Latest Post

बेलापूर येथील कॉलेज ची  माजी विद्यार्थिनी प्रेरणा क्षत्रिय (माळोकर) यांनी
 "लढा  कोरोनाशी" हा  प्रबोधनात्मक व्हिडीओ तिच्या एस एस के कीटी ग्रूप च्या माध्यमातून  सद्या सोशल मीडियावर बराच गाजतो आहे, प्रेरणा क्षत्रिय ( माळोकर) ह्या बेलापूर येथील पत्रकार दिपकसा क्षत्रिय यांच्या कन्या आहेत .मुळातच सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून अनेक पारितोषिक तिने पटकाविले असून कुकीज अँड बेकरीज  चे येवल्यात ट्रेनिंग सेंटर चालावत असून ऑफिशियल ब्युटीशीयन म्हणून कार्यरत आहेत ,"कोरोनाशी लढा " या उपक्रमाबद्दल तीचे कॉलेजच्या प्राचार्या साहित्यिक डॉ.गुंफा कोकाटे ,तसेच  अशोक स .सा.कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे , व अनेक मान्यवरांनी तिचे सर्वत्र अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .

दिनांक १३/०५/२०२० रोजी फिर्यादी श्री. मुकेश कुमार जयस्वाल, वय- २७ वर्षे, धंदा- ट्रक ड्रायव्हर, रा. घुलेवाडी फाटा,संगमनेर, ता- संगमनेर हे त्यांचे ताब्यातील ट्रक नं. एमएच-१५-डी.के-६६०० ही घेवून क्लिनर कलामुद्दीन इद्रीसी याचेसह नांदेड येथून परभणी, माजलगांव, गढी, खरवंडी, पाथर्डी, अ.नगर मार्ग संगमनेर येथे जात असताना दुपारी ३/३० वा.चे सुमारास टाकळी फाटा, ता- पाथर्डी येथे आले असता पाठीमागून टेम्पो नं. एमएच-१६-सीसी-६७०८ यामधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी फिर्यादीचे ट्रकला टेम्पो आडवा लावून ट्रक अडवून फिर्यादीस मारहाण करुन फिर्यादी जवळील रोख रक्कम, मोबाईल व गाडीतील टेपरेकॉर्डर असा एकूण ३०,०००/-रु. किं. चा ऐवज बळजबरीने चोरुन नेला. त्याबाबत फिर्यादी यांनी दि. १४/०५/२०२० रोजी पाथर्डी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 1 २६७/२०२०, भादवि कलम ३९४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून पोनि दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी वरिष्ठांचे आदेशाने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकातील पोलीस कर्मचारी पोना संतोष लोढे, रविन्द्र कर्डीले, रवि सोनटक्के, प्रकाश वाघ, रविन्द्र पुंगासे, विनोद मासाळकर, जालिंद माने अशांनी मिळून तात्काळ पाथर्डी येथे जावून फिर्यादी यांची भेट घेवून गुन्ह्यातील आरोपी व त्यांचे वर्णनाबाबत माहीती घेतली.त्यानंतर श्री. मंदार जवळे साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग, तसेच त्यांचे कार्यालयातील पोकॉ/सागर बुधवंत, चालक पोका/ संदीप चव्हाण, पाथर्डी पो.स्टे. चे पोनिरित्नपारखी, पोहेकॉ अरविंद चव्हाण, काकासाहेब राख, चालक पोहेकॉ/तांबे असे सर्वजण मिळून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा जाकीर शेख, रा. कुंदे टाकळी, तापाथर्डी याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहीती पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना मिळाल्याने
त्या माहीतीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे (१) जाकीर सुभान शेख वय २४ वर्ष रा. कुंदे टाकळी, ता- पाथर्डी यास ताब्यात घेतले. त्याचेकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वसात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार रुपचंद आंधळे, शंकर कुंदे व गोकुळ फंदे अशांनी मिळुन रुपचंद आंधळे याचे जवळील टेम्पो मधुन जावुन केला असल्याचे माहिती दिल्याने त्यावरुन आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे (२) शंकर नारायण कुँदे वय २६ वर्ष रा. कुँदे टाकळी ता. पाथर्डी (३) रुपचंद श्रीधर आंधळे वय २८ वर्ष रा.जिरेवाडी ता.पाथर्डी (४) गोकुळ राधाकिसन कुँदे वय २५ वर्ष रा. कुँदे टाकळी ता. पाथर्डी यांना वेगवेगळया ठिकाणा वरुन ताब्यात घेतले आहे. आरोपी कडुन गुन्हा करण्यासाठी वापरलेला ९,००,०००/- रु. किमतीचा टेम्पो नंबर एमएच-१६-सी.सी-६७०८ हा जप्त करण्यात आलेला असुन आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही पाथर्डी पो.स्टे. हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सागर पाटील सा अपर र अधीक्षक, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. श्री. मंदार जवळे साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, शेवगांव विभाग व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी )-कोरोना विरुद्ध अहोरात्र लढणाऱ्या कोरोना वरिअर्स यांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांना आणखी  स्फूर्ती मिळण्यासाठी तसेच कोरोनाचा या जगातून लवकर नायनाट व्हावा यासाठी श्री साईबाबांना प्रार्थना करत शिर्डी व परिसरात हजारो साई भक्तांनी आपल्या घरात कुटुंबासहित सामूहिक श्री साई चरित्र ग्रंथाचे पारायण करत व सामूहिक घरात आरती करत श्री साईबाबांकडे साकडे घातले, या या उपक्रमात शिर्डी व परिसरातील मोठ्या संख्येने साई भक्त व हजारो कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते,जगभरात कोरोनाने हाहाकार माजला असून दररोज देशात, जगात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत, अशा कोरोना विरोधात लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, महसूल, अधिकारी-कर्मचारी ,स्वच्छता कर्मचारी,प्रत्रकार, प्रशासन व
प्रत्येक जण आपापल्या परीने अहोरात्र काम करीत आहे, असे कोरोनावॉरियर्स आपला जीव धोक्यात घालून कोरोनाला हटवण्यासाठी लढा देत आहेत, रुग्णांची सेवा करीत आहेत,यालॉकडाउन काळात सर्वसामान्य गोरगरीब व सर्व नागरिक घराघरात आहेत, त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत आहेत ,सुविधा पुरवीत आहेत, अशा सर्वाना  पूर्ती मिळावी मिळावी, त्यांचे कौतुक अभिनंदन व्हावे, म्हणून व या देशातून, जगातून कोरोनाचा लवकर नायनाट व्हावा, यासाठी श्री साईबाबांना आज साकडे घालण्यात आलेआहे, शिर्डी येथील श्री साई निर्माण ग्रुप द्वारकामाई प्रतिष्ठान, श्री साई संदेश प्रतिष्ठान रुई यांच्यावतीने आज गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत शिर्डी व परिसरातील प्रत्येक घराघरात श्री मंगलाचरण, श्री साईस्तवनमंजरी व लकी ड्रॉ द्वारे निघालेल्या अध्यायाचे वाचन आपल्या घरात राहून देवघरासमोर किंवा श्री साईंच्या प्रतिमेसमोर मनोभावे करून सामूहिक श्री साईचरित्र पारायण विस्तृत स्वरूपात शिर्डी व परिसरात घराघरात करण्यात आले, लॉकडाऊन चे नियम पाळत प्रत्येकाने आपापल्या घरात श्री साईचरित्र पारायण यांचे वाचन करून श्री साईबाबांची प्रार्थना करत कोरोनाला हटवण्या साठी साईबाबांकडे साकडे घातले, या धार्मिक उपक्रमाला शिर्डी व परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला, असाच सामूहिक पण घराघरात श्री साई चरित्र पारायणा चा दुसरा टप्पा पुढच्या गुरुवारी दिनांक 21 मे रोजी संपूर्ण राहता तालुक्यात गावागावात होणार आहे ,,तसेच गुरुवार दिनांक 28 मे रोजी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील ,प्रत्येक गावागावात असाच श्री साई चरित्र पारायणा चा सामूहिक पण घराघरात  धार्मिक उपक्रम राबवला जाणार असून गुरुवार दिनांक   4 जून रोजी संपूर्ण देशभर असाच उपक्रम राबवला जाणार आहे, त्यानंतर 11 जून 20 20 रोजी संपूर्ण जगात करोडच्या संख्येने अनेक देशात साईभक्त असून या सर्व साईभक्तांच्या द्वारे संपूर्ण जगात असेच घराघरात राहून कुटुंब सदस्य कडून श्री साई चरित्र ग्रंथाचे मनोभावे पारायण करण्यात येणार आहे, तरी पुढच्या गुरुवारी ही तालुक्यातील प्रत्येक गावातील साई भक्तांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री साई निर्माण ग्रुप चे अध्यक्ष विजुभाऊ कोते यांनी व श्री साई निर्माण ग्रुप द्वारकमाई प्रतिष्ठान व साई संदेश प्रतिष्ठानने केले आहे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी )-राहता तालुक्यातील शिर्डी जवळील साकुरी शिवारात एका विहिरी मध्ये एक महिला पाण्यात मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे, लॉकडाउनच्या काळातच ही घटना घडल्याने या परिसरात मोठी चर्चा होत आहे,
 शिर्डी जवळील साकुरी शिवारात साई अपार्टमेंट नजीकच्या एका विहिरीत आज गुरुवारी तेथील एका व्यक्तीच्या पाहण्यात ही मृत महिला विहिरीत पडलेली दिसली, त्यामुळे या व्यक्तीने या विहीर मालकाला व  राहता पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर येथे  काही  लोक व पोलीस येऊन पाहणी केली असताही ही महिला पंजाबी ड्रेस घातलेल्या अवस्थेत पालथी पाण्यात विहिरीत पडलेली होती, दहा ते बारा दिवसांपूर्वी ही महिला या विहिरीत पडलेली असावी असा तेथील परिस्थिती वरून अंदाज व्यक्त होत होता, सध्या लॉक डाऊन सुरू आहे, त्यामुळे सर्व जण घरात आहेत ,त्यामुळे या विहिरीच्या परिसरात कोण येते, कोण जाते ,हे लवकर लक्षात येत नाही ,त्यामुळे ही घटना घडून काही दिवस झाले असावेत,लॉकडाउनमुळे ही घटना लवकर लक्षात आली नाही, जेव्हा या परिसरात एक व्यक्तीने विहिरीत यामृत महिलेला बघितली, त्यानंतर या घटनेची ची चर्चा सुरु झाली ,यासंदर्भात राहता पोलीस स्टेशनची संपर्क केला असता राहता परिसरात कोणतीही महिलेची मिसिंग केस नसल्याचे सांगण्यात आले, या घटनेसंदर्भात राहता पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहेत, मात्र ही घटना लॉक डाऊन च्या बंद काळात घडल्यामुळे शिर्डी व परिसरातउलट सुलट मोठी चर्चा घडत आहे, ही आत्महत्याच असावी, असा अनेकांचा कयास आहे व तसे परिसरात बोलले जात होते, मात्र ही महिला कोण कुठून आली व ही घटना कधी घडली हे गुलदस्त्यात आहे.

उक्कलगाव ।  येथील प्रगतशील शेतकरी व अशोक कारखान्याचे शेतकी विभागाचे कर्मचारी दिपक बाबुराव (विठ्ठलराव) थोरात (वय 48)(दि 13) काल उक्कलगाव मधीलच यांच्या शेताजवळून जाणाऱ्या प्रवरा नदीपात्रात पडून दुर्दैवी मृत्यु झाला कालच ते पाच वाजता सुमारास शेतातच औषध फवारणी करत होते पाणी संपले म्हणून ते नदीपात्राकडे गेले असता पाणी घेत असतानाच त्यांचा तोल जावुन नदीत पडले त्याठिकाणावर नदीपात्र खोल असल्याने कारणाने अन् दुर्दैवाने त्यांना पोहता येत नव्हते काही अंतरावर असणार्‍या पुतण्या राहुल याने त्यांच्या घटना लक्षात येताच त्याने पाण्यात उडी घेतली त्यालाही पोहता येत नव्हते त्यावेळीच आसपास कोणीही नव्हते त्यामुळे त्याचेही प्रयत्न निष्फळ ठरले अश्याप्रकारे त्यांची  गावातच खबर लागताच नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली होती बेलापूर पोलिस नाईक ढोकणे पोलिस भोईटे घटनास्थळी दाखल झाले होते उक्कलगाव मधील काही पोहणारे तर गळनिंब लट्टल पोहणारे तरुणाच्या मदतीने शोध मोहिम सुरू करत अवघ्या काही तासातच मृतदेह तरुणाच्या हाती लागला होता कोणतेही विलंब न करताच साखर कामगार  रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला रात्री उशिराच उक्कलगाव अमरधामात अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले दिपक थोरात हे अत्यंत सरळ मार्गाने चालणारे मितभाषी स्वभावाचे होते नुकताच काही महिन्यांपूर्वी त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा विवाह सध्या पध्दतीने झाला होता समाजासमोर ते एक आदर्श ठेवून गेले देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराजांचे ते शिष्य होते महाराजांच्या हस्ते हनुमानची स्थापनाही केली होती यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सुन पाच भाऊ बहीण चुलते पुतणे भावजया असा मोठा परिवार असुन अशोक कारखान्याचे माजी चेअरमन रावसाहेब हरी थोरात यांचे ते पुतणे, शरद बाबुराव थोरात यांचे ते कनिष्ठ बंधु होत यांच्या अकाली निधनाने उक्कलगाव व अशोक अद्योग समूहात शोककळा पसरली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )-श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवक पती पत्नीस गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना राहाता तालुक्यातील चितळी  राहाता रस्त्यावर पाटबंधारे खात्याच्या बंगल्या जवळ काल बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाऊर येथील रंजना शिंदे (खोपडी-कोपरगाव येथे कार्यरत) तर पती ग्रामसेवक मधुकर गंगाधर आग्रे (राहाता पंचायत समितीत कार्यरत) हे दाम्पत्य आपले कर्तव्य बजावून घरी जाण्यास मोटारसायकवरून निघाले होते. सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास चितळी राहाता रस्त्यावर पाटबंधारे खात्याच्या बंगल्या जवळ आले असता पाठीमागून दोन पल्सलवर पाठलाग करत चार तरूणांनी त्यांना चितळी शिवारात रेल्वे स्टेशन जवळील गोडावून नजीक कट्ट्याचा धाक दाखविला.या दाम्पत्यास मारहाण करून 39 हजार रूपये किंमतीचे मणी मंगळसुत्र, 3 ग्रॅम व 1 हजार रूपयाची रोकड या लुटारूंनी लांबविली. याप्रकरणी रात्री उशीरा मधुकर आग्रे यांनी फिर्याद दिली. त्यावरून चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. शिंदे करीत आहेत.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी ) कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या मालेगावला दुरुस्त करण्याच्या उद्देशाने, मालेगाव मिशन मोडवर दत्तक घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. यासंदर्भात बुधवारी (ता. 13) आरोग्यमंत्री राजेश टोपे मालेगाव दौऱ्यावर होते. मालेगाव येथील कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासंदर्भात त्यांच्याच आढावा महापालिका आयुक्त.बैठकीत होते .पण अचानक अहवाल समजताच त्याच क्षणी आयुक्त बैठकीतून बाहेर पडले.
 मालेगवकरांसाठी बुधवारचा आजचा दिवस चिंताजनक असून (ता.१३) धक्कादायक बातमीने साऱ्यांनाच घाम फुटला. चक्क मालेगावचे महापालिका आयुक्त यांचा अहवालच कोरोना संसर्ग बाधीत आल्याने आता खळबळ माजली आहे. तसेच सहाय्यक आयुक्तासह 11 नवीन पाँझिटिव्ह देखील आढळले आहेत.
आरोग्यमंत्री मिटींगमधून तडकाफडकी रवाना.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget