Latest Post

शिर्डी  (जय शर्मा )
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रयत संकुलातील एस.के. सोमैय्या प्राथमिक विद्या मंदिर या विद्यालयातील कु ,स्वानंदी सिद्धार्थ कोबरणे हिने जानेवारी २०२०मध्ये झालेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.तिने एकूण २६६ गुण मिळवून श्रीरामपूर तालुक्यात ७वी, जिल्ह्यात 16 वी, तर राज्यात 18 वी  आलेली आहे. या परीक्षेला राज्यातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी बसतात अश्या विद्यार्थ्यांमधून कुमारी स्वानंदी येणे राज्यात18वा क्रमांक मिळवला असून तिच्या या यशाबद्दल रयतच्या मॅनेजिंग कौसिल सदस्या श्रीमती मीनाताई जगधने, मुख्याध्यापक  श्री.दवंडे सर, मार्गदर्शक शिक्षिका  , श्रीमती चेडे मॅडम व शिक्षण प्रेमींनी, कौतुक केले आहे.

शिर्डी( राजेंद्र गडकरी)
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदके जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकरा पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे,
  दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलिस महासंचालक पदक देऊन महाराष्ट्र दिनी एक मेला गौरविण्यात येत असते, यावर्षी सुद्धा राज्यातील चांगली कामगिरी करणाऱ्या व उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या आठशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदके जाहीर झाली आहेत, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक एस ,के ,जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्व जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो ,त्यावरून राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी, सर्वजण आपापल्या परीने उत्कृष्ट काम करत असतातच, मात्र यामध्येही अधिक चांगले काम व उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी ,कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येते व राज्यातील पोलिस अधिकारी ,कर्मचाऱ्यांचा उत्साह, जोश त्यामुळे वाढवण्याचा प्रयत्न होत असतो, सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, अहोरात्र परिश्रम घेत आहेत ,अशा सर्व पोलिसांचे सर्वत्र राज्यभरातून ,देशातून अभिनंदन होत आहे ,अशा परिस्थितीत महाराष्ट्र दिन आला आहे, एक मे या महाराष्ट्र दिनी दरवर्षी राज्यात पोलिस महासंचालक पदके जाहीर होत असतात, त्याप्रमाणे ती नुकतीच जाहीर झाली आहे, राज्यातील एकूण 800 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदे जाहीर करण्यात आली आहेत, त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील अकरा पोलीस कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक फौजदार काशीनाथ तुकाराम खराडे ,सहाय्यक फौजदार राजेंद्र सुपेकर, सहाय्यक फौजदार मधुकर शिंदे, सहाय्यक फौजदार अनिल गाडेकर, सहाय्यक फौजदार रवींद्र कुलकर्णी, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश उपासनी, पोलीस हेडकॉन्स्टेबल मन्सूर सय्यद ,पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास सोनार, सहाय्यक फौजदार अर्जुन बडे, पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम सोनवणे आदीना पोलीस महासंचालक पदके जाहीर झाली आहेत, या सर्वांचे राज्याचे पोलिस महासंचालक एस,के जयस्वाल, तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखीलेशकुमार सिंह व सर्व जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

शिर्डी (जितेश लोकचंदानी) कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे ,मात्र शिर्डीत फळ व भाजीपाला विक्रेते यांच्याकडून लॉकडाऊनचा नियमाचा फज्जा उडत असून सोशल डिस्टंन्स न पाळता मास्क न   लावता येथे भाजीपाला विकला जातो ,शिर्डी नगरपंचायत या फळ व भाजी विक्री वाल्यांकडून चिरीमिरी घेते की काय ।।अशी शंका शिर्डीकरांना येत आहे, मॉर्निंग वॉक करणारेवर कारवाई होते, मग भाजीपाला ,फळ विक्रेते लॉकडाऊनअसतानाही  व सोशल डिस्टेंस पाळत नाही व बिगर परवानगी ने विक्री करणाऱ्यावर  नगरपंचायत इतकी मेहरबान का। असा सवाल करत आर. टी. आय.चे कार्यकर्ते,समाजसेवक तथा  औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ अड,अविनाश शेजवळ कारवाईची मागणी केली आहे  देशभरात  कोरोणा मुळे लॉकडाऊन करण्यात आले, त्याच पार्श्वभूमीवर शिर्डीत ही लॉकडाऊन चे नियम लागू झाले नगरपंचायतने ही शहरात किराणा दुकान, दूध ,व्यवसाय, भाजीपाला फ्रूट ,व्यवसाय यांना वेळ ठरवून दिले व भाजीपाला फ्रूट साठी ठराविक ठिकाणी ,ठराविक वेळेत विक्री करण्यासाठी जागा फिक्स करून दिल्या ,प्रत्येक  वार्डात दोन किंवा तीन विक्रेते बसण्या साठी परवानगी देण्यात आली, परंतु आज प्रत्येक वार्डात दहा ते पंधरा भाजीपाला व फळ विक्रेते आहेत ,जर प्रत्येक वार्डात दोन ते तीन लोकांना फळ व भाजीपाला विकण्यास परवानगी दिली आहे, तर हे बाकीच्या लोकांना नगर पंचायत का पाठीशी घालते का। त्यांचावर कारवाई होत नाही, ह्या मागे काही आर्थिक व्यवहार तर नाही ना ।अशी शंका अड,अविनाश शेजवळ यांनी बिंदास न्यूज शी बोलतांना सांगितले ,ह्या प्रकरणी तहसीलदार कुंदन हिरे यांना कारवाई  करण्यास अर्ज देणार असून ह्या प्रकरणी तहसीलदार यांनी तपास करून योग्य ती कारवाई करावी असे आर. टी. आय.चे कार्यकर्ते,समाज सेवक तथा  औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ अड,अविनाश बिंदास न्यूज ला दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे,

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीरामपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी बाहेरगावहून आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यायला सुरुवात केली. त्यामुळे श्रीरामपूर शहरासह तालुक्यात बाहेरगावहून आलेल्या 15 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.श्रीरामपूर शहर व तालुका अद्यापही सुरक्षित आहे. मात्र, आता यापुढे बाहेरचा कोणी येता कामा नये. त्यासाठी प्रांताधिकारी अनिल पवार आणि तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बाहेरगावहून आलेल्या नागरिकांची नावे कळवावी असे आवाहन करतानाच कोणी बाहेरगावहून आलेल्यांची माहिती लपविल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. या त्यांनी केलेल्या आवाहनाचा मोठा परिणाम काल दिसून आला.याबाबत तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी शहर व तालुक्यातून लोक बाहेरगावहून आलेल्यांची माहिती कळवत असल्याचे सांगितले. याबाबत शिंदे यांनी सांगितले की, कारेगाव येथे 4 मजूर हे बारामतीहून आले होते. त्यांच्याबाबत गावातून फोन आल्यानंतर तातडीने तेथे जावून या चारही मजुरांना होम क्वॉरंटाईन केले. त्यानंतर नोकरीसाठी पुण्याला असणारे तिघे जण लाडगाव येथे पुण्याहून आल्याचे समजताच या तिघांनाही त्यांच्याघरी होम क्वारंटाईन करण्यात आले.याशिवाय हरेगाव येथील एकवाडी येथे दोन जण नगरहून आल्याची माहिती कळविण्यात आली. त्यांनाही होम क्वॉरंटाईन करण्यात आले. त्यानंतर शहरातील सावता रोडवर व्यापारानिमित्त रत्नागिरीला गेलेले दोघेजण श्रीरामपुरात आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितल्यानंतर त्यांना घरी जावून होम क्वॉरंटाईन करण्यात आले. तसेच बोरावके कॉलेजजवळ अतिथी कॉलनीत एकजण पुण्याहून आल्याचे सांगण्यात आल्यानंतर सदर व्यक्तीलाही होम क्वॉरंटाईन करण्यात आले.इराणी गल्लीत एका कुटूंबात 3 जण नगरहून आल्याचे सांगण्यात आले. त्याठिकाणी आरोग्य खात्याचे पथक जावून त्या तिघांनाही होम क्वॉरंटाईन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे, नगरपालिकेचे डॉ. पर्हे, डॉ. मुंदडा, सहाय्यक पंडित, सुपरवायझर गायकवाड, गोजे, श्रीकांत कदम आणि ज्या पथकाने काल मध्यरात्रीपर्यंत शहर व तालुक्यात क्वॉरंटाईन करण्याचे काम केले. अजून काही तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.तालुक्यात एकही रुग्ण नाही एक परप्रांतीय व तालुक्यातील वडाळा येथील एक वृद्ध महिला संशयित आढळल्याने त्यांच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. परंतु त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे श्रीरामपूर तालुका व परिसरात एकही करोनचा रुग्ण नाही. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.


शिर्डी (जय शर्मा) - सध्या कोरोणामुळे सर्वत्र लॉकं डाऊन सुरू आहे, त्यात उन्हाळा कडक जाणवायला सुरुवात झाली आहे ,शाळा, महाविद्यालये दुकाने, कामधंदा सर्व बंद आहे, त्यामुळे अनेक तरुण नुकत्याच गोदावरी उजवा कालव्याला आलेल्या  उन्हाळी आवर्तनामुळे दुपारी पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत ,मात्र यावेळी सामाजिक दूरीच भान ठेवलं जात आहे,  राहता तालुक्यातून जाणारा गोदावरी उजवा कालवा उन्हाळी आवर्तन सोडल्यामुळे काठोकाठ भरून वाहत आहे, त्यामुळे सध्या या कालव्याच्या आसपासचे तरुण मुले भर दुपारच्या वेळेत या  कालव्यामध्ये पोहण्यासाठी येत असतात, सध्या कालव्याला पाणी असल्यामुळे या वाहत्या पाण्यात पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत , अंतराअंतरावर पोहत असतात, सामाजिक दुरीचं भान ते ठेवत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले, लॉकडाऊन मुळे सर्व बंद आहे,शिर्डीचे वॉटर पार्क बंदआहे,, त्यात कडक उन्हाळा अशा परिस्थितीत भर दुपारी उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी व दुपारचा टाईमपास करण्यासाठी काहीजण या गोदावरी उजवा कालव्याच्या पाण्यात वाटरपार्क समजूनच पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत, या कालव्याच्या पाण्यात आसपासच्या वस्तीवरील गाया म्हशी असे पाळीव प्राणी ही दुपारच्या वेळेस पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेत असतात, असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे, अनेक ठिकाणी महिला कपडे धुण्यासाठी , कुणी आपल्या शेळ्या-मेंढ्या पाळीव प्राणी पाणी पाजण्यासाठी आणत असतात, तरुण मुले तर सूर्यास्त होईपर्यंत या पाटामध्ये पोहत असतात, त्यामुळे लॉकडाऊनच्या  परिस्थितीतही  गोदावरी उजवा कालव्याच्या कडेला  दुर दुर का होईना पण माणसे दिसून येत असतात, सध्या या कालव्याला पाणी आल्यामुळे राहता तालुक्यातील कालवा परिसरातील सर्वजण खुश असल्याचे दिसून येत आहेत, या कालव्याला पाणी आल्यामुळे विहिरींनाही पाणी वाढले आहे, तसेच अनेक साठवण बंधारे भरले गेले असल्यामुळे सध्या पिण्याच्यापाण्याची टंचाई फारशी नाही , गोदावरी उजवा कालव्याला आलेल्या या उन्हाळी आवर्तनामुळे शेतकरी ,तरुण तसेच नागरिक,महिला सर्वजण खुश आहेत.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )  श्री साईबाबामुळे अांतरराष्ट्रीय क्षेत्र असणाऱ्या व देशात स्वच्छ सुंदर शहराचा दुसरे बक्षीस मिळवून मान मिळवणाऱ्या शिर्डीतील उपनगरात नगरपंचायतीने लावलेल्या रस्त्याच्या दुभाजकातील झाडे पाण्याअभावी जळून जात असून नगरपालिकेचे पाणी नेमकी कुठे मुरते। असा प्रश्न शिर्डीकर करत आहेत, शिर्डी नगरपंचायतला करापोटी दर वर्षाला मोठी रक्कम जमा होत असते, या रकमेतून शिर्डीला स्वच्छ व  सुंदर  करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत, याच खर्चातून शिर्डी शहरातील उपनगरात रस्त्याच्या दुभाजकाला विविध वृक्षे लावण्यात आले आहेत नगर-मनमाड महामार्गच्या दुभाजकात वृक्षांना नगरपंचायत टँकरने पाणी देते तसेच सध्या लॉक डाऊन मुळे प्रदूषण नसल्याने ही वृक्षे हिरवीगार दिसत आहेत, मात्र उपनगरातील वृक्षांना पाणी नसल्यामुळे ते वाळून गेलेले आहेत, नगरपालिका फक्त नगर-मनमाड रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या वृक्षांना पाणी देते व नागरिकांना नगरपंचायत खूप मोठे काम करत आहे असे भासवते, मात्र उपनगरातील झाडे पाण्याअभावी जळून जात आहेत तिकडे कोणाचे लक्ष नाही,  लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे,पाण्याच्या टँकरची फक्त बिले काढले जात असल्याचा आरोप करताना शिर्डीचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटणी  आरोप केले आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र व राज्याच्या आदेशानुसार लॉकडाऊन तीन मे रोजी उठेल की नाही याबाबत शंका आहे. मात्र, जिल्ह्यात करोनाची विद्यमान परिस्थिती पाहता आणि नव्याने एकही करोना  रुग्ण न आढळ्यास जिल्हा 10 मे नंतर ग्रीन झोनमध्ये येईल. मात्र नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. करोनावर अद्यापही लस निघालेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करोना विषयी व खरीब हंगामाच्या पार्श्वभूमीवर आढवा बैठक घेतली.त्यानंतर त्यांनी प्रेसशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात जामखेड, संगमनेर तालुका वगळता इतर तालुके करोनामुक्त आहे.तसेच जिल्ह्याबाहेर अडकलेले नागरिकांना लवकरच जिल्ह्यात येता येणार आहे. मात्र, त्यांना 14 दिवस वैद्यकीय अधिकारी यांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. आतापर्यंत 1 हजार 453 अहवाला पुण्याच्या वैद्यकीय प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 43 करोना बाधित सापडले होते. त्यापैकी 25 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.तसेच यंदा हवामान विभागाच्या आंदाजानुसार मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. शेतकर्‍याना लागणारे बी-बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget