अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र व राज्याच्या आदेशानुसार लॉकडाऊन तीन मे रोजी उठेल की नाही याबाबत शंका आहे. मात्र, जिल्ह्यात करोनाची विद्यमान परिस्थिती पाहता आणि नव्याने एकही करोना रुग्ण न आढळ्यास जिल्हा 10 मे नंतर ग्रीन झोनमध्ये येईल. मात्र नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. करोनावर अद्यापही लस निघालेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करोना विषयी व खरीब हंगामाच्या पार्श्वभूमीवर आढवा बैठक घेतली.त्यानंतर त्यांनी प्रेसशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात जामखेड, संगमनेर तालुका वगळता इतर तालुके करोनामुक्त आहे.तसेच जिल्ह्याबाहेर अडकलेले नागरिकांना लवकरच जिल्ह्यात येता येणार आहे. मात्र, त्यांना 14 दिवस वैद्यकीय अधिकारी यांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. आतापर्यंत 1 हजार 453 अहवाला पुण्याच्या वैद्यकीय प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 43 करोना बाधित सापडले होते. त्यापैकी 25 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.तसेच यंदा हवामान विभागाच्या आंदाजानुसार मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. शेतकर्याना लागणारे बी-बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
Post a Comment