कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे ,अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे, मुख्यत्वेकरून सलून दुकाने उघडण्यास बंदी असताना अनेक नाभिककारागीरांनी वरून दुकाने बंद ठेवून आतून मात्र ती सुरू आहेत तर काहीनी आपल्या घरीच गुपचुपपणे केशकर्तनालये सुरू केली आहेत , काही ग्राहकांच्या घरी जाऊन कटिंगदाढी करीत आहेत ,हे कोरोनाचा संसर्ग होण्याच्या दृष्टीने मोठे धोकादायक आहे, त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात असे घडू नये ,यासाठी त्वरित शासकीय अधिकाऱ्यांनी पावले उचलणे गरजेचे आहे, कोरोनाने जगात हाहाकार उडाला आहे, देशातही अनेक रुग्ण सापडत आहेत महाराष्ट्रात तर कोरोनारुग्णांची वाढतच आहे, शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे दोन टप्पे संपून चार मेपासून यालॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होत आहे ,तिसऱ्या टप्प्यात ग्रीन ऑरेंज, रेड ,असे तीन झोन करण्यात आले असून या तीनही झोनमध्ये काही दुकानांना उघडण्यास परवानगी दिली असताना सलूनची दुकाने उघडण्यास पूर्णतः बंदी आहे ,मात्र गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन सुरू असताना काही नाभिककारागीरांनी गावातील, शहरातील, चौकातील, आपली दुकाने बंद ठेवून आपल्या घरीच केशकर्तनालये सुरू केली आहेत, अनेक ग्राहक फोन करून नाभिक कारागिरांच्या घरी जाऊन कटिंगदाढी करत आहेत किंवा गावातील , शहरातील नाभिक ओळखीचे,कायमचे संपर्कात असल्यामुळे त्यांना फोन करून काही लोक आपल्या घरी ,वाडी-वस्तीवर बोलावून कटिंग दाढी करून घेत आहेत ,यामुळे कोरेणाचा संसर्ग होण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे ,या गोष्टीकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही ,राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या डॉक्टर कन्याने नामदार बाळासाहेब थोरात यांची कटिंग घरी केली ,आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी आपल्या वडिलांची कटिंग घरी केली, असे उदाहरण समोर असताना मंत्री ,आमदार लॉक डाऊनचे नियम पाळत असताना काही लोक लॉकडाऊन चे नियमाचे उल्लंघन करून आपली कटिंग दाढी नाभिक कारागिरांना घरी बोलावून किंवा या कारागिरांच्या घरी जाऊन करून घेत आहेत, कटिंग दाढी करणे हे थेट संपर्कात येत असल्याने कोरोणाचा संसर्ग होण्याचा अधिक धोका असतो ,तरी हे बिनधास्तपणे सुरू आहे, वरून सलूनची बंद असली तरी आतून मात्र ती चालू आहेत, अनेकांनी गुपचुपपणे ,बेकायदेशीर घरीच सलूनची दुकाने थाटली आहेत, यावर येथून पुढे तरी कडक कारवाई व्हावी ,गावातील का, तलाठी ग्रामसेवक यांच्यामार्फत सर्व नाभिक कारागिरांना सूचना किंवा नोटीस दिल्या जाव्यात, शहरातही मुख्याधिकारी यांच्या मार्फत किंवा शासकीय अधिकाऱ्यांमार्फत ,पोलिसांमार्फत सूचना करण्यात याव्यात , याकारागिरांना दाढी कटिंग करण्यासाठी कोणाच्याही घरी जाऊ नये किंवा कोणाला त्यासाठी आपल्या घरी बोलू नये, अशी सक्त ताकीद देणे गरजेचे आहे ,राहता तालुका कोरोना मुक्त आहे ,सर्वजण लॉकडाऊनचे नियम काटेकोर पाळत आहेत, मात्र तालुक्यातील अनेक गावात, शहरात नाभिक कारागिरांकडून हे नियम मोडले जात असल्याचे दिसून येत आहे, तेव्हा याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे सुज्ञ नागरिक बोलत आहेत.
Post a Comment