Latest Post

शिर्डी (राजेंद्र गडकरी ) अक्षयतृतीयाला लागणाऱ्या मातीच्या करा, केळी ह्या बनवण्याचे काम दरवर्षी  मोठ्या प्रमाणात तालुक्यातील रुई व परिसरात होत असते ,मात्र सध्याच्या लॉकडॉऊन परिस्थितीमुळे करा, केळी बनवण्याचे काम कमी झाले असून यावर्षी करा केळी दिसेनासे झाले आहेत,
सध्या कोरोना मुळे देशभर लॉक डाऊन सुरू आहे, सर्व काही बंद आहे, त्यामुळे करा केळी बनवण्याचे काम ही बंद आहे ,रूईला  दरवर्षी कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात मातीच्या करा केळी बनवण्यात येत होत्या ,तसेच माठ, रांजण या उन्हाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात बनवण्यात येतात , मात्र यावर्षी कोरोना मुळे सर्व बंद आहे, कुंभार कारागीर व मजूर लॉकडाऊन चे नियम व सामाजीक दुरीचे भान ठेवत
असल्यामुळे कामावर येत नाहीत, शिवाय करा केळी माठ यांना लागणारे कच्चामाल वाहतूक बंद असल्यामुळे तेही मिळत नाही,घरातील सदस्याकंडून घरातल्याघरात करा केळी काही प्रमाणात येथे बनविण्यात येत असली तरी या करा केळीना विक्रीसाठी मार्केट सध्या उपलब्ध नाही ,सध्या लॉकडाऊन चा काळ सुरू आहे ,अत्यावश्यक  सेवा सोडून  सर्व बंद आहे , रस्ते ओस पडले आहेत,  सर्वजण आपापल्या घरात आहेत , बाहेर फिरणे गुन्हा आहे  ,त्यामुळे  कराकेळी घेण्यास कोण येणार। असा प्रश्न आहे,  याच कालावधीत अक्षय तृतीया हा सण येत आहे ,त्यामुळे करा, केळी विक्री करणे मुश्कील आहे, हा दृष्टिकोन ठेवूनच यावर्षी अगदी कमी प्रमाणात व तेही घरातल्या घरात मातीच्या करा केळी बनवण्याचे काम सुरू आहे, वही  रांजण माठ करा केळी  चुली  बनवण्याची कला  वडिलोपार्जित  करत असून  ही कला जोपासण्यासाठी  हा धंदा  परवडत नसला तरी आम्ही करत असल्याचे रूई येथील पारंपरिक हा व्यवसाय करणारे कुंभार कारागीर छबुराव हरिभाऊ वाकचौरे व सागर कुसाळकर यांनी सांगितले, तसेच शिर्डीला द्वारकामाईत व मंदिर परिसरात श्री साईबाबा हयात असताना दिवे लावण्यास सुरुवात झाली होती सुमारे1 35 वर्षांपासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे, पूर्वीपासून  आम्ही शिर्डीत पणत्या दुकानदारांना  होलसेल देतो, आता मीही येथे दिवे लावण्यासाठी मातीच्या पणत्या चाकावर बनवून देतो ,सध्या कोरोनामुळे प्रथमच शिर्डीत या पणत्या विक्री बंद आहे त्यामुळे हातावर काम करणारे आम्ही कारागीर मोठ्या आर्थिक संकटात आलो आहे, शासनानेही आमच्यासारख्या कारागीर कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले,
 करा ,केळी ही अक्षयतृतीयाला पूजनासाठी लागते, त्यामुळे  काहीजण आमच्या कडे  येऊन ही करा केळी खरेदी करत आहेत ,मात्र यावर्षी लॉक डाऊन मुळे सर्व सण-उत्सव हे शांततेच व परंपरेला फाटा देत घराघरात साजरे करण्यात येत आहेत, त्यामुळे अक्षयतृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असला तरीही घरातच हा सण यावर्षी साध्या पद्धतीने साजरा  होणार आहे, सध्या सर्वजण  लॉकडाऊन मुळे घरात आहे, आर्थिक अडचण होत आहे  ,तरीही लॉक डाऊन चे नियम पाळून  सोशल डिस्टंन्स ठेवून  या कोरोणा चा मुकाबला सर्वांनी करू या।।  असेही यावेळी   या कुंभार कारागीर छबुराव हरिभाऊ वाकचौरे यांनी सांगितले.

मालेगाव : येथील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेच, शुक्रवारी एकाच कुटुंबातील सहा जण पॉझिटिव्ह मिळून आले. त्याचबरोबर मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने प्रशासन धास्तावले आहे. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत आणखी दोघांची भर पडल्याने मालेगावात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ झाली आहे.राज्यातील कोरोनाचा कहर वाढतच चालला असून, त्यामुळे शासन व प्रशासन गतीने कामाला लागले आहे. मुंबई-पुणे पाठोपाठ मालेगावदेखील हॉटस्पॉट ठरले असून, राज्यात मालेगाव हा एकमेव असा तालुका ठरला आहे, जेथे बाधितांची संख्या शंभरी पार झाली आहे, तर तेथील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही दोन अंकी झाली आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी मालेगावमधील यंत्रणा अधिक प्रभावी व कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.दरम्यान, शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार मालेगावमध्ये आणखी सहा कोरोनाबाधित आढळले असून, यापूर्वीच्या बाधिताच्या एकाच कुटुंबातीलच हे नवीन सहा रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. मालेगाव शहरात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरुद्ध पोलिसांतर्फे कडक कारवाई केली जात आहे. मालेगावच्या सीमेलगत असलेल्या खेडेगावात मात्र लॉकडाउन नुसते नावापुरते आहे की काय, असा सवाल सर्वसामान्य जागरूक नागरिक विचारत आहेत. क्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठं असलेल्या दाभाडी गावाचा विस्तार बऱ्याचं प्रमाणात झालाय. वाड्या-वस्त्यांनी विकसित झालेल्या गावात संचारबंदीचा बोजवारा उडाल्याचे चित्र बघावयास मिळतंय. पोलीस आल्यावर बाजूला होणं आणि नंतर आहे तसेच वर्तन बघावयास मिळतंय, त्यामुळे भविष्यात कुणी कोरोना आणल्यास परिस्थिती चिंंताजनक होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सिल्लोड,  एका तरुणाने खदानीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्यासुमारास तालुक्यातील तळनी येथे घडली. दरम्यान पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बराच शोध घेतला, पण मृतदेह मिळून आला नाही. अखेर पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. रात्री उशिरा अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होणार होते.
         पंजाब सुंदरसिंग ठाकूर (32 रा. तळनी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
      घटनेची माहिती अशी की, मयत तरुण आपल्या भावासह दुचाकीवरुण तळनी शिवारातील मंदिराकडे जात होते. या दरम्यान रस्त्यातील खदानीजवळ दुचाकी उभी करुण पंजाबने खदानीतील पाण्यात उडी मारली. उडी मारताच त्याच्या भावाने आरडा- ओरड केली. शेजारील शेतकरी मदतीला धावुन येई पर्यंत पंजाब पाण्याच्या तळाशी बुडाला होता. या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक विलास आडे, मुश्ताख शेख, देवीदास जाधव, काकासाहेब सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने बराच शोध घेतला, पण पाणी आधीक खोलवर असल्याने रात्री उशिरा पर्यंत मृतदेह मिळून आला नाही. दरम्यान पोलिस घटनास्थळी ठाण मांडून होते.
अग्निशामक दल पाचारण
      यंदा तालुक्यात तब्बल 23 दिवस अवकाळी पाऊस झाल्याने सर्व जलसाठे तुडुंब भरले होते. यामुळे या खदानीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बरेच प्रयत्न केले. पण यश न आल्याने अखेर अग्निशामक दलाला पाचारण केले. रात्री 11 वाजेच्यासुमारास अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पाथर्डी : येथील किराणा दुकानाचे गोडवून फोडून खाद्य तेलाचे डबे चोरणारे चोरटे जेरबंद करुन ५ लाख ७ हजार ६२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रंगनाथ दिलीप गायकवाड (वय २०, रा.हंडाळवाडी, ता.पाथर्डी), सुरज शामराव दहिवाले (वय २५,रा.इंदिरानगर, पाथर्डी), असीफ लाला शेख (वय २५, रा.तकीया मस्जिद, चिंचपूररोड, पाथर्डी), फिरोज लाला पठाण (वय २९, रा.रंगारगल्ली, पाथर्डी), अजहर सलीम शेख (वय २५, रा.रंगारगल्ली, पाथर्डी) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी शहरातील नगरपालिका शाँपिंग गाळ्यामध्ये होलसेल किराणा मालाचे गोडवून लाँकडाऊनमध्ये बंद आहे. दि.१३ ते १९ एप्रिल या दरम्यान, गोडाऊनचे शेटर तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ५० हजार ९२० रुपयाचे खाद्यतेल डबे चोरुन नेल्याची पाथर्डी पोलीस ठाण्यात अल्पेश अशोक भंडारी यांनी फिर्याद दिली होती. हा गुन्हा रंगनाथ गायकवाड व त्याच्या साथीदार मिळून केला असल्याची माहिती खबऱ्यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली होती, त्यानुषंगाने पाथर्डी येथे जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलीसांनी चौकशी केली असता, रंगनाथ दिलीप गायकवाड (वय २०, रा.हंडाळवाडी, ता.पाथर्डी) याने सुरज शामराव दहिवाले (वय २५,रा.इंदिरानगर, पाथर्डी), असीफ लाला शेख (वय २५, रा.तकीया मस्जिद, चिंचपूररोड, पाथर्डी), फिरोज लाला पठाण (वय २९, रा.रंगारगल्ली, पाथर्डी), अजहर सलीम शेख (वय २५, रा.रंगारगल्ली, पाथर्डी) अशा सर्वांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली टेम्पो (क्र.एमएच २४, एबी ५८१३) आणि चोरलेले तेलाचे डबे असा एकूण ५ लाख ७ हजार ६२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुढील तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाँ दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, देवीदास काळे, पोना रविंद्र कर्डीले, रोहित मिसाळ, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, विनोद मासाळकर, दीपक शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रमजानुल मुबारक लेख मालिका नं.(१)
""अल्लाच्या करुणेचा महिना""
आज" चांद रात मुबारक"" इस्लामी कालगणनेनुसार मोहर्रम हा पहिला (१)महिना रमजान (९)नववा महिना. इस्लामी महीन्याची सुरुवात चंद्रमा नुसार होते , कोणताही महिना असो सुरुवात चंद्रकोर नुसार होते त्याला चांदरात असं म्हणतात .प्रत्येक महिन्याच्या अमावस्या नंतर दुसऱ्या दिवशी
चंद्रदर्शनाने सुरुवात होऊन  आठवा (८)शाबान महिन्याचा 30 व्या दिवशी चंद्र कोर दिसते त्याला अनन्य- साधारण महत्व प्राप्त झालेले आहे,""पवित्ररमजानुल मुबारक की" चांदरात ""आसे म्हणतात.  दुसऱ्या दिवशी रमजानुल मुबारक चा पहिला रोजास सुरुवात होते ,बांधव आप आपल्या नातेवाईकांना ,स्वकीयांना, दोस्तांना देऊन फोन करून ,व्हाट्सअप, फेसबुक twiter च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन चांद मुबारक च्या  शुभेच्छा ,शुभ चिंतन देतात ,आप आपसात शुभेच्छाची आदानप्रदान करून ऐका सुखद पर्वाला सुरुवात होते ,बालगोपालांचा आनंद गगनात मावेनासा होतो ,
प्रेषित हजरत मोहम्मद यांनी हादीसच्या सांगितल्यानुसार तुम्ही ज्या वेळेस पहिले चंद्रकोर बघाल त्यावेळेस अल्लाहा(परमेश्वरा )जवळ शुभ- शुभ चांगले जे तुम्हाला मागता येईल ती करुणा मागता येईल तेवढी करूणा  मांगा , सुखरूप आरोग्य  मांगा ,अल्लाहाकरीमचा वाद आहे की मी ती पुर्ण करेल व त्यावेळचे  पूण्य तुम्हाला
 नक्कीच  प्राप्त होईल .
अब्दुल्लाह बिन उमर( रजी .)हे प्रेषितांचे मिञ सांगतात की प्रेषित मोहम्मद (  स्व) यांनी म्हटले आहे की" चंद्रदर्शन बघून दुसऱ्या दिवशी रमजान चा रोजा (उपवास )धरा व चंद्रदर्शन करूनच रोजाची ( सांगता )ईप्तार करा  "(बुखारी शरीफ(ह. 1906),
आबु-हुरैरा( रजि.) ही हेच सांगतात की "चंद्रदर्शन करुनच रोजा धरा व ईप्तार ही(,रोजा समाप्त )  करा , जर पावसाळ्यात  आकाशात ढग आलेले आसल्यास ,चंद्रदर्शन होत नसल्यास ३० रोजे पुर्ण करावेत"(बुखारी शरिफ - हा.१९०९)
त्याच राञी पविञ रमजानुल मुबारक पर्वाची भक्तीभावाने सुरुवात होवुन बांधव आपल्या दैनंदिन गरजा पुर्ण करुन मगरिबच्या नमाज नंतर रमजान महीन्याच्या  विशिष्ट पुण्यप्राप्ताची खास " तरावीह नमाज" ची तय्यारीला लागतात  व घरातील भगिनी ,माता ,सकाळच्या " सेहरी " च्या तैय्यारीस लागतात ,लहानबाळगोपाळांचा उत्साह तर गगऩात मावेानासा राहतो ,

परंतु यंदाच्या वर्षांचे सर्व जगामधे जो  CORONA Virus ,COVID-19 या महाभयंकर महामारीने हाहाकार,. धुमाकुळ घातल्यामुळे व आपल्या भारत देशात सुध्दा धुमाकुळ चालु आहे, त्या महामारीच्या  आजारापासुन बचाव करण्यासाठी,व कुणालाही corona ची लागण होवु नये म्हणुन आपल्याला  सरकारने व WHO  या जागतिक आरोग्यसंघटनेने ,सांगितलेल्या protocol , व आदेशानुसार व आप- आपल्या मौलाना व संबधीत मस्जिद प्रमुखांच्या
सुचनेनुसार
"आपुन स्वत:च्या घरामधेच राहुन  नमाज , रोजा , तरावीह नमाज , कुराण तिलावत ,ई जी काही रमजानुल मुबारक चे पुण्य कर्मे आहेत सर्व घरामधे राहुनच करावेत , व पुण्य हासील करावेत ,आपल्या
 दररोजच्या दुआमधे  आल्लाहा करीम जवळ दुआ ,याचना ,करुणा करा ,की जगात जे corona ,covid-19 ने जो धुमाकुळ चालु आहे त्यातुन जगातील सर्व मानव जातीची पशु ,प्राणीमाञांची सुखरुप व  निरोगी  राहण्याची प्रार्थना करावी ""
आप- आपल्या घरामधे SOCIAL- DISTANCES ,पाळुन व साबणाने वारंवार हात स्वच्छ धुऊन , घरामधेच राहुन , मास्क MASK चा वापर करुन ,  स्वतःहाला ,घरातील सर्व मंडळींना ,मोहल्ले ,गल्लीतील,गावातील,.शहरातील  ,भारतातील,सर्वांची काळजी घ्यावी व सरकार ,प्रशासनास सहकार्य करुन corona च्या युध्दात ,आपण विजयी होवू ।।।
लेखक- डॉ. सलीम सिकंदर शेख ,
बैतुशशिफा दवाखाना, श्रीरामपुर, ९२७१६४००१४ )
STAY HOME ,
STAY HEALTHY ,
You Healthy , Nation Healthy ""

सावळीविहीर राजेंद्र गडकरी राहता तालुक्यातील सावळीविहीर येथे भाजीपाला, फळे यांची दुकाने आठवड्यातून दोनच दिवस पुढील आदेश येईपर्यंत मंगळवार, शुक्रवार या दिवशीच चालू ठेवण्यात यावीत व  तशी ग्रामपंचायतची  संबंधित दुकानदारांनी परवानगी घ्यावी  अन्यथा  अशा दुकानदारांवर  कारवाई करण्यात येईल,  असा इशारा  सावळीविहीर चे ग्रामसेवक खर्डे व कामगार तलाठी गायके   यांनी एका पत्रकान्वये दिला आहे ,
 राहता तालुक्यातील सावळीविहीर येथे भाजीपाला, फळे यांची दुकाने सध्या आठवड्यातून सर्व दिवस सुरु असतात, त्यामुळे येथे गर्दी व लॉक डाऊन चे नियम मोडत असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे सावळीविहीर येथे भाजीपाला व फळे विक्रेत्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेऊनच आठवड्यातून दोनच दिवस मंगळवार व शुक्रवार आपले भाजीपाला व फळे दुकाने चालू ठेवावीत इतर दिवशी ते बंद ठेवावीत, व या आदेशाची आजपासून  अंमलबजावणी करण्यात यावी  ,असे एका पत्रकान्वये कळविण्यात आले आहे, 
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  गावात, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने व राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे तसेच राहता पंचायत समितीचे गटविकासअधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाय योजना  करण्यात येत आहेत, सर्वांप्रमाणे दुकानदारांनी नियम पाळणे गरजेचे आहे ,जर कोणी वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास अश्या दुकानदारांवर   कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, त्याच प्रमाणे गावातील जीवनावश्यक अशा किराणा दुकाने तसेच शेती पूरक व्यवसाय, हार्डवेअर दुकाने, हेही सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू ठेवावीत, इतर वेळी बंद ठेवावी, जर दुपारी एक नंतर अशी दुकाने सुरू असल्यास अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल ,त्याच प्रमाणे भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते किराणा दुकानदार, शेती पूरक व्यवसाय करणारे, हार्डवेअर दुकानदार ,आदी विक्रेत्यांनी आपल्या तोंडाला मास्क लावावे, सोशल डिस्टंन्स पाळावेत, कोठेही थुंकू नये ,जर असे नियम मोडल्यास अशांवर कलम 144 प्रमाणे गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तोंडाला मास्क  नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी कोठेही थुंकणे,  अशांकडून  पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येईल ,असे या पत्रात  म्हटले आहे, या पत्रकावर सावळीविहीर चे कामगार तलाठी गायके यांच्याबरोबरच ग्रामसेवक खर्डे, सरपंच सौ रुपाली संतोष आगलावे यांच्या सह्या आहेत,
 तरी प्रत्येकाने या आदेशाचे उल्लंघन करू नये ,लॉक डाऊन चे नियम सर्व गावातील नागरिकांनी पळावे, कोणीही  नियम तोडू नये, विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला मास्क लावावे ,असे आवाहन सावळीविहीर च्या सरपंच सौ रुपाली संतोष आगलावे व उपसरपंच सौ, वृषाली ओमेश जपे तसेच पोलीस पाटील सौ,सुरेखा सुरेश वाघमारे यांनी केले आहे,

दिनांक २४/०४/२०२० रोजी श्री.दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना
गोपनिय माहीती मिळाली कि, अहमदनगर ते सोलापुर रोडने सोलापुरकडुन अशोक लेलॅन्ड टेम्पो क्र.एम एच २० ई
जी ८९१९ यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला इ. तंबाखूजन्य पदार्थ विक्री
करण्याचे उददेशाने कांदयाचे गोण्याखाली लपवून अहमदनगर च्या दिशेने सदर टेम्पो येत असल्याबाबत खात्रीशीर
बातमी मिळाल्याने. सदर ठिकाणी कायदेशीर कारवाई करणे करीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/संतोष लोढे,रविंद्र
कर्डीले,पोकॉ/रोहीत मिसाळ, पोकॉ/प्रकाश वाघ, राहुल सोळंके यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन कारवाई
करीता खाजगी वाहनाने रवाना केले. त्यांनतर पथकातील वरील कर्मचारी यांनी दोन पंचासमक्ष अहमदनगर ते
सोलापुर रोडला दरवाडी शिवारात कन्टमिट जकात नाका यर्थ रस्त्याला सापळा रचुन थाबला असताना त्याना
बातमीतील नमुद वर्णनाचा टेम्पो नगरचे दिशेने येताना दिसला सदर टेम्पो चालकास टेम्पो थांबविण्यास लावुन
टेम्पो चालक व त्याचे शेजारी बसलेल्या इसमास ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी
त्यांचे नांवे १) सलीम युसुफ शेख वय-२४ रा.भारत नगर,वाळुज ता.गंगापुर जि.औरंगाबाद २) संतोष अशोक
शिंदे वय-३४ रा.श्रध्दानगर ,बिडकीन ता.पैठण जि.औरंगाबाद असे असल्याचे सांगुन सदर टेम्पो मधील गुटखा
व तंबाख ही ३) सचिन म्हस्के रा.वाळूज ता.गंगापुर याचे मालकीची असल्याबाबत कळवीले .सदर टेम्पोची
पंचासमक्ष झडती घेतली असता सदर टेम्पोचे समोरील काचेवर अत्यावश्यक सेवा असे स्टीकर लावलेले दिसले व
त्याचे मागील होद चेक केला असता २० कांदयाचे भरलेल्या गोण्याखाली लपवलेला हिरा कंपनीचा पानमसाला
गुटखा ,हिरा मिक्स तांखुचे पोते असा वाहानासह एकुण ५,४२,२५६ /- रु.किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष
पंचनामा करुन जप्त केला असुन सदर कारवाई बाबत मा.जिल्हा अन्न व औषध प्रशासन ,अहमदनगर यांना संपर्क
केला आहे.सदर ताब्यात घेतलेले इसम नामे १) सलीम युसुफ शेख वय-२४ रा.भारत नगर,वाळुज ता.गंगापुर
जि.औरंगाबाद २) संतोष अशोक शिंदे वय-३४ रा.श्रध्दानगर ,बिडकीन ता.पैठण जि.औरंगाबाद यांना मुददेमालासह
पुढील कारवाई कामी भिंगार कॅम्प पो.स्टे समक्ष हजर केले असुन पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन
करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.अखिलेश कुमार सिंह ,पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्री. सागर पाटील,
अप्पर पोलीस अधीक्षक,अहमदनगर , मा.श्री. संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर
विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली
आहे.


 


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget