Latest Post

उक्कलगाव ।  येथील प्रगतशील शेतकरी व अशोक कारखान्याचे शेतकी विभागाचे कर्मचारी दिपक बाबुराव (विठ्ठलराव) थोरात (वय 48)(दि 13) काल उक्कलगाव मधीलच यांच्या शेताजवळून जाणाऱ्या प्रवरा नदीपात्रात पडून दुर्दैवी मृत्यु झाला कालच ते पाच वाजता सुमारास शेतातच औषध फवारणी करत होते पाणी संपले म्हणून ते नदीपात्राकडे गेले असता पाणी घेत असतानाच त्यांचा तोल जावुन नदीत पडले त्याठिकाणावर नदीपात्र खोल असल्याने कारणाने अन् दुर्दैवाने त्यांना पोहता येत नव्हते काही अंतरावर असणार्‍या पुतण्या राहुल याने त्यांच्या घटना लक्षात येताच त्याने पाण्यात उडी घेतली त्यालाही पोहता येत नव्हते त्यावेळीच आसपास कोणीही नव्हते त्यामुळे त्याचेही प्रयत्न निष्फळ ठरले अश्याप्रकारे त्यांची  गावातच खबर लागताच नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली होती बेलापूर पोलिस नाईक ढोकणे पोलिस भोईटे घटनास्थळी दाखल झाले होते उक्कलगाव मधील काही पोहणारे तर गळनिंब लट्टल पोहणारे तरुणाच्या मदतीने शोध मोहिम सुरू करत अवघ्या काही तासातच मृतदेह तरुणाच्या हाती लागला होता कोणतेही विलंब न करताच साखर कामगार  रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला रात्री उशिराच उक्कलगाव अमरधामात अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले दिपक थोरात हे अत्यंत सरळ मार्गाने चालणारे मितभाषी स्वभावाचे होते नुकताच काही महिन्यांपूर्वी त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा विवाह सध्या पध्दतीने झाला होता समाजासमोर ते एक आदर्श ठेवून गेले देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराजांचे ते शिष्य होते महाराजांच्या हस्ते हनुमानची स्थापनाही केली होती यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सुन पाच भाऊ बहीण चुलते पुतणे भावजया असा मोठा परिवार असुन अशोक कारखान्याचे माजी चेअरमन रावसाहेब हरी थोरात यांचे ते पुतणे, शरद बाबुराव थोरात यांचे ते कनिष्ठ बंधु होत यांच्या अकाली निधनाने उक्कलगाव व अशोक अद्योग समूहात शोककळा पसरली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )-श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामसेवक पती पत्नीस गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना राहाता तालुक्यातील चितळी  राहाता रस्त्यावर पाटबंधारे खात्याच्या बंगल्या जवळ काल बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाऊर येथील रंजना शिंदे (खोपडी-कोपरगाव येथे कार्यरत) तर पती ग्रामसेवक मधुकर गंगाधर आग्रे (राहाता पंचायत समितीत कार्यरत) हे दाम्पत्य आपले कर्तव्य बजावून घरी जाण्यास मोटारसायकवरून निघाले होते. सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास चितळी राहाता रस्त्यावर पाटबंधारे खात्याच्या बंगल्या जवळ आले असता पाठीमागून दोन पल्सलवर पाठलाग करत चार तरूणांनी त्यांना चितळी शिवारात रेल्वे स्टेशन जवळील गोडावून नजीक कट्ट्याचा धाक दाखविला.या दाम्पत्यास मारहाण करून 39 हजार रूपये किंमतीचे मणी मंगळसुत्र, 3 ग्रॅम व 1 हजार रूपयाची रोकड या लुटारूंनी लांबविली. याप्रकरणी रात्री उशीरा मधुकर आग्रे यांनी फिर्याद दिली. त्यावरून चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. शिंदे करीत आहेत.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी ) कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या मालेगावला दुरुस्त करण्याच्या उद्देशाने, मालेगाव मिशन मोडवर दत्तक घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. यासंदर्भात बुधवारी (ता. 13) आरोग्यमंत्री राजेश टोपे मालेगाव दौऱ्यावर होते. मालेगाव येथील कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासंदर्भात त्यांच्याच आढावा महापालिका आयुक्त.बैठकीत होते .पण अचानक अहवाल समजताच त्याच क्षणी आयुक्त बैठकीतून बाहेर पडले.
 मालेगवकरांसाठी बुधवारचा आजचा दिवस चिंताजनक असून (ता.१३) धक्कादायक बातमीने साऱ्यांनाच घाम फुटला. चक्क मालेगावचे महापालिका आयुक्त यांचा अहवालच कोरोना संसर्ग बाधीत आल्याने आता खळबळ माजली आहे. तसेच सहाय्यक आयुक्तासह 11 नवीन पाँझिटिव्ह देखील आढळले आहेत.
आरोग्यमंत्री मिटींगमधून तडकाफडकी रवाना.

शिरडी (राजेंद्र  गडकरी)-कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉक डाउनचा  तिसऱ्या टप्यात  परराज्यातील लोकांना शासनाने गावी जाण्यासाठी  परवानगी दिल्याने अनेक परप्रांतीय आपल्या राज्यात परत जात आहेत शासन त्याची रेल्वे, बसने व्यवस्था करत आहे शिरडीतुन दोन रेल्वे उ,प्रदेशात सोडल्या होत्या व आता शिर्डी येथून पहिली बस  परराज्यात जाण्यासाठी सोडली जात आहे  आज शिर्डीतून पहिली बस विनामुल्य २१ प्रवाश्यांना घेवुन छत्तीसगडच्या देवरीपाससाठी रवाना करण्यात आली,आपल्या गावी  जाणारे लोक मोठे आनंदित  दिसत होते,या नतंरही महाराष्ट्,कर्नाटक,तेलगणा,आध्रंप्रदेश ,गुजरात या राज्यात बसेस राहाता तहसिलमधुन आदेश आला तर सोडल्या जाणार आहेत,५०दिवसानी शिर्डी बस स्थानकात प्रवासी व बसेस बघायला मिळत होते,लॉकडाऊन चे नियम पाळले जात होते,जाणारे लोक  प्रशासनाचे आभार मानत होते,  अनेकाकडे मोठे संसाराचे गाठोडे दिसत होते,येथुन घरी परतत।असताना त्याच्यां चेह्रयावर कही खुशी कही गम ही दिसत होते,येथे कामधंदा।होता, घरी काय करणार। आपल्या।राज्यात गेल्यानंतर  परत महाराष्ट्रात लवकर येता येईल का।असे काही यावेळी बोलत होते, प्रशासनाने चांगली सोय केली ,निवास, भोजनही दिले,असे सांगत त्यानी सगळ्याचे आभारही मानले,काहीच्या डोळ्यात पाणी येत होते,कोरोनापासुन देशाला लवकर मुक्त कर असे काही सांगत होते,साईबाबांना साकडे।घालत होते,यावेळी शिर्डी बसस्थानकात महसुलचेअधिकारी,पोलीस ,
डॉक्टर,व मोजकेच लोक उपस्थित होते,टाळ्या वाजवत व साईच्या जयजयकाराने ही पहीली बस येथुन रवाना करण्यात आली,त्यावेळी तहसीलदार कुंदन हिरे यांनी ड्रायवर व  कंडेकटर यांचे सत्कार केले.

श्रीरामपूर (वार्ताहर) सध्या कोरोना आजाराने थैमान घातले आहे त्यापार्श्वभूमीवर सगळयाच यंत्रणा जागरुक होऊन दक्षता घेतांना दिसत आहे. मात्र श्रीरामपूर नगरपरिषद त्याला अपवाद असून पालिकेचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा समोर आले आहे.
             याबाबत असे की, सध्या कोरोना आजारांमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट झाले असतांना श्रीरामपूर नगरपरिषदेची रुग्णवाहिका गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले आहे.
             श्रीरामपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांना याचा प्रत्यय आला आहे. रुग्णवाहिका म्हणजे अत्यावश्यक सेवा आणि आताच्या या संकटाच्या काळातच पालिकेची रुग्णवाहिका गेल्या काही दिवसांपासून ना दुरुस्त असल्याने  नगरपरिषद प्रशासन गंभीर नसल्याचे पून्हा एकदा दिसून आले आहे.
               दोन ते तीन दिवसांपासून शहरातील वेग वेगळे नागरिक नगरपरिषदेच्या रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधत आहे परंतु वाहन विभागातील कर्मचारी नागरिकांना रुग्णवाहिका ना दुरुस्त असल्याचे सांगत आहे आणि त्याचा प्रत्यय छल्लारे यांना आला आहे.
            याबाबत अधिक विचारपूस केली असता असे सांगण्यात आले की, वेळेवर सर्व्हिसिंग न झाल्याने सदरची रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीचे काम गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाण्याच्या टाकीजवळ चालू आहे त्यामुळे नगरपरिषद प्रशासन किती जागरुक आहे हे दिसून येते आहे.
श्रीरामपूर नगरपरिषदेचे सुमारे १५० कोटींचे वार्षिक बजेट आहे. आणि अश्या अटीतटीच्या प्रसंगी अत्यावश्यक सेवेचा बोजवारा उडाला आहे. यापुर्वी देखील पालकीचे अत्यावश्यक सेवा देणारे वाहन कधी डिझेल अभावी तर कधी गाडीचे टायर खराब झालेने बंद असतात. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन नेमकी करते काय असा प्रश्न उपस्थित होतो.

श्रीरामपूर . (प्रतिनिधी )-दीड-पावणे दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार व श्रीरामपूर नगर पालिकेने केलेल्या नियोजनानुसार आज श्रीरामपूरातील बाजारपेठ उघडण्यात आली . दुकानदारांचा अर्धा दिवस दुकानातील झाडलोट आणि धूळ साफ करण्यातच गेला . शहरात आज खरेदी करणाऱ्यांपेक्षा रस्त्यावर फिरणाऱ्या बघ्यांचीच जास्त गर्दी दिसून आली . नगरपालिकेने निर्माण केलेल्या नियंत्रक पथकात सदस्य संख्या सुद्धा जास्त असल्याने रस्त्यावर त्यांचेच टोळके दिसून येत होते.व्यापारी
असोसिएशनने प्रांत अधिकार्‍याकडे केलेली मागणी, त्याला जिल्ह्याचे वजनदार मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिलेला पाठिंबा आणि नागरिकांची ताणलेली उत्सुकता या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने मंगळवारी संध्याकाळी उशीरा शहरातील बाजारपेठ उघडण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार आज सकाळी मुख्य बाजारपेठेतील सर्व रस्त्यांवर एका बाजूची दुकाने उघडण्यात आली. मेन रोड, शिवाजी रोड वर पश्चिम मुखी तर नेवासा संगमनेर रोडवर दक्षिणमुखी दुकाने सुरू करण्यात आली.सकाळपासूनच दुकानदारांनी आपली दुकाने उघडून थाटण्यास सुरुवात केली. बारा वाजेपर्यंत दुकानातील झाडलोट व स्वच्छता सुरू होती. कारण दीड महिन्यापेक्षा जास्त काळ दुकाने बंद असल्यामुळे दुकानात सर्वत्र धूळ साचलेली दिसून आली.रस्त्यावर दुकानात जाणाऱ्या ग्राहकांपेक्षा  रस्त्यावर फिरणाऱ्या बघ्यांचीच गर्दी अधिक प्रमाणात होती.बाजार पेठेतील दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांची सात पथके तयार केली. प्रत्येक पथकामध्ये दहा ते पंधरा लोकांचा समावेश होता. त्यांना नेमून दिलेल्या रस्त्यावर हे सर्व लोक दुकानदारांना व नागरिकांना सूचना देत होते. नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी समीर शेख, उपमुख्याधिकारी प्रकाश जाधव. सोफिया बागल व त्यांचे सहकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. मुख्याधिकारी शेख स्वतः रस्त्यांवर फिरुन दुकानदारांना काळजी घेण्याचे आवाहन करीत होते.  व्यापारी पेठेतील दुकानदारांनी ग्राहकांसाठी सैनीटायझरची व्यवस्था केली होती . इतर कुठेही रांगा नव्हत्या . मात्र दारूच्या दुकानांसमोर खरेदीसाठी मद्यपींच्या मोठया रांगा लागल्या होत्या . या रांगा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत होत्या .
  रस्ता मोकळा करा

शहरातील सर्वत्र रस्ते सुरू करण्यात आलेले असताना श्रीरामपूर शहराला दक्षिणोत्तर जोडणाऱ्या सय्यद बाबा चौकतील धान्य गोडाऊन जवळ बंद केलेला रस्ता मात्र सुरू करण्यात न आल्याने वार्ड नंबर 1,2, गोंधवणी रोड, पंजाबी कॉलनी, मिल्लत नगर या भागातील लोकांना रेल्वे पुलाच्या पलीकडे जाण्यासाठी मोठा वळसा घालून यावे लागत होते. सगळीकडे जर बाजारपेठ सुरू करण्यात आली आहे तर हा रस्ता देखील मोकळा करण्यात यावा.  संध्याकाळी पाच नंतर सकाळी नऊ पर्यंत तो बंद करण्यात यावा अशी मागणी दोन्ही बाजूकडील नागरिकांनी केली आहे.

शिरडी (राजेंद्र गडकरी)-अहमदनगर जिल्हयात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्याकामी महत्वाचा निणर्य .घेण्यात आलाआहे,जिल्हात तारकपूर बसस्थानक अहमदनगर, पारनेर बसस्थानक, श्रीरामपूर बसस्थानक, आणि कोपरगांव बसस्थानक या चार ठिकाणी एक खिडकी कक्ष कार्यन्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.त्यासाठी, महसुल, मोटार वाहन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणारी समिती गठीत करण्यात आली आहे. नायब तहसीलदार (महसुल), मोटार वाहन निरिक्षक, आगार व्यवस्थापक आणि वैदयकिय अधिकारी यांचा या समितीत समावेश असेल.ही समिती एक खिड़की कक्षांतर्गत खालील प्रमाणे कार्यवाही करणार आहे.
यामध्ये, परराज्यात जाणा-या मजुरांची नोंद घेऊन त्यांच्या राज्यनिहाय याद्या तयार करणे, त्यास मान्यता देणे आणि मान्यता प्राप्त यादीतील मजुरांची वैदयकिय अधिकारी यांच्यामार्फत स्क्रिनिंग करणे व त्यांना प्रमाणपत्र देणे आदी जबाबदारी असणार आहे.याशिवाय, मजुरांच्या संख्येनुसार सामाजिक अंतर (5ocial distancing) चे पालन करुन बसेसची संख्या निश्चित करणे, आगार व्यवस्थापकांनी तात्काळ मोफत बसेस उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करणे, प्रवाश्यांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध असल्याची खात्री करणे, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडण्याची कार्यवाही करणे आदी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.कोणतीही व्यक्ती / संस्था / संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लघन केल्यास भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कार्यवाहीस पात्र असतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे, या मुळे अनेकाना आता आपल्या राज्यातजाणे सोयास्कर होणार।आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget