उक्कलगाव । येथील प्रगतशील शेतकरी व अशोक कारखान्याचे शेतकी विभागाचे कर्मचारी दिपक बाबुराव (विठ्ठलराव) थोरात (वय 48)(दि 13) काल उक्कलगाव मधीलच यांच्या शेताजवळून जाणाऱ्या प्रवरा नदीपात्रात पडून दुर्दैवी मृत्यु झाला कालच ते पाच वाजता सुमारास शेतातच औषध फवारणी करत होते पाणी संपले म्हणून ते नदीपात्राकडे गेले असता पाणी घेत असतानाच त्यांचा तोल जावुन नदीत पडले त्याठिकाणावर नदीपात्र खोल असल्याने कारणाने अन् दुर्दैवाने त्यांना पोहता येत नव्हते काही अंतरावर असणार्या पुतण्या राहुल याने त्यांच्या घटना लक्षात येताच त्याने पाण्यात उडी घेतली त्यालाही पोहता येत नव्हते त्यावेळीच आसपास कोणीही नव्हते त्यामुळे त्याचेही प्रयत्न निष्फळ ठरले अश्याप्रकारे त्यांची गावातच खबर लागताच नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली होती बेलापूर पोलिस नाईक ढोकणे पोलिस भोईटे घटनास्थळी दाखल झाले होते उक्कलगाव मधील काही पोहणारे तर गळनिंब लट्टल पोहणारे तरुणाच्या मदतीने शोध मोहिम सुरू करत अवघ्या काही तासातच मृतदेह तरुणाच्या हाती लागला होता कोणतेही विलंब न करताच साखर कामगार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला रात्री उशिराच उक्कलगाव अमरधामात अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले दिपक थोरात हे अत्यंत सरळ मार्गाने चालणारे मितभाषी स्वभावाचे होते नुकताच काही महिन्यांपूर्वी त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा विवाह सध्या पध्दतीने झाला होता समाजासमोर ते एक आदर्श ठेवून गेले देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराजांचे ते शिष्य होते महाराजांच्या हस्ते हनुमानची स्थापनाही केली होती यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सुन पाच भाऊ बहीण चुलते पुतणे भावजया असा मोठा परिवार असुन अशोक कारखान्याचे माजी चेअरमन रावसाहेब हरी थोरात यांचे ते पुतणे, शरद बाबुराव थोरात यांचे ते कनिष्ठ बंधु होत यांच्या अकाली निधनाने उक्कलगाव व अशोक अद्योग समूहात शोककळा पसरली आहे.
Post a Comment