Latest Post

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- पोहण्यास गेलेला दहा वर्ष वयाच्या मुलाचा बेलापूर पढेगाव रोडवर असणार्या खटकाळी गावठाण येथील खाणीत असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू  झाला   असुन या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबत समजलेली हाकीकत अशि की खटकाळी गावठाण येथील आदित्य विकास जगताप वय वर्ष १० हा मित्रा समवेत दुपारी २ .३० वाजेच्या सुमारास पोहोण्यास गेला होता पोहत असताना दम तुटल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला ही घटना परिसरात समजताच सुनिल खरात दादु जागताप बाळू जगताप सुमीत ऋषीकेश जींतेंद्र यांनी पाण्यात शोध घेतला अखेर सायंकाळी सहा वाजता त्याचा मृतदेहा सापडला पोलीस नाईक ढोकणे पोपट भोईटे  यांनी त्यास दवाखान्यात  हलविले तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषीत केले त्याच्या पश्चात एक भाऊ तीन बहीणी आई आहेत   या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

'उम्मती फाउंडेशन' तर्फे श्रीरामपुर शहरातील प्रख्यात मधुमेह व हृदयविकारतज्ञ डॉ.दिलीप पडघन यांना नुकतेच  'कोव्हीड वारीअर' या पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उम्मती फाउंडेशनने सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आरोग्यदूतांना सन्मानित करण्याचा एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
        याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपुर शहरात १० एप्रिल रोजी एका करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे डॉ.दिलीप पडघन व प्रयोगशाळा अधिकारी श्री.दिलीप डोखे यांना २८ दिवस क्वारंटाईन राहावे लागले होते. या दोघांनी सदर कोरोना बाधित रुग्णास स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता तात्काळ रुग्णसेवा दिली होती. आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना क्वारंटाईन राहावे लागले होते. अशा आरोग्यदूतांना प्रोत्साहन मिळावे या प्रामाणीक हेतूनेच 'उम्मती'चे अध्यक्ष श्री.सोहेल बारूदवाला यांनी या डॉक्टर द्वयींचा यथायोग्य सन्मान केला. यावेळी डॉ.पडघन व डोखे यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
        सत्कारमूर्ती डॉ.दिलीप पडघन यांनी यावेळी 'उम्मती'च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. आवश्यक खबरदारी घेऊन यथायोग्य रुग्णसेवा देऊनही  क्वारंटाईन राहावे लागले याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच अश्यावेळी समाजाने व माध्यमांनीही अफवा न पसरविता कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करण्याऱ्या आरोग्यदूतांच्या पाठीशी उभे राहावे असा सल्लाही दिला. तसेच क्वारंटाईन कालावधीत त्यांना सहकार्य केलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.जमधडे, इतर स्टाफ व मित्र आप्तेष्टांचे त्यांनी विशेष आभार मानले.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तौफिक शेख यांनी केले, तर फिरोज पठाण व सोनू शेख यांनी डॉक्टरांना उम्मती व समस्त मुस्लिम समाजातर्फे पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

शिरडी (राजेंद्र गडकरी)
शिरडी येथील साई निर्माण ज्युनियर कॉलेज मध्ये ११कॉमर्स मध्ये गौरव जितेश लोकचंदानी हा प्रथम आला आहे,गौरव याला ९२%गुण मिळाले आहे,
येथे इंग्रजीमाध्यमात तो शिकत असुन सुमारे ११वीच्या।तिन्ही शाखेतील १५०विद्यार्थी पैकी गौरव पहीला आला आहे,त्यास प्राचार्य विकास चौधरी, प्रा,मुकेश माळवदे,रमेश काकडे,नवनाथ।वाणी,यांचे मोलाचे मार्गदशर्न लाभले,गौरवला१०वीतही  ९५ %गुण मिळाले होते,तो पहीलीपासुन इंग्रजीमाध्यामातून शिकत आहे,
गौरवचे या यशाबद्दल साई निर्माण ग्रुपचे अध्यश विजयराव कोते, कमलाकर कोते,अभय शेळके, कैलास कोते,राजेंद्र गोंदकर,अविनाश शेजवळ,मनोज लोढा डॉ,राजेद्रं पिपाडा,,जनमत मराठी चनलचे  संपादक राजेद्रं आंबरे,बिनधास्त न्युजचे सपादकं अस्लम बिनसाद,नगर अर्बंचे मॅनेजर सुनील सरोदे,दैनिक साईदर्शन चे  उपसंपादक राजेद्रं गडकरी,तसेच पत्रकार,शिक्षक,आदीसह शिरडी व परिसरातून अभिंनदन केले जात आहे.

