५०हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असुन पोलीसांनी मुद्देमाल वाहन जप्त केले आहे                         शासनाने गुटखा बंदी केल्यानंतरही बेलापूर गावात गुटखा अन मटका जोरात चालु होता अनेकाचा गुप्त आशिर्वाद या व्यवसायाला मिळत असल्यामुळे हा व्यवसाय खुले आम सुरु होता अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण गुटक्याच्या अहारी जावुन मटका खेळत आहे काही महीन्यापूर्वीही एका गोडावुन मधुन गुटख्याची चोरी झाली होती त्याही प्रकरणात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती इतक्या दिवस खुलेआम विकल्या जाणार्या गुटख्याची खबर अचानक कशी लागली  रात्री एक वाजता आलेले पथक चार वाजेपर्यंत  बेलापूरातील पढेगाव रोडवरील त्या ठिकाणी थांबले असल्याची चर्चा असुन केवळ टेम्पो चालक आरोपी करण्यात आला आहे गुटख्या प्रमाणे बेलापूर गावात मटकाही जोमात चालु असुन त्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे आनेक गोर गरीब लोक दिवसभर कष्ट करुन तो पैसा मटक्यात लावत आहे बेलापूर गाव हे मटका व गुटखा मूक्त करावे अशी मागणी केली जात आहे

बेलापूर  (प्रतिनिधी )- अन्न व औषध प्रशसनाने बेलापूरातील एका ठिकाणी छापा टाकुन साडे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असुन एका व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन बेलापूर हे गुटखा अन मटका केंद्र बनले असल्याचे उघड झाले आहे                                    या घटने बाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी साहेबराव विष्णू मुळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अन्न व औषध प्रशासनास मिळालेल्या गुप्त माहीती नुसार फिर्यादी मुळे हे पंच शकुर जब्बार शेख अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त के जी गोरे सुर्यवंशी नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर आदिसह बेलापूरातील पढेगाव रोड येथे दाखल झाले त्या वेळी महींद्रा बोलेरो पिकअप एम एच १८ए ए ६४५० ही आरोपी मदन विजय कणगरे घेवुन जात असताना सदर गाडी अडवुन चौकशी केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली असता त्यात  ६० हजार रुपयांचा हिरा पान मसाला व ९० हजार रुपयांचा राँयल  तंबाखू व टेम्पो असा ४ लाख ५०हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असुन पोलीसांनी मुद्देमाल वाहन जप्त केले आहे                         शासनाने गुटखा बंदी केल्यानंतरही बेलापूर गावात गुटखा अन मटका जोरात चालु होता अनेकाचा गुप्त आशिर्वाद या व्यवसायाला मिळत असल्यामुळे हा व्यवसाय खुले आम सुरु होता अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण गुटक्याच्या अहारी जावुन मटका खेळत आहे काही महीन्यापूर्वीही एका गोडावुन मधुन गुटख्याची चोरी झाली होती त्याही प्रकरणात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती इतक्या दिवस खुलेआम विकल्या जाणार्या गुटख्याची खबर अचानक कशी लागली  रात्री एक वाजता आलेले पथक चार वाजेपर्यंत  बेलापूरातील पढेगाव रोडवरील त्या ठिकाणी थांबले असल्याची चर्चा असुन केवळ टेम्पो चालक आरोपी करण्यात आला आहे गुटख्या प्रमाणे बेलापूर गावात मटकाही जोमात चालु असुन त्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे आनेक गोर गरीब लोक दिवसभर कष्ट करुन तो पैसा मटक्यात लावत आहे बेलापूर गाव हे मटका व गुटखा मूक्त करावे अशी मागणी केली जात आहे

श्रीरामपूर (प्रतिनिधी  )-स्वस्त धान्य दुकानदारांना माल वाटप करताना कोरोनाची लागण झाल्यास त्याचे कुटुंब उघड्यावर पडेल हे लक्षात घेवुन शासनाने दुकानदाराचा विमा उतरावा या मागणी करीता धान्य दुकानदारांनी संप पुकारला असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे     कोरोना लढ्यात स्वस्त धान्य दुकानदाराचा मोलाचा वाटा आहे सर्व जण घरात बसलेले असताना स्वस्त धान्य दुकानदार आपला जिव धोक्यात घालुन धान्याचे वाटप करत आहे हे करत असताना मुंबई नांदेड पुणे येथील धान्य दुकानदारांना  कोरोनाची लागण झाली पुण्यातील दुकानदाराचे कोरोनामुळे निधन झाले त्यामुळे त्या दुकानदारांचे कुटुंब  उघड्यावर पडलेले आहे राज्यातील सर्व दुकानदार दररोज शेकडो कार्डधारकांना मालाचे वितरण करत आहेत हे करत असताना सर्व नियम पाळले तरी एखादा बाधीत व्यक्ती आल्यास दुकानदारांना बाधा होवु शकते शासनाने कोरोना संकटकाळात कार्य करणार्या सर्वांना विमा कवच दिलेले आहे परंतु दुकानदाराचा त्यात समावेश केलेला नाही त्यामुळे दुकानदारांना विमा सरंक्षण द्यावे ही आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स फेडरेशनची मागणी आहे या मागणी करीता राज्यातील दुकानदारांनी अध्यक्ष गजानन बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे दुकानदारांना विमा संरक्षण देण्याबाबत विचार सुरु असल्याचे महीन्यापूर्वीच सांगितले होते परंतु शसनास निवेदन देवुनही संघटनेच्या रास्त मागणीचा शासनाने विचार न केल्यामुळे दुकानदारांना संपावर जाण्याचा निर्णय घ्यावा लागला तरी धान्य दुकानदारांना तातडीने विमा संरक्षण द्यावे असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर सचिव रज्जाक पठाण कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे सुरेश उभेदळ बाबा कराड बजरंग दरंदले विश्वासराव जाधव बाळासाहेब दिघे बाबासाहेब मोहीते गजानन खाडे रावसाहेब भगत चंद्रकांत झुरंगे मणीक जाधव सुरेश कोकाटे मुकुंद सोनटक्के मोहीते पाटील गणपत भांगरे आदिंच्या सह्या आहेत.

श्रीरामपूर - राज्यातील नागरिकांचे चार महिन्याचे प्रति माह २०० युनिट पर्यंत विजेचे बिल माफ करण्याबाबत आम आदमी पार्टीचे राज्यव्यापी  आंदोलन
राज्यात महा विकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री च्या  नेतृत्वात कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटाला प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने हाताळत आहात, मागील अडीच महिन्यापासून राज्यातील उद्योग,
व्यापार व बाजारपेठा पूर्णपणे ठप्प झाली आहे यामुळे व्यापारी, कामगार,शेतकरी, शेतमजूर, फुटपाथवर बसून आपले पोट भरणारे सर्व नागरिक आर्थिकदृष्ट्या फारच संकटात आले आहेत काही प्रमाणात यामधील कामगार आणि
शेतमजूर यांना राशन च्या माध्यमातून धान्याची मदत शासनाकडून झालेले आहे
परंतु गहू तांदूळ मिळाली म्हणजे घर चालेते असे नाही या सोबत किराणा, भाजीपाला, दुध, दवाखाना,  किंवा इतर खर्च अनिवार्य आहे राज्यातील छोटे-मोठे सर्वच रोजगाराचे साधन काही काळ बंद पडल्यामुळे राज्यातील
नागरिकांच्या घरात किंवा हातात पैसे सुद्धा बाकी नाही अशा
परिस्थितीत विद्युत बिल, घरपट्टी पाणीपट्टी   बिले नागरिकांना आज न उद्या भरावेच लागणार आहेत परंतु आणिखी काही महिने या आर्थिक अडचणीतून
सामान्य नागरिकांना सावरणे फारच कठीण होईल यासाठी थोडी का होईना मदत म्हणून राज्यातील ज्या नागरिकांच्या विजेचे महिन्याला २०० युनिट 
सर्व (ग्राहक) नागरिकांचे विजेचे बिल माफ करावे, ही आज
 राज्यातील सर्व जनतेची मागणी आहे  दिल्लीतील श्री अरविंद केजरीवाल सरकार गेल्या दोन
वर्षांपासून २०० युनिट पर्यंत वीज मोफत देता आहे याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही मोठ्या मनाने चार महिन्याचे विजेचे बिल
तातडीने माफ करावे  शक्य झाल्यास कायमस्वरूपी करण्याची घोषणा करावी 
अन्यथा आम्हाला राज्यातील जनतेला घेवून नाईलाजास्तव रस्तावर उतरून आंदोलन
करावे लागेल असा इशारा आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल  यांनी दिला आहे विज बिल माफ करण्यात यावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने तहसीलदार  यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच गणेश  छल्लारे ,शहरध्यक्ष प्रताप राठोर, उत्तर जिल्हा प्रवक्ते प्रवीण जमदाडे ,शहर उपाध्यक्ष किशोर वाडीले, राहुल रणपिसे, भरत डेंगळे ,आदित्य पठारे, दीपक परदेशी, शिवा गोरे सचिन आजगे,दिनेश यादव  यशवंत जेठे सलीम शेख, आधी सामाजिक अंतर ठेवून या आंदोलना प्रसंगी उपस्थित होते.

कोल्हार (साईप्रसाद कुंभकर्ण ) :- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे 57  वर्षीय  व्यक्तीचे कोरणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने लोणी खुर्द गाव 14 दिवसांसाठी म्हणजे 15/ 6/ 20 20पर्यंत पूर्णपणे लोक डाऊन करण्यात आले असल्याची माहिती  दाढ येथील आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीपाद मैड व ग्रामविकास अधिकारी संतोष थिगळे यांनी दिली लोणी खुर्द येथील 57 वर्षीय व्यक्तीस त्रास जाणवू लागल्याने त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठवले असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉक्टर श्रीपाद मैड यांनी सांगितले या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोणी खुर्द ,दाढ ,आडगाव ,कोल्हार बुद्रुक येथील सतरा व्यक्तींना शिर्डी येथे विलगी करण कक्षात ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टर मैड व ग्राम विकास अधिकारी थिगळे यांनी सांगितले.

बेलापूर  (प्रतिनिधी  )-बेलापूर ग्रामपंचायतीच्या मासीक बैठकीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्यामुळे सत्ताधार्यांनाच विरोधकाची भूमिका बजावण्याची वेळ आली असुन सत्ताधार्यांनीच कामाच्या बिला संदर्भात विरोध करण्याची ही पहीलीच वेळ आहे      तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून बेलापूर गावची ग्रामपंचायत ओळखली जाते या पचांयतीत एकुण सदस्य संख्या १७ आहे सध्या पंचायतीत काँग्रेस व जनता अघाडीची सत्ता आहे दोघांनीही सरपंच पद आडीच आडीच वर्ष तसेच उपसरपंच पदही वाटून घेतले होते आडीच वर्ष जनता आघाडीचा सरपंच  होता त्यानंतर काँग्रेसच्या राधाताई बोंबले सरपंच  झाल्या बेलापूर ग्रामपंचायतीची मुदत आँगस्ट महीन्यात संपत असुन राजकीय वातावरण आत्ताच तापु लागले आहे बेलापूर ग्रामपंचायतीच्या बँक खात्याच्या पुस्तकाची तसेचा झालेल्या कामाची व अदा केलेल्या बिलाची माहीती अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी मागीतली होती त्यातच बेलापूर ग्रामपंचायतीची मासीक बैठक संपन्न झाली या बैठकीत सदस्यांना न विचारता अनेक कामे केल्याचे व बिलही अदा केल्याचे उघड झाले त्यामुळे उपसरपंच रविंद्र खटोड भरत साळुंके यांनीच बैठकीत विरोध नोंदवीला बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणार्या पाण्याच्या टाकीवर कँमेरे बसविण्यात आले एकच काम असताना त्या कामाचे दोन बिल काढण्यात आले ५० हजार रुपयाच्या पुढे असणार्या काणाची ई निविदा करण्याचे आदेश असताना पाच सी सी टिव्ही कँमेर्याचे पहीले बिल ४९३२४ रुपये अदा केल्यानंतर दोनच महीन्यात पुन्हा ३९१४७ रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे तसेच संगणक  खरेदी करुन बराच कालावधी लोटला तरी तो संगणक पचांयतीत आला नव्हता परंतु खंडागळे यांनी लेखी माहीती मागताच खरेदी केलेला संगणक अचानक प्रगट झाला मग  ईतके दिवस तो संगणक कुठे होता असा प्रश्न सदस्यांना पडला बेलापूर ग्रामपंचायतीने अंगणवाडी करीता तीन लाख रुपयांची खेळणी खरेदी केली गावात एकुण १९ अंगणवाडी असाताना सहाच सेट खरेदी करण्यात आले असुन तीन लाख रुपयाची खरेदी केलेली खेळणी ग्रामपंचायत जागेत ठेवण्या ऐवजी एका खाजगी जागेत ठेवण्यात आली असुन या खेळण्याचे ई परचेस करण्या ऐवजी एका वर्तमान पत्रात जाहीरात छापुन ती खेळणी खरेदी करण्यात आली असुन या खरेदी बाबतही सदस्यांना काहीच माहीत नसल्याचे म्हणणे आहे शिवाय नियम डावलुन ही खरेदी करण्यात आल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी )-महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा बेलापूरच्या मुख्य चौकात असणार्या पुतळ्या भोवतीचे  सरंक्षण कठडे तोडून सहा महीने झाले परंतु ई निविदा न झाल्यामुळे  अजुनही त्या कामास सुरुवात झाली नाही या बाबत ग्रामपंचायतीस जाब विचारण्याची वेळ आली आहे        बेलापूरच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असुन या पुतळ्यास संरक्षक कठडे बसविण्यात आले होते परंतु  ग्रामपंचायतीने ते कठडे नविन  बसविण्याच्या नावाखाली जानेवारी महीन्यात तोडले  त्या ठिकाणी  नविन कठडे बसविण्याचा निर्णय घेतला तो निर्णय एकदम घाईत घेण्यात आला नविन संरक्षक कठडे त्याचा नकाशा त्यासाठी लागणारा निधी काम पूर्ण होण्यास लागणारा कालावधी या बाबींचा गांभीर्याने विचार न करता पुतळ्या भोवती असलेले संरक्षक कठडे तोडण्यात आले  त्यांनतर काही शिवप्रेमींनी सरपंच  उपसरपंच यांना या कामाबाबत सांगितले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनीही फेब्रुवारी महीन्यात ग्रामपंचायतीस लेखी निवेदन दिले त्या वेळेसे ग्रामविकास अधीकार्यांनी ई निविदा झाली नसुन या कामा करीता  निधी राखीव असल्याचे सांगितले  होते या नंतर कामास सुरुवात करण्यात आल्याचे भासविण्यात आले  अन निधी अभावी ते काम अर्धवटच सोडून देण्यात आले या ठिकाणाहून दररोज शेकडो जबाबदार नागरीक जातात परंतु कुणीही या बाबत ग्रामपंचायतीला साधा जाब विचारला नाही गावात अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली कामे चालू आहे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवतीचे संरक्षक कठडे तातडीने पूर्ण होणे आवश्यक  होते परंतु या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले जर पंचायतीकडे निधीच नव्हता तर ते कठडे का तोडले यास जबाबदार कोण जुने कठडे कुणाच्या परवानगीने तोडले ते तोडताना वेगवेगळ्या ठिकाणाहून निधी आणून काम तातडीने पूर्ण करु अशी ग्वाही ग्रामस्थांना देण्यात आली होती मग आता घोडे नेमके अडले कोठे  दुर्दैवाने काही घटना घडल्यास एखादे जनावर तेथे घुसल्यास  त्यास जबाबदार कोण राहणार असा सवाल शिवप्रेमी नागरीकाकडून विचारला जात आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget