शिर्डी (राजेंद्र गडकरी )-राहता तालुक्यातील शिर्डी जवळील साकुरी शिवारात एका विहिरी मध्ये एक महिला पाण्यात मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे, लॉकडाउनच्या काळातच ही घटना घडल्याने या परिसरात मोठी चर्चा होत आहे,
शिर्डी जवळील साकुरी शिवारात साई अपार्टमेंट नजीकच्या एका विहिरीत आज गुरुवारी तेथील एका व्यक्तीच्या पाहण्यात ही मृत महिला विहिरीत पडलेली दिसली, त्यामुळे या व्यक्तीने या विहीर मालकाला व राहता पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर येथे काही लोक व पोलीस येऊन पाहणी केली असताही ही महिला पंजाबी ड्रेस घातलेल्या अवस्थेत पालथी पाण्यात विहिरीत पडलेली होती, दहा ते बारा दिवसांपूर्वी ही महिला या विहिरीत पडलेली असावी असा तेथील परिस्थिती वरून अंदाज व्यक्त होत होता, सध्या लॉक डाऊन सुरू आहे, त्यामुळे सर्व जण घरात आहेत ,त्यामुळे या विहिरीच्या परिसरात कोण येते, कोण जाते ,हे लवकर लक्षात येत नाही ,त्यामुळे ही घटना घडून काही दिवस झाले असावेत,लॉकडाउनमुळे ही घटना लवकर लक्षात आली नाही, जेव्हा या परिसरात एक व्यक्तीने विहिरीत यामृत महिलेला बघितली, त्यानंतर या घटनेची ची चर्चा सुरु झाली ,यासंदर्भात राहता पोलीस स्टेशनची संपर्क केला असता राहता परिसरात कोणतीही महिलेची मिसिंग केस नसल्याचे सांगण्यात आले, या घटनेसंदर्भात राहता पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहेत, मात्र ही घटना लॉक डाऊन च्या बंद काळात घडल्यामुळे शिर्डी व परिसरातउलट सुलट मोठी चर्चा घडत आहे, ही आत्महत्याच असावी, असा अनेकांचा कयास आहे व तसे परिसरात बोलले जात होते, मात्र ही महिला कोण कुठून आली व ही घटना कधी घडली हे गुलदस्त्यात आहे.
Post a Comment