शिरडी (राजेंद्र गडकरी)-कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉक डाउनचा तिसऱ्या टप्यात परराज्यातील लोकांना शासनाने गावी जाण्यासाठी परवानगी दिल्याने अनेक परप्रांतीय आपल्या राज्यात परत जात आहेत शासन त्याची रेल्वे, बसने व्यवस्था करत आहे शिरडीतुन दोन रेल्वे उ,प्रदेशात सोडल्या होत्या व आता शिर्डी येथून पहिली बस परराज्यात जाण्यासाठी सोडली जात आहे आज शिर्डीतून पहिली बस विनामुल्य २१ प्रवाश्यांना घेवुन छत्तीसगडच्या देवरीपाससाठी रवाना करण्यात आली,आपल्या गावी जाणारे लोक मोठे आनंदित दिसत होते,या नतंरही महाराष्ट्,कर्नाटक,तेलगणा,आध्रंप्रदेश ,गुजरात या राज्यात बसेस राहाता तहसिलमधुन आदेश आला तर सोडल्या जाणार आहेत,५०दिवसानी शिर्डी बस स्थानकात प्रवासी व बसेस बघायला मिळत होते,लॉकडाऊन चे नियम पाळले जात होते,जाणारे लोक प्रशासनाचे आभार मानत होते, अनेकाकडे मोठे संसाराचे गाठोडे दिसत होते,येथुन घरी परतत।असताना त्याच्यां चेह्रयावर कही खुशी कही गम ही दिसत होते,येथे कामधंदा।होता, घरी काय करणार। आपल्या।राज्यात गेल्यानंतर परत महाराष्ट्रात लवकर येता येईल का।असे काही यावेळी बोलत होते, प्रशासनाने चांगली सोय केली ,निवास, भोजनही दिले,असे सांगत त्यानी सगळ्याचे आभारही मानले,काहीच्या डोळ्यात पाणी येत होते,कोरोनापासुन देशाला लवकर मुक्त कर असे काही सांगत होते,साईबाबांना साकडे।घालत होते,यावेळी शिर्डी बसस्थानकात महसुलचेअधिकारी,पोलीस ,
डॉक्टर,व मोजकेच लोक उपस्थित होते,टाळ्या वाजवत व साईच्या जयजयकाराने ही पहीली बस येथुन रवाना करण्यात आली,त्यावेळी तहसीलदार कुंदन हिरे यांनी ड्रायवर व कंडेकटर यांचे सत्कार केले.
Post a Comment