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची माहिती
श्रीरामपूर (वार्ताहर) श्रीरामपूरातील व्यवहार सुरळीत चालू करणेकामी मर्चंट असोसिएशनी प्रशासनाला दिलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांनी त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार लहू कानडे यांच्याकडे केली आहे. करण ससाणे यांनी नामदार थोरात यांच्याशी संपर्क साधून श्रीरामपुरातील व्यवहार सुरळीत चालू होणेकरिता मर्चंट असोसिएशनच्या प्रस्तावावर त्वरित निर्णय घेणेकरिता जिल्हाधिकारी यांच्याशी बोलण्याची विनंती केली. यावर नामदार थोरात यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्या प्रस्तावावर त्वरित निर्णय घेण्याचा सूचना केल्या आहेत.
             गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग अडचणीत सापडला आहे. संकटाच्या काळात श्रीरामपुरातील व्यापारी वर्ग सर्वसामान्य जनतेसोबत राहिला त्यामुळे आता सर्व नियमांचे पालन करुन मार्केट मधील दुकानं चालू करावे याकरिता खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार लहू कानडे यांच्या समवेत बैठका पार पडल्या त्यामध्ये माझ्यासह सर्वच पदाधिकारी उपस्थित होते आणि सर्वांचीच भावना होती की, श्रीरामपूरातील व्यवहार चालू व्हावेत. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार मर्चंट असोसिएशनी आपला प्रस्ताव प्रांताधिकारी अनिल पवार यांच्याकडे सादर केला. तो प्रस्ताव प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे.
             सदरच्या प्रस्तावावर त्वरित निर्णय घेण्यासाठी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांची भेट घेऊन नामदार  बाळासाहेब थोरातांशी फोनवरुन बोलणे करुन दिले आहे.याबत नामदार थोरात यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी आपली चर्चा झाली असून  श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्या प्रस्तावावर योग्य तो निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना मदत करण्याबत सूचना केल्या असल्याचे सांगितले आहे. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे,  माऊली प्रतिष्ठनचे ज्ञानेश्वर मुरकुटे उपस्थित होते.

शिरडी ( राजेंद्र गडकरी ) - गेल्या दोन महिन्यापासून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोनाशी  प्रशासनातील योध्दे पोलीस, डॉक्टर, नर्सेस,सफाई कामगार, प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे मनापासून आभार मानण्यासाठी  घरात बसून साईबाबांकडे प्रार्थना करायची असुन  सर्वांवर बाबानी आपले आशिर्वाद कायम ठेवावे... तसेच या कोरोना विषाणूचा संपूर्ण जगातून लवकरात लवकर नायनाट करावा यासाठी साईबाबांकडे साकडे घालण्यासाठी।प्राथना करवयाची आहे,
कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांसाठी , कोरोनाच्या नायनाटासाठी  सामुहिक पध्दतीने साईबाबांकडे प्रार्थना करून.श्री साई निर्माण ग्रुप शिर्डी व साई संदेश प्रतिष्ठान रुई, द्वारकामाई प्रतिष्ठाण शिर्डी यांच्या माध्यमातून साईबाबांच्या आशीर्वादाने विजय  कोते यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तेथे साईसच्चरित्र पारायण सर्व सदस्यांच्या सहकार्याने येत्या गुरुवारपासून एकाच वेळी शिरडीतील प्रत्येक घरात सामूहिक साईसच्चरित्र वाचन करून गुरूवार दु.12 ची आरती सहकुटुंब करून आपआपल्या देवघरात साईबाबांच्या नावाचा सामूहिक गजर करावयाचा आहे ,व आपल्या देवघरातूनचं बाबांचे मनोभावे दर्शन घेऊन सहकुटुंब आशिर्वाद घेवून.कोरोना   हरवण्यासाठी   बाबाना विनतीं करावयाची।आहे,  बाबाच्या कथांचे श्रवण, किर्तन चिंतन करतील त्यांच्या ठायी भक्तीचा उगम होईल आणि अज्ञानाचा नाश होईल म्हणून प्रत्येकाने या साईचरित्राचे मनोभावे श्रवण वाचन करुन व
  अध्याय वाचन स्वतः किंवा घरातील सदस्यांनी घरीच करायचे आहे ,त्यासाठी श्री साई निर्माण ग्रुपच्या माध्यमातून   गुरुवारी 14 मे रोजी  श्री साईसच्चरित्र ग्रंथाच्या सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन केलेले असून या पारायण सोहळ्यात  भाग घेणाऱ्या साई भक्तांनी नोंदणी केल्या नंतर सर्व भक्तांना लकी ड्रा द्वारे अध्याय नंबर दिले जाणार आहेत,बुधवारी संध्याकाळी  सहभागी झालेल्या भक्तांची नावे आणि साई कृपेने त्यांना मिळालेले अध्याय यांची यादी ग्रुपवर प्रसिद्ध केली  जाईल,
 सामुहिक अध्याय वाचनाची रूपरेषा.हीअशी ऱाहाणारआहे, सकाळी 11वा. स्तवन मंजिरी वाचनास सुरुवात करून आपल्याला मिळाल्याल्या अध्यायाच्या वाचनास सुरुवात करून दु.12 वाजता सहकुटुंब बाबांची आरती करावी,या साईसच्चरित्र पारायणास जास्तीत जास्त साई भक्तांनी सहभाग नोंदवून सदगुरू श्री साईबाबांचे शुभाशीर्वाद घ्यावे. शिरडीतील प्रत्येक भागातील नागरिकांनी  आपल्या भागातील खालील व्यक्तींशी संपर्क साधणे गरजेचे आहे,नाव नोंदणी व सहभागासाठी :- फोन ,मेसेज,  किंवा WhatsApp वर खालील व्यक्तींशी संपर्क करावाअसे आवाहान करण्यात आले आहे,.
असे पाच गुरूवार करायचे आहे, या गुरूवारी शिरडीतून या साईसच्चरित्र पारायणास सुरूवात होईल, त्यानंतर पुढील गुरूवारी 21 मे रोजी राहाता तालुका, 28  मे रोजी अहमदनगर जिल्हा, 4 जून रोजी संपूर्ण भारत देश, व पाचव्या गुरुवारी 11 जूनला संबंध जगात साईसच्चरित्राचे वाचन हे साईभक्त करणार आहेत.असे आवाहान करण्यात आलेआहे,त्यासाठी
 संपर्क -विजय कोते  8308079079.,संजय गोंदकर  9623669191.,मंगेश त्रिभुवन 9511915151.,विकास महाराज गायकवाड 9623969191.,दादा गोंदकर  9623234141.,अशोक गोंदकर  9623999191., जगन्नाथ गोंदकर  9822249313.,रामा गागरे 9881802588.,राजेंद्र स. कोते 9623269191.,उत्तम कोते 9822551010.
 ताराचंद कोते 9096919191.,वैभव शास्री कुलकर्णी 9975544551.,प्रशांत गोंदकर 9011722121.,भरत चांदोरे  9011116300.,गणेश सोमवंशी 9623049191.,धनंजय साळी  9921529999.,अभिजीत कोते 9975819581.,    राहूल मगर  8308079079.,साई कोते 9657079191.,सुधीर सुपेकर  9511559191.हे आहेत,तरी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा ,असे आवाहन साईं निर्माण ग्रुप व  द्वारकामाई  प्रतिष्ठानकडुन करण्यात आले आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असुन तलावा पासुन ते पाणी शुध्दीकरण केंद्रापर्यत असणार्या सर्व यंत्रणेची साफसफाई वेळेवर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या बाबत प्रसाद खरात यां नागरीकाने पाणी शुध्दीकरण तलावाचे काही फोटो काढुन व्हाँटसअप वर टाकले होते त्यामुळे ग्रामस्थांनी पाणी पुरवाठ्याकडे लक्ष देवुन गावाला शुध्द पाणी पुरवठा करा लोकांच्या आरोग्याशी खेळू नका
अशा कमेंट गृपवर टाकल्या होत्या त्यांची दखल घेवुन गावातील जागृक नागरीक व पत्रकारांनी समक्ष जावुन पाणी पुरवठा विभागाची पहाणी केली या वेळी तलावातून आलेले पाणी तुरटी व टि सी एल टाकुन स्वच्छ केले जात असल्याचे उपसरपंच रविंद्र खटोड यांनी पत्रकारांना सांगितले या वेळी टँक केव्हा साफ केला टाकी केव्हा साफ केली पाणी पुरवठ्याला भेट देणारे आधिकारी केव्हा आले या बाबत विचारले असता रजिस्टर ग्रामपंचायत कार्यालयात असल्याचे सांगण्यात आले पाणी शुध्दीकरण तलावातील साचलेला गाळ केव्हा  वाँश आऊट केला या बाबतही निश्चित तारीख व वेळ सांगता आली नाही पाणी शुध्दीकरण करण्याचे तीन हौद असुन या तिनही हौदातुन पाणी शुध्दीकरण कले जाते परंतु हे हौद कमीत कमी आठ दिवसातून एकदा वाँश आवुट केले पाहीजे परंतु तसे होताना दिसत नाही ज्या फिल्ट्रेशन टाक्यातुन पाणी गाळल जात त्या वेळी पाण्यातील सुक्ष्म कण वाळूच्या कणात साचले जातात व ही वाळू घट्ट दगडा सारखी होत त्या मुळे पाण्याच्या टाकीतील प्रेशर वाढत ,ज्या वेळी ठरावीक दाबा पेक्षा जास्त दाब टाकीत होतो,हे दाखवण्या साठी टाकीला प्रेशर गेज असतो,अशा वेळी टाकी रिव्हर्स फ्लो ने टाकी स्वच्छ करावी  लागते ,या प्रक्रीयेत पाण्याच्या टाकीत जाणारा प्रवाह बंद करून ,बाहेर पडणाऱ्या बाजूने पाणी टाकीत सोडले जात त्यामुळे वाळू उपळते व त्यात अडकलेले मातीची कण मोकळी होतात व फ्लश पाईप वाटे बाहेर पडतात.याला रिव्हर्स फ्लशींग अस म्हणतात.अशा प्रकारे गाळ व्यवस्थेची देखभाल ठरावीक दिवसांनी सतत करावी लागते. गावाला पाणी पुरवठा करणार्या टाकीत केवळ तीन किलो टि सी एल पावडर टाकली जात असल्याची नोंद त्या ठिकाणी असलेल्या रजिस्टर मध्ये आढळून आली परंतु नेमके प्रमाण किती हे ही संबंधित कर्मचार्याला सांगता आले नाही त्यातही टि सी एल टाकण्याच्या नोंदी देखील  वेळेवर घेतल्या गेलेल्या नाहीत सदर रजिस्टरमध्ये मार्च पर्यंतच नोंद केलेली आढळून आली या बाबत असे का आसे विचारले आसता महीना अखेरीस महीन्याची नोंद ओढतो असे सांगण्यात आले मग आता मे महीना सुरु असुन एप्रिल महीन्याच्या नोंदी कधी ओढणार या बाबत समाधान कारक उत्तर देता आले नाही  तसेच पाणी पुरवठ्याला जोडलेल्या विज मोटारी करीता असलेला विज वाहक पँनल बोर्ड उघड्यावरच होते  त्यातील काही तारा फ्यूजा उघड्यावरच पडलेल्या होत्या यामुळे एखाद्या पाणी पुरवठा कर्मचार्याच्या जिवीताला धोका होवु शकतो हे पदाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले असता तातडीने पँनल बोर्डची दुरुस्ती केली जाईल असे अश्वासन रविंद्र खटोड यांनी दिले खरात यांनी टाकलेला फोटो व प्रत्यक्ष पहाणी करताना दोन्ही फोटोत असलेला फरक ग्रामस्थ व पत्रकाराच्या लक्षात आला पत्रकार येण्यापुर्वी बर्याच ठिकाणी साफ सफाई केल्याचे दिसुन आले   गावाला पाणी पुरवठा करणारी स्वतंत्र यंत्रणा असली तरी ती कार्यरत नसल्याचे जाणवले उपसरपंच रविंद्र खटोड बाजार समितीचे संचालक सुधीर नवले जावेद शेख यांनी पाणी पुरवठ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याचे अश्वासन दिले या वेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले सरपंच असतानाच जल शुध्दीकरण केद्राचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असाताना पाणी पुरवठ्याचा निधी दुसरीकडे वापरल्यामुळे आज ही अवस्था झाली असुन आज त्याच कामाचे नियोजन केल्यास तिप्पट खर्च  लागणार असल्याचे सांगितले बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणारी योजना ही सन १९७० साली कार्यन्वित झाली असुन त्या वेळळेची लोकसंख्या गृहीत धरुन ती योजना सुरु केली होती आज लोकसंख्या चार पटीने वाढली आहे त्यामुळे जल शुध्दीकरण केंद्राचेही विस्तारीकरण करणे गरजेचे  असुन पाणी शुध्दीकरण करताना रिव्हर्स फ्लँशिंग पध्दतीचा वापर केल्याचे दिसतच नाही  ही गंभीर बाब आहे असल्याचे मत सुधाकर खंडागळे यांनी व्यक्त केले 
उपसरपंच रविंद्र खटोड जावेद शेख बाजार समितीचे संचालक सुधीर नवले सुधाकर खंडागळे भास्कर बंगाळ व पत्रकार उपस्थित होते.

श्रीरामपुर (प्रतिनिधी )- श्रीरामपुर- संगमनेर रस्यावर प्रभात दूध डेरी जवळ दुचाकी व ट्रक यांच्यात आज सायंकाळी ५ :३०च्या दरम्यान भीषण अपघात होऊन या अपघातात २ जणांचा मृत्यु झाला आहे.या बाबत घटनास्थळी समजलेल्या माहिती वरुन बाळासाहेब यशवंत कोते (शिर्डी ) व अनिल निकम (कोपरगाव ) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे समजले आहे . दोघेही श्रीरामपूर बस डेपोचे सहाय्यक आधिक्षक व सहाय्यक निरिक्षक परिवहन महामंडळ कर्मचारी असल्याचे समजते. अपघात ग्रस्त ट्रक मध्ये लोखंडी सळया असल्याचे समजले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget