महामार्गावर वाहन अडवून चालकास मारहाण करुन लुटमार करणारे आरोपी १२ तासांचे आत जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा व उपविभागिय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांची संयुक्त कारवाई.

दिनांक १३/०५/२०२० रोजी फिर्यादी श्री. मुकेश कुमार जयस्वाल, वय- २७ वर्षे, धंदा- ट्रक ड्रायव्हर, रा. घुलेवाडी फाटा,संगमनेर, ता- संगमनेर हे त्यांचे ताब्यातील ट्रक नं. एमएच-१५-डी.के-६६०० ही घेवून क्लिनर कलामुद्दीन इद्रीसी याचेसह नांदेड येथून परभणी, माजलगांव, गढी, खरवंडी, पाथर्डी, अ.नगर मार्ग संगमनेर येथे जात असताना दुपारी ३/३० वा.चे सुमारास टाकळी फाटा, ता- पाथर्डी येथे आले असता पाठीमागून टेम्पो नं. एमएच-१६-सीसी-६७०८ यामधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी फिर्यादीचे ट्रकला टेम्पो आडवा लावून ट्रक अडवून फिर्यादीस मारहाण करुन फिर्यादी जवळील रोख रक्कम, मोबाईल व गाडीतील टेपरेकॉर्डर असा एकूण ३०,०००/-रु. किं. चा ऐवज बळजबरीने चोरुन नेला. त्याबाबत फिर्यादी यांनी दि. १४/०५/२०२० रोजी पाथर्डी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 1 २६७/२०२०, भादवि कलम ३९४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून पोनि दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी वरिष्ठांचे आदेशाने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकातील पोलीस कर्मचारी पोना संतोष लोढे, रविन्द्र कर्डीले, रवि सोनटक्के, प्रकाश वाघ, रविन्द्र पुंगासे, विनोद मासाळकर, जालिंद माने अशांनी मिळून तात्काळ पाथर्डी येथे जावून फिर्यादी यांची भेट घेवून गुन्ह्यातील आरोपी व त्यांचे वर्णनाबाबत माहीती घेतली.त्यानंतर श्री. मंदार जवळे साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग, तसेच त्यांचे कार्यालयातील पोकॉ/सागर बुधवंत, चालक पोका/ संदीप चव्हाण, पाथर्डी पो.स्टे. चे पोनिरित्नपारखी, पोहेकॉ अरविंद चव्हाण, काकासाहेब राख, चालक पोहेकॉ/तांबे असे सर्वजण मिळून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा जाकीर शेख, रा. कुंदे टाकळी, तापाथर्डी याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहीती पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना मिळाल्याने
त्या माहीतीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे (१) जाकीर सुभान शेख वय २४ वर्ष रा. कुंदे टाकळी, ता- पाथर्डी यास ताब्यात घेतले. त्याचेकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वसात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार रुपचंद आंधळे, शंकर कुंदे व गोकुळ फंदे अशांनी मिळुन रुपचंद आंधळे याचे जवळील टेम्पो मधुन जावुन केला असल्याचे माहिती दिल्याने त्यावरुन आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे (२) शंकर नारायण कुँदे वय २६ वर्ष रा. कुँदे टाकळी ता. पाथर्डी (३) रुपचंद श्रीधर आंधळे वय २८ वर्ष रा.जिरेवाडी ता.पाथर्डी (४) गोकुळ राधाकिसन कुँदे वय २५ वर्ष रा. कुँदे टाकळी ता. पाथर्डी यांना वेगवेगळया ठिकाणा वरुन ताब्यात घेतले आहे. आरोपी कडुन गुन्हा करण्यासाठी वापरलेला ९,००,०००/- रु. किमतीचा टेम्पो नंबर एमएच-१६-सी.सी-६७०८ हा जप्त करण्यात आलेला असुन आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही पाथर्डी पो.स्टे. हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सागर पाटील सा अपर र अधीक्षक, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. श्री. मंदार जवळे साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, शेवगांव विभाग व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget