कोरोनाच्या संकट काळात डाँक्टर आपल्या दारी हा स्तूत्य उपक्रम -पोलीस निरीक्षक बहीरट.
श्रीरामपूर ( प्रतिनिधी )-कोरोनाच्या संकटकाळात जे सेवा देतात त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे हे ओळखून डाँक्टर आपल्या दारी हा राबविण्यात आलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे असे उदगार पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी काढले.भारतीय जैन संघटना ,श्रीरामपूर तालुका ड्रगीस्ट असोसिएशन श्रीरामपूर नगर परिषद जैन डाँक्टर फेडरेशन व ग्रामिण रुग्णालयात यांच्या संयुक्त विद्यमाने " डाँक्टर आपल्या दारी " हा उपक्रम राबविण्यात आला त्या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट म्हणाले की पोलीस कर्मचारी आरोग्य सेवक आपले कर्तव्य बजावत असताना एखाद्या बाधीत रुग्णाच्या संपर्कात त्या व्यक्तीस तसेच त्याच्या कुटुंबीयास या आजाराची लागण होवु शकते हे लक्षात घेवुन शहरातील निष्णांत डाँक्टरांनी फिरता दवाखाना सुरु करुन आरोग्य तपासणी सुरु केली आहे या उपक्रमामुळे आमचे आमच्या कर्मचार्यांचे मनोबल निश्चितच वाढणार आहे असेही बहीरट म्हणाले. या उपक्रमांतर्गत १६० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच त्यांना औषधेही देण्यात आली त्यात पोलीसा बांधव व त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश होता या वेळी इंडियन मेडिकल असोसिएशन श्रीरामपूर चे अध्यक्ष डाँक्टर संचेती , डाँक्टर शिरसाठ ,डाँक्टर टिळेकर ,डाँक्टर देव ,डाँक्टर राहींज ,डाँक्टर परे ,डाँक्टर बडाख ,डाँक्टर बाठीया ,डाँक्टर कोठारी ,डाँक्टर गंगवाल ,डाँक्टर मुंदडा ,डाँक्टर अनारसे तसेच रमेश कोठारी अशोक थोरे कल्याण कुंकुलोळ शशिकांत रासकर जैन संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment