Latest Post

(शिर्डी प्रतिनिधी)-श्री साईबाबामुळे अांतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या  शिर्डीत  दारू विक्रीला बंदी असतांना शिर्डी व परिसरात अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने कालच दि,२ मे रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर  यांनी पोलीस अधीक्षक व गुन्हा अन्वेषण विभागाला  शिर्डी व परिसरातील अवैध दारूधंदे त्वरित बंद करण्याचे आदेश दिल्याने या विभागामार्फत शिर्डी व परिसरात विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहे, वरिष्ठपोलीस अधिकारी अवैध दारू धंद्याकडे विशेष लक्ष देत असताना मात्र  स्थानिक शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी काय करतात ।असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत, त्यामुळे  एकीकडे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन होत असताना शिर्डीत मात्र  कार्यक्षम व कर्तव्यदक्ष पोलिस अधिका्रयाची नेमणूक करावी ,अशी मागणी आता होऊ लागली आहे.शिर्डी व परिसरात अवैध दारूधंदे व अवैध व्यवसाय यासंदर्भातचे वृत्त बिनधास्त न्यूज व जंनमत चॅनलला नुकतेच प्रसिद्ध झाले होते व यासंदर्भात दारू बंदी व उत्पादन शुल्क मंत्री ना, दिलीप वळसे पाटील व इतर संबंधित मंत्र्यांना तसे निवेदन देण्यात आले होते, याचा परिणाम म्हणून ही वरीष्ट पातळीवरून शिर्डीत  कारवाई झाल्याचे बोलले जात आहे,
  सन 1985 ला श्री साईबाबा संस्थानने शासनाकडे अर्ज करून शिर्डीत संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी केली होती, त्या अनुषंगाने शिर्डी येथे तेव्हापासून दारू विक्रीला बंदी करण्यात आली आहे, शिर्डीत कोणताही दारू विक्रीचा परवाना दिला जात नाही किंवा दारू विक्रीला परवानगी नाही, असे असताना शिर्डीत सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री ठीक ठिकाणी होत आहे , गल्लीबोळात ,काही हॉटेलमध्येही दारूविक्री होत असते, त्यामुळे शिर्डीत येणारे साईभक्त व येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, शिर्डी परिसरातही मोठ्या प्रमाणात अवैध दारू धंदे सुरू आहेत, मात्र शिर्डी पोलिसांचे याकडे  लक्ष नाही, किंवा आर्थिक देवाण घेवाणातून  या अवैध दारूविक्री धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते की काय। अशी शंका शिर्डीकरांना येत आहे, अनेकदा  शिर्डी व परिसरातील अवैधधंद्याविषयी निवेदने व  उपोषणे झाली,  वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक पोलिसांकडून तेवढ्यापुरती तेवढी थातूर मातूर कारवाई होते ,नंतर मात्र जैसे थी परिस्थिती राहते, असे अनेकदा घडले आहे, कालच दि,२ मे रोजी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कार्यालयीन आदेश  19( अ)  210 / 20 20  अन्वये कोरोना  (covid-19)  चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  राज्यात  साथरोग नियंत्रण  कायदा  व आपत्ती व्यवस्थापन  कायद्यानुसार  त्या अनुषंगाने जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना  शिर्डी व परिसरातील अवैध दारू धंद्यांवर छापा टाकण्याचे आदेश दिले , त्यानुसार पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सहाय्यक फौजदार  मोहन लक्ष्मण गाजरे पोहे बाळासाहेब किसन मुळीक पो को एमसी खर्डे सुमेधा वाघमारे,शेलार ,गोरे ,आदि पोलिसांच्या साह्याने शिर्डी परिसरातील अवैध दारू विक्री धंद्यांवर छापे टाकले ,त्यामध्ये सावळीवीर सोनेवाडी रस्त्यालगत एका भिंतीच्या आडोशाला अवैद्य दारूविक्री करणाऱ्या सोनी विनोद जाधव या महिलेच्या घरी सुमारे तीन हजार रुपयाची तीस लिटर हातभट्टीची दारू सापडली, त्यावरून या महिले विरोधात भादवि कलम 188 (2) 269 271 तसेच साथरोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 234 तसेच महाराष्ट्र प्रोव्हिजन ॲक्ट कलम (ई )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अश्या अनेक हातभट्ट्या व अवैध दारू विक्री शिर्डी व परिसरातील अनेक ठिकाणी सुरू आहेत, मात्र त्यांना या छाप्याच्या अगोदरच छाप्याची खबर कळत  असल्याने  या पाठीमागे कोण आहे ।याची चौकशी होणे गरजेचे आहे, वरिष्ठ पोलीस अधिकारी थेट शिर्डीत येवून अवैध धंद्यांवर कारवाई करतात, मात्र या धंदेवाल्यांना त्या अगोदरच कोण खबर देतो, ,याची गुप्तपणे चौकशी होणे गरजेचे आहे.शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असताना शिर्डी पोलीस स्टेशनला प्रभारी चार्ज साध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे आहे ,येथे कर्तव्यदक्ष, कार्यक्षम असे पोलिस निरीक्षक नेमण्याची मागणी आता शिर्डी करांकडून होत आहे,  वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौतुक होत असतांना शिर्डीतील  पोलीसावर शिर्डी व परिसरातील नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत, जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक, यांनी शिर्डी व परिसरात अजूनही विशेष लक्ष देऊन या परिसरात चालणारे अवैध दारूधंदे व इतर अवैध व्यवसाय, लॉजमध्ये चालणारे वेश्याव्यवसायावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच शिर्डीसाठी  कार्यक्षम ,कर्तव्यदक्ष असे पोलीस निरीक्षक ,पोलीस अधिकारी नेमावेत ,अशी मागणी आता शिर्डी व परिसरातील नागरिकांकडून  होत आहे.

श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )-कोरोनाच्या संकटकाळात जे सेवा देतात त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे हे ओळखून डाँक्टर आपल्या दारी हा राबविण्यात आलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे असे उदगार पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी काढले.भारतीय जैन संघटना ,श्रीरामपूर तालुका ड्रगीस्ट असोसिएशन श्रीरामपूर नगर परिषद जैन डाँक्टर फेडरेशन व ग्रामिण रुग्णालयात यांच्या संयुक्त विद्यमाने " डाँक्टर आपल्या दारी " हा उपक्रम राबविण्यात आला त्या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट म्हणाले की पोलीस कर्मचारी आरोग्य सेवक आपले कर्तव्य बजावत असताना एखाद्या बाधीत रुग्णाच्या संपर्कात त्या व्यक्तीस तसेच त्याच्या कुटुंबीयास या आजाराची लागण होवु शकते हे लक्षात घेवुन शहरातील निष्णांत डाँक्टरांनी फिरता दवाखाना सुरु करुन आरोग्य तपासणी सुरु केली आहे या उपक्रमामुळे आमचे आमच्या कर्मचार्यांचे मनोबल निश्चितच वाढणार आहे असेही बहीरट म्हणाले. या उपक्रमांतर्गत १६० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच त्यांना औषधेही देण्यात आली  त्यात पोलीसा बांधव व त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश होता या वेळी इंडियन मेडिकल असोसिएशन श्रीरामपूर चे अध्यक्ष डाँक्टर संचेती , डाँक्टर शिरसाठ ,डाँक्टर टिळेकर ,डाँक्टर  देव ,डाँक्टर राहींज ,डाँक्टर परे ,डाँक्टर बडाख ,डाँक्टर  बाठीया ,डाँक्टर कोठारी ,डाँक्टर गंगवाल ,डाँक्टर मुंदडा ,डाँक्टर  अनारसे तसेच रमेश कोठारी अशोक थोरे कल्याण कुंकुलोळ शशिकांत रासकर जैन संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे ,अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे,  मुख्यत्वेकरून सलून दुकाने उघडण्यास बंदी असताना अनेक नाभिककारागीरांनी वरून दुकाने बंद ठेवून आतून मात्र  ती  सुरू आहेत  तर काहीनी आपल्या घरीच गुपचुपपणे केशकर्तनालये सुरू केली आहेत , काही  ग्राहकांच्या घरी जाऊन कटिंगदाढी करीत आहेत ,हे कोरोनाचा संसर्ग होण्याच्या दृष्टीने मोठे धोकादायक आहे, त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात असे घडू नये ,यासाठी त्वरित शासकीय अधिकाऱ्यांनी पावले उचलणे गरजेचे आहे,  कोरोनाने जगात हाहाकार उडाला आहे, देशातही अनेक रुग्ण सापडत आहेत महाराष्ट्रात तर कोरोनारुग्णांची वाढतच आहे, शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे दोन टप्पे संपून  चार मेपासून यालॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होत आहे ,तिसऱ्या टप्प्यात ग्रीन ऑरेंज, रेड ,असे तीन झोन करण्यात आले असून या तीनही झोनमध्ये काही दुकानांना उघडण्यास परवानगी दिली असताना सलूनची दुकाने उघडण्यास पूर्णतः बंदी आहे ,मात्र  गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन सुरू असताना काही नाभिककारागीरांनी गावातील, शहरातील, चौकातील, आपली दुकाने बंद ठेवून आपल्या घरीच केशकर्तनालये सुरू केली आहेत, अनेक ग्राहक फोन करून नाभिक कारागिरांच्या घरी जाऊन कटिंगदाढी करत आहेत किंवा गावातील , शहरातील नाभिक ओळखीचे,कायमचे संपर्कात असल्यामुळे त्यांना फोन करून काही लोक आपल्या घरी ,वाडी-वस्तीवर बोलावून कटिंग दाढी करून घेत आहेत ,यामुळे कोरेणाचा संसर्ग होण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे ,या गोष्टीकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही ,राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या डॉक्टर कन्याने नामदार बाळासाहेब थोरात यांची कटिंग घरी केली ,आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी आपल्या वडिलांची कटिंग घरी केली, असे उदाहरण समोर असताना मंत्री ,आमदार लॉक डाऊनचे नियम पाळत असताना काही लोक लॉकडाऊन चे नियमाचे उल्लंघन करून आपली कटिंग दाढी नाभिक कारागिरांना घरी बोलावून किंवा या कारागिरांच्या घरी जाऊन करून घेत आहेत, कटिंग दाढी करणे हे थेट संपर्कात येत असल्याने  कोरोणाचा संसर्ग होण्याचा अधिक धोका असतो ,तरी हे बिनधास्तपणे सुरू आहे,  वरून सलूनची बंद असली तरी आतून मात्र ती चालू आहेत, अनेकांनी गुपचुपपणे ,बेकायदेशीर घरीच सलूनची दुकाने थाटली आहेत, यावर येथून पुढे तरी कडक कारवाई व्हावी ,गावातील का, तलाठी ग्रामसेवक यांच्यामार्फत सर्व नाभिक कारागिरांना सूचना किंवा नोटीस दिल्या जाव्यात, शहरातही मुख्याधिकारी यांच्या मार्फत किंवा शासकीय अधिकाऱ्यांमार्फत ,पोलिसांमार्फत सूचना करण्यात याव्यात , याकारागिरांना दाढी कटिंग करण्यासाठी कोणाच्याही घरी जाऊ नये किंवा कोणाला  त्यासाठी आपल्या घरी बोलू नये, अशी सक्त ताकीद देणे गरजेचे आहे ,राहता तालुका कोरोना मुक्त आहे ,सर्वजण लॉकडाऊनचे नियम काटेकोर पाळत आहेत, मात्र तालुक्यातील अनेक गावात, शहरात नाभिक कारागिरांकडून हे नियम मोडले जात असल्याचे दिसून येत आहे, तेव्हा याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे सुज्ञ नागरिक बोलत आहेत.

बेलापूर( प्रतिनिधी  )- कोरोनाच्या धास्तीमुळे चिंतामणी- कुलथे परिवारांचा शुभविवाह केवळ दहा पाहुण्याच्या उपस्थितीत ना मांडव ना बँण्डबाजा ना गाजावाजा अशा पध्दतीने लिंबाच्या झाडाखाली  संपन्न झाला                      बेलापूर येथील भगीरथ चिंतामणी यांचे   चिरंजीव योगेश  व बुरुडगाव अहमदनगर येथील ज्ञानेश्वर विठ्ठल कुलथे यांची  मुलगी प्रज्ञा हीच्याशी निश्चित झाला होता विवाहची तारीख १५ एप्रिल धरण्यात आली होती परतु लाँक डाऊनमुळे विवाह करणे अशक्य झाले होते लाँक डाऊन वाढतच चालला होता अखेर ज्ञानेश्वर कुलथे व भगीरथ चिंतामणी यांनी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह करण्याची तयारी दर्शविली या करीता पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्याकडे परवानगी मागीतली पोलीस अधिकार्यानी काही मोजक्याच लोकाच्या उपस्थितीत विवाह करण्याच्या अटीवर परवानगी दिली मग काय ना मांडव ना बँडबाजा ना वरात केवळ दहा पाहुण्याच्या उपस्थितीत लिंबाच्या झाडाखाली  प्रज्ञा व योगेश यांचा विवाह संपन्न झाला या वेळी कुलथे व चिंतामणी परिवाराचे केवळ तीन ते चार हजार रुपयेच खर्च झाले या बाबत नवरदेव योगेश व नववधु प्रज्ञा यांनी अशी भावना व्यक्त केली की आपण खोट्या प्रतिष्ठेपायी मोठेपणा दाखविण्याच्या नादात कर्जबाजारी होवुन लग्न करतो लग्नात अनावश्यक खर्च करतो  पैशाची अन अन्नाचीही उधळपट्टी करतो परंतु कोरोनाच्या संकटामुळे आमच्या दोन्ही कुटुंबाचा फार मोठा खर्च वाचला जो आमच्या भावी जिवनासाठी वरदान ठरु शकतो अशा प्रकारे विवाह करुन लग्नाचा फालतु होणारा खर्च आम्ही निश्चितच  चांगल्या कार्याला लावु त्यामुळे दोन कुटुंबाचे हे नाते अधिक घट्ट होणार आहे.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )साईबाबामुळे  न पाहता, पैशासाठी काहीही करत असून कोणालाही रूम देत असल्याने शिर्डीत गैरप्रकारांना आणखी बळ मिळत आहे, हे परत एकदा स्पष्ट झाले आहे ,दि, 30 एप्रिल 20 20 रोजी दुपारी शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथिल केके  मिल्क लगत हॉटेल वेलकम एस आर रिसॉर्ट हे कवडे यांचे असून ते कोपरगावचे विद्यमान नगराध्यक्ष विजयी वहाडणे यांचे चिरंजीव शिवराज वहाडणे यांनी  चालवायला घेतले आहे, येथे नुकतेच कोपरगावचे अपक्ष विद्यमान नगरसेवक यांचा मुलगा मोहसीन मोहम्मद सय्यद वय 29रा, गांधीनगर कोपरगाव व त्याची  27 वर्षीय एक महीला यांना लॉकडाऊनकाळात संचारबंदी असताना या हॉटेलचे व्यवस्थापक रामहरी जानराव काळे याने ओळखपत्र न पाहता पैशासाठी बेकायदेशीरपणे रूम दिली ,शिर्डी पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी येथे छापा टाकून त्यांना अय्याशी करताना रंगेहाथ पकडले, गुन्हा दाखल झाला मात्र पिटासारखा गुन्हा दाखल करण्याऐवजी नेहमीप्रमाणेभा,द,वि,188 (2)प्रमाणे 269 ,271 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा याप्रमाणे
 शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला मात्र संचार बंदीचा आदेश डावलून येथे अय्याशीसाठी रूम दिली जाते ,कोणतेही रजिस्टरनाही, नोंद ठेवली जात नाही, येथे बिनधास्त वेश्या व्यवसाय चालतो तरीही येथे पोलिसांचेही फारसे लक्ष नाही, या हॉटेलमध्ये दिनांक 30 एप्रिल रोजी अय्याशी करणाऱ्या राजकारणी तरुणाला एका महिलेचे बरोबर पकडले जाते,तरीही दुसऱ्याच दिवशी दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असताना व लॉकडाऊन सुरू असताना याचहॉटेलमध्ये दोन रूम बाहेरच्या लोकांना  पैशासाठी दिले जातात , एम एच 01,एमएच02 पासिंग च्या दोन कार या हॉटेल समोर पार्किंगला उभ्या असतात, रूममध्ये या कार मधील लोक मौजमजा करत  नियमांना पायदळी तुडवतात, मात्र या कानाची खबर त्या कानाला नाही असे हॉटेलवाले समजताच, पोलिसही कानाडोळा करतात,  याचा अर्थ काय।।
 येथे गेल्या काही दिवसापासून हायप्रोफेशनल वेश्याव्यवसाय चालतो, येथे नाशिक ,औरंगाबाद अहमदनगर जिल्ह्यातून मुली येत असतात, या वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींचे फोननंबर हि येथील लॉजवालेकडेआहे, पैशाच्या व ग्राहकाच्या ऐपतीप्रमाणे येथे  वेश्यामुली बोलवल्या जातात, हे सर्व पैशासाठी बिनधास्त सुरू आहे ,या पाठीमागे कोण आहे ,
या हॉटेल बरोबरच शिर्डी व परिसरातील असे अनेक हॉटेल, लॉज आहेत, तेथे असा वेश्याव्यवसाय बिनधास्त चालतो, शिर्डी धार्मिक क्षेत्र आहे ,येथे मात्र दिवसेंदिवस वेश्याव्यवसाय, अवैध धंदे वाढले आहेत , सावळीवीहिर फाटा येथील हॉटेल मध्ये आदल्या दिवशी अवैध जोडपे पकडले जाते व दुसऱ्या दिवशी कसलाही विचार न करता लॉकडाऊनकाळात सर्व बंद असताना परत येथे दोन रूम दिल्या जातात ,याला कोणाचातरी पाठबळ असल्याशिवाय हे घडू शकत नाही याची आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी करून परिसरात असे अनेक हॉटेल लॉज आहेत की तेथे सर्रास  वेश्याव्यवसाय चालत आहेहह बाहेरील लोक येथे येऊन बाहेरील मुली येथे येऊन हाव्यवसाय करतात, गुप्त पद्धतीने लक्ष ठेवून अशा हॉटेल,लॉजवर कठोर कारवाई करण्यात यावी व परिसराचे नाव त्यामुळे  बदनाम होण्यापासून टाळावे ,अशीच आता या परिसरातील नागरिक मागणी करत आहेत.

अहमदनगर दि. 2 - राज्‍य शासनाने लॉकडाऊनमुळे  अहमदनगर जिल्‍हयात व राज्‍यामधील  इतर जिल्‍हयांमध्‍ये  वा इतर राज्‍यामध्‍ये अडकलेल्‍या स्‍थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी  व इतर व्‍यक्‍तींना त्‍यांचे वास्तव्याच्या मुळ ठिकाणी परतण्‍यासाठी आदर्श कार्यपध्‍दती निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या व्यक्तीसाठी सोयीचे व्हावे यासाठी https://covid19.mhpolice.in लिंकद्वारे माहिती भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांच्या मदतीसाठी जिल्ह्यात पदसिध्‍द नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये बाहेरुन येणा-या व्‍यक्‍तींसाठी  नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील यांची तर जिल्‍हयातून बाहेरच्‍या जिल्‍हयामध्‍ये जाणा-या व्‍यक्‍तींसाठी नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पथक क्रमांक 1 - अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये बाहेरुन येणा-या व्‍यक्‍तींसाठी - नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील (मो.9763739974), सहाय्यक नोडल अधिकारी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेचे तहसीलदार महेश पवार ( मो. 8956799922), करमणूक कर शाखा नायब तहसीलदार सुनिल पाखरे (मो. 9309881788) व पुनर्वसन शाखा अव्‍वल कारकून अमोल झोटींग (मो. 9922426717), कुळकायदा शाखा  अव्‍वल कारकून  शेखर साळूंके (मो.9881119866)आणि सं.गा.यो. शाखा लिपीक भगवान सानप (मो.9130836918) असे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहेत.
पथक क्रमांक 2- अहमदनगर जिल्‍हयातून बाहेरच्‍या जिल्‍हयामध्‍ये जाणा-या व्‍यक्‍तींसाठी नोडल अधिकारी म्‍हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील ( मो.9130799939), सहाय्यक नोडल अधिकारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील  (मो.7020739411), महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक विजय गिते (मो.9403709123), निवडणूक तहसीलदार चंद्रशेखर शितोळे (मो.9881304874) गृह शाखा नायब तहसीलदार राजू दिवाण (मो.9890929510) व निवडणूक शाखा अव्‍वल कारकून राजेंद्र शिंदे (मो. 7588543715), करमणूक कर  शाखा अव्‍वल कारकून  संदेश दिवटे (मो.7020945296) आणि ग्रामपंचायत शाखा लिपीक प्रवीण कांबळे (मो.7020360085) असे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहेत.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा ) विनाकारण बाहेर फिरणे गुन्हाआहे, तरी शिर्डीतील काही लोक रात्री जेवण झाल्यानंतर शतपावलीच्या निमित्ताने फिरण्यासाठी आपल्या घराबाहेर पडतात , त्यामुळे नियमाचे उल्लंघन होत असते, कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  लॉकडाऊन सुरू आहे, फिरण्यास परवानगी नसताना शिर्डीतील उपनगरात अनेक लोक, महिला, रात्री जेवण झाल्यानंतर शतपावलीच्या निमित्ताने आपल्या घराबाहेर पडतात व उपनगरातील रस्त्यांवर आपापसात गप्पा मारत फिरत असतात, सोशल डिंस्टन्स पाळत नाहीत ,मास्क वापरत नाहीत, रात्री आठ नंतर शिर्डी नगरपंचायतचे  कर्मचारी, पोलीस , उपनगरांमध्ये किंवा रस्त्यांवर नसतात ,त्याचा फायदा नागरिक घेत आहेत, संचारबंदीचे नियम पायदळी तुडवले जात आहे, पोलिसांकडून सकाळी मॉर्निंगवॉक करणाऱ्या लोकांवर कारवाई होते, रात्री जेवणानंतर शतपावली करणार्‍यांवर कारवाई का होत नाही,   रात्री आठ ते अकरा या वेळेत उपनगरातील स्ट्रीटलाईट नगरपंचायतीने बंद ठेवाव्यात, त्यामुळे तरी अंधार झाल्याने  कोणी फिरणार नाही.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget