Latest Post

 (शिर्डी प्रतिनिधि  राजेंद्र गडकरी)
 सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वत्र मद्य विक्रीचे दुकाने बंद आहेत ,तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या मद्य साठा, वाहतूक सुरू असल्याने राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून एकूण 154 गुन्हे दाखल नोंद करून 52 लाख चार हजार 514 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे 59 आरोपींना अटक केली असून अकरा वाहने जप्त करण्यात आली आहेत, तसेच जिल्ह्यातील नऊ मद्यविक्री दुकाने निलंबीत केली असून शिर्डीच्या आनंदबियर शॉपीवरही परवाना निलंबनाची कारवाई झाली आहे ,
 त्यामुळे शिर्डीत खळबळ उडाली आहे,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना व सर्व बंद असताना तसेच जिल्ह्यात मध्य निर्मिती, वाहतूक व विक्री या कालावधीत बंद असताना, जिल्ह्यातील काही ठिकाणी, काही मद्यविक्री दुकानातून अवैधरित्या साठा करून मद्य विक्री केली जात होती ,अशा तक्रारी जिल्हा दारू उत्पादन शुल्क अधिकार्‍यांकडे आल्याने राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पराग नवलकर यांच्या नेतृत्वाखाली 24 मार्च ते 28 एप्रिल 20 20 या काळात या विभागाच्या अ विभाग व  ब विभाग तसेच श्रीरामपूर विभाग ,कोपरगाव विभाग, संगमनेर विभाग, अशा पाच विभागांमार्फत व दोन भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले, तसेच तक्रारी आलेल्या काही मद्यविक्री
दुकाने उघडून मद्यसाठा तपासण्यात आला, यावेळी अधिकाऱ्यांना मद्यसाठ्यात मोठी तफावत आढळली, त्यामुळे अशा हॉटेलंटवर कारवाई करण्यात आली, याविक्री दुकानांवर कारवाई करण्यात आली, त्यामध्ये श्रीरामपूर बेलापूर येथील हॉटेल गोल्डन चरीटर, हॉटेल गोविंदा गार्डन निमगाव जाळी, हॉटेल नेचर वडगाव पान, होटेल धनलक्ष्मी, देवळाली प्रवरा, हॉटेल उत्कर्ष सोनगाव सात्रळ, हॉटेल ईश्वर वडझिरे ,तालुका पारनेर, हॉटेल मंथन निघोज, पारनेर, याच बरोबर संगमनेरचे किरकोळ देशी दारू दुकान आणि शिर्डी जवळील निमगाव कोर्‍हाळे ययेथिल आनंद बिअर शॉपी याठिकाणी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून या सर्व नऊ मद्यविक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, शिर्डी येथील आनंद बिअर शॉपी च्यापाठीमागे बिअरचा सुमारे चोवीस लाख रुपये किमतीचा अवैध साठा सापडला होता, त्यामुळे या बिअरशॉपीवरहीपरवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे, तसेच या सर्व मद्यविक्री  दुकानाकडून 154 गुन्हे नोंद करत 52 लाख 4 हजार 514 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, एकूण 59 आरोपींना अटक केली असून 11 वाहने जप्त करण्यात आली आहेत, यापुढेही शासनाच्या अटी व नियमांचे पालन न करणाऱ्या मद्यविक्री केंद्रांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अहमदनगर अधीक्षक पराग नवलकर यांनी दिला आहे.

मालेगाव | प्रतिनिधी -मालेगावमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. सायंकाळी आलेल्या अहवालात एकूण ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात असतानाच मध्यरात्री प्राप्त झालेल्या दोन अहवालात जवळपास ४४ रुग्ण वाढल्यामुळे मालेगावची करोनाबाधित रुग्णांची संख्या २२७ वर पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा २७ रुग्ण मालेगावात वाढले असून मालेगावी करोना बाधित रुग्णांचा आकडा आता २५३ वर पोहोचला आहे.मध्यरात्री मिळालेल्या अहवालात सहा पोलीस आढळून आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा २७६  वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत अकरा रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.


बेलापूर ( प्रतिनिधी  )- कोरोनाच्या भितीपोटी घरातच बसा सुरक्षित रहा हा शासनाचा आदेश मानुन घरात बसलेल्या गोरगरीब परिवारासाठी लुक्कड परिवारा बरोबरच माहेश्वरी समाज तसेचअकबर टिन मेकरवाले  देखील पुढे सरसावले असुन  अडचणीत सापडलेल्या गोरगरीब जनतेसाठी हे देवदुतच ठरत आहे कोरोनामुळे लाँक डाऊन घोषित करण्यात आले या लाँक डाऊनमुळे दररोज कमाई करुन आपला चरितार्थ चालविणार्यांची दररोजच्या खाण्या पिण्याची पंचायत झाली हे लक्षात घेवुन सामाजिक कार्यात सतत अघाडीवर असणारे सुवालाल लुक्कड व लुक्कड परिवाराने अन्नछत्र चालु करण्याचा मनोदय व्यक्त केला बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी तातडीने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क  साधला त्यांनी देखील  परिस्थीती लक्षात घेता नियमांचे काटेकोर पालन करुन
अन्नछत्र सुरु करण्यास अनुमती दिली अन बेलापूर गावात गोरगरीबासाठी सुरु झाले मोफत अन्नछत्र . लुक्कड परिवाराने स्वः खर्चातुन सुरु केलेल्या मोफत अन्न छत्रास मदत करण्यास अनेक हात पुढे सरसावले . काहींनी वस्तू स्वरुपात तर काहींनी रोख स्वरुपात मदत केली . काही कार्यकर्त्यांनी सामाजिक वारसा जपत या कार्यात स्वतःला वाहुन घेतले . अन अनेक गोरगरीबांना मोठा आधार झाला . एक वेळच्या अन्नाची चिंता मिटली लाँक डाऊन मुळे पुशु पक्षाचेही हाल होत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सुवालाल लुंक्कड यांच्या निदर्शनास आणुन दिले मग काय पक्षासाठीही अन्नाची व्यवस्था करण्यात आली.लुक्कड परिवाराने सुरु केलेले अन्नछत्र केवळ सकाळीच सुरु असते . त्यामुळे अनेक जण सायंकाळचे देखील पार्सल घरी नेत होते . या नागरीकांची सायंकाळची सोय होणे गरजेचे आहे हे लक्षात घेवुन माहेश्वरी समाज देखील पुढे सरसावला . त्यांनी संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था केली . गरम पोळ्या भाजी पिशवीत पँक करुन त्याचे वाटप सुरु करण्यात आले . या अन्नछत्रास देखील  मदत करण्यास अनेक हात पुढे सरसावत आहे .  मदत देणारे आपापल्या परीने गहु , भाजीपाला व रोख रकमेच्या स्वरुपात मदत करत आहे . यात मुस्लीम समाजही मागे राहीलेला नाही , मुस्लीम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अकबर टिन मेकरवाले यांनी आपल्या घरीच जेवण तयार करुन घर पोहोच करण्याचा निर्णय घेतला . अकबर व त्यांचे कुटुंबीय ,
मित्र परिवार दिवसा गरीब कुटुंबाच्या घरी जावुन घरी किती माणसे आहेत याची आस्थेने विचारापुस करुन सांयकाळचे आपले सर्वांचे जेवण आम्ही पोहोच करतो असे सांगुन सायंकाळी त्या कुटुंबांना न चुकता जेवण पोहोच करतात कोरोनाच्या धास्तीने सर्व प्रार्थनास्थळाचे दरवाजे बंद आहेत . परंतु अन्नछत्र ते ही मोफत चालविणार्या या देवदुतामुळे अनेकांना आपल्या मदतीला देवच धावुन आल्याची अनुभती होत आहे.

अहमदनगर दि.२९- शहरातील सिव्हिल हाँस्पिटल परिसरात छापा टाकून दारु असणाऱ्या मारुती व्हँन अँब्युलन्स, एक दुचाकी आणि दारु असा २ लाख ७० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तिघांना पकडण्याची धडकेबाज कारवाई तोफखाना ठाणे हद्दीत पोलिसांनी केली.याबाबत समजलेली माहिती अशी की, जिल्हा पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांना नगर शहरातील सिव्हिल हाँस्पिटल परिसरातील सिव्हिल काँर्टर येथे पाण्याच्या टाकीजवळ सुझुकी अँक्सेसवरून विदेशी दारुची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती मिळाली. या घटनेबाबत पाटील यांनी नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना याची माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले. मिटके यांनी तोफखाना पोलीसांच्या पथकासह सिव्हिल परिसरात जाऊन सापळा लावला. या दरम्यान रस्त्याने येणारी सुझुकी अँक्सेस मोपेड (एमएच १६, सीजे ४४९६) वरील वीरु प्रकाश गोहेर (रा.सिव्हिल काँर्टर रुम नं.२७,अहमदनगर), राँबीन जाँर्ज कोरेरा (रा.सिव्हिल काँर्टर, रुम नं.७) यांना थांबवून पंचासमक्ष झडती घेतली. यावेळी त्याच्या ताब्यातून मास्टर ब्लेड कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी या दारु बाटल्या संजय हुंकारे याच्याकडून घेतल्या असून, हा त्याच्या अँब्युलन्समधून आम्हाला दारु माल काढून दिला आहे. त्याच्याकडे अजुन एक दारु बाँक्स आहे, अशी माहिती दिली. यावेळी तात्काळ पंचासमक्ष सिव्हिल परिसरात जाऊन संजय गंगाराम हुंकारे याला ताब्यात घेतले. त्याच्या अँब्युलन्स (एमएच १४, ईवाय १३६५) ची झडती घेतली, व्हँनमध्ये मास्टर ब्लेड कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. अँब्युलन्स (एमएच १४, ईवाय १३६५), सुझुकी अँक्सेस मोपेड (एमएच १६, सीजे ४४९६) व दारू जप्त करून वीरु प्रकाश गोहेर, राँबीन जाँर्ज कोरेरा, संजय गंगाराम हुंकारे यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण सुरसे, पोसई कष्णा घायवट, समाधान सोळंके, तोफखाना पोलीस ठाणे, तोफखाना डिबी पोलीस पथकातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

शिर्डी प्रतिनिधि राजेंद्र गडकरी /जय शर्मा ) सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व ते प्रयत्न करीत आहे ,सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे, सर्व बंद आहे, असे असतानाही मात्र शिर्डी जवळील सावळीविहिर फाटा येथील हॉटेल वेलकम येथे अय्याशी करण्यासाठी आलेल्या एका जोडप्याला पोलिसांनी रंगेहात पकडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे , लॉक डाऊन च्या काळात असे प्रकार घडत असल्याने शिर्डी व परिसरातील नागरिक मोठे आश्चर्य व्यक्त करीत आहेत,   यासंदर्भात शिर्डी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथील नाशिक रोडला हॉटेल वेलकम तसेच एस्सार रिसॉर्ट हॉटेल के,के,मिल्कलगत असून या हॉटेलमध्ये आज दिनांक 29 रोजी दुपारी काही मुले व मुली आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली असता, त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अौताडे व सपोनि घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलिसांचे पथक त्वरित सावळीविहीरफाटा येथील तेथे क्,के मिल्क जवळील हॉटेल वेलकम मध्ये पाठवले, या पोलीस पथकाने या हॉटेलची, तेथील रूमची झाडाझडती घेतली असता तेथे एका रूम मध्ये एक पुरुष, एक महिला आढळून आली, मोसिन मोहम्मद सय्यद वय 29 रा,गांधीनगर ,कोपरगाव हा मोटरसायकलवरून विनापरवाना कोपरगावहून सावळीविहीरफाटा येथे येऊन त्यांनी हॉटेल वेलकम येथे लॉजवर रूम घेतली होती व या रूममध्ये एक महिला सोबत होती, या लॉकडाऊनच्याच्या काळात सर्व हॉटेल बंद असताना हॉटेल वेलकम हॉटेल रिसॉर्ट चे मॅनेजर रामहरी जानराव काळे वय 29 हल्ली रा,के,के,मिल जवळ सावळीविहिर खुर्द ।ता,राहता याने आरोपींना  कोणतेही ओळखपत्र न पाहता रूम दिली तसेच त्यांची नोंद ठेवली नाही, नोंद रजिस्टर ही नव्हते, त्यामुळे रामहरी जानराव काळे यांच्यावर तसेच मोहम्मद सय्यद यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात भादवि कलम 188( 2) 269, 271 व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा ,1897 कलम 234 प्रमाणे व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस करीत आहेत, सध्या केरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन सुरू आहे ,सर्वजण आपापल्या घरात असताना शिर्डी व परिसरातील हॉटेल बंद असताना, लॉज बंद असताना तरीही अय्याशी करण्यासाठी काही जोडपे, तरुण मुले मुली शिर्डी व परिसरात येऊन लॉजवर रूमघेवून राहतात, असे शिर्डी सावळीवीर निमगाव निघोज परिसरातही अनेक लोक आहेत तिथे वरून बंद मात्र आतून चालू अशी परिस्थिती आहे, त्यांना येथील लॉजवाले अधिक पैशाच्या मोहापायी बिनधास्तपणे रूम देतात, कोणतेही ओळखपत्र किंवा नोंद ठेवली जात नाही, रजिस्टर ही नसते, यामुळे कोरोणा सारखा संसर्गाचा आजार मोठ्या प्रमाणात पसरू शकतो , सर्वजण आपापल्या घरात आहेत, मात्र काही जण मौजमजा करण्यासाठी कोणताही विचार न करता पैशाच्या जीवावर फिरत असतात, लॉज वाले सुद्धा पैशासाठी काहीही करायला तयार होतात असे अनेक लॉज सध्या आहेत,याकडे पोलीस यंत्रणा अधिक लक्ष देईल काय ।।असा सवाल शिर्डी व परिसरातून आता होऊ लागला आहे,


शिर्डी राजेंद्र गडकरी -कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचाही कोरोनापासून बचाव व्हावा व कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आमदार आशुतोषदादा काळे यांनी सदर संरक्षक साहित्य या शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. व या साहित्याचे आमदार काळे यांनी स्वतः लॉकडाऊनचे नियम पाळत सामाजिक दुरी ठेवत वाटप केले आहे , सध्या कोरोना मुळे सर्व शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे अशा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही दुर्दैवाने कोरोणाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांची विशेष काळजी घेऊन त्यांनाही साहित्य वाटण्यात आले आहे,  कोपरगाव येथे पंचायत समिती कार्यालयात आ, आशुतोषदादा काळे यांनी आज पंचायत समिती कर्मचारी,
तालुका आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांचे कर्मचारी, डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम आरोग्य केंद्र कर्मचारी, तालुक्यातील सर्व आशा सेविका, आंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, कोपरगाव नगरपरिषद स्वछता कर्मचारी, सर्वेक्षण कर्मचारी व पत्रकार यांना ५०० पीपीई किट, ४२ इन्फ्रारेड थर्मामीटर, ३००० सॅनिटायझर,  ३००० एन ९५ मास्क, १०० फेस शिल्ड मास्क व ३००० ट्रिपल लेयर मास्कचे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून वाटप केले, यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, कोपरगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे, सर्व आपत्कालीन व्यवस्थेतील कर्मचारी, पत्रकार आदी उपस्थित होते.

शिर्डी राजेंद्र गाड़करी ) -नुकत्याच फेब्रुवारी 20 20 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत श्रीदिप संदीप आडागळे याने घवघवीत यश प्राप्त केले आहे, श्रीदीप आड़ागळेचा जिल्ह्यात 26 वा नंबर आला आहे, राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षा फेब्रुवारी मध्ये घेण्यात आली होती ,या परीक्षेत दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेतील इयत्ता चौथी मध्ये शिकणारा श्रीदीप संदीप आडागळे हा या परीक्षेला बसला होता ,या परीक्षेत त्याला 300 पैकी 246 गुण मिळाले असून त्याचा राज्यात 28 व नंबर आला आहे, तसेच जिल्ह्यात तो 26 वा आला आहे ,
श्रीरामपूर तालुक्यात त्याचा 9वा नंबरआला आहे, ही परीक्षा राज्यस्तरीय होत असते, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला बसतात ,अशा या परीक्षेत श्रीदिप आडागळे याने जिल्ह्यात 26 वा येऊन मोठे यश प्राप्त केले आहे, त्याला वर्गशिक्षक भाग्येश ठाणगे, मुख्याध्यापक बी एस कांबळे, यांचे व इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ,या यशाबद्दल हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, या स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र जोशी व पदाधिकारी शिक्षक व सर्व जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी व नागरिकांकडून या छोट्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget