रमजानुल मुबारक लेख मालिका नं.(१)
""अल्लाच्या करुणेचा महिना""
आज" चांद रात मुबारक"" इस्लामी कालगणनेनुसार मोहर्रम हा पहिला (१)महिना रमजान (९)नववा महिना. इस्लामी महीन्याची सुरुवात चंद्रमा नुसार होते , कोणताही महिना असो सुरुवात चंद्रकोर नुसार होते त्याला चांदरात असं म्हणतात .प्रत्येक महिन्याच्या अमावस्या नंतर दुसऱ्या दिवशी
चंद्रदर्शनाने सुरुवात होऊन आठवा (८)शाबान महिन्याचा 30 व्या दिवशी चंद्र कोर दिसते त्याला अनन्य- साधारण महत्व प्राप्त झालेले आहे,""पवित्ररमजानुल मुबारक की" चांदरात ""आसे म्हणतात. दुसऱ्या दिवशी रमजानुल मुबारक चा पहिला रोजास सुरुवात होते ,बांधव आप आपल्या नातेवाईकांना ,स्वकीयांना, दोस्तांना देऊन फोन करून ,व्हाट्सअप, फेसबुक twiter च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन चांद मुबारक च्या शुभेच्छा ,शुभ चिंतन देतात ,आप आपसात शुभेच्छाची आदानप्रदान करून ऐका सुखद पर्वाला सुरुवात होते ,बालगोपालांचा आनंद गगनात मावेनासा होतो ,
प्रेषित हजरत मोहम्मद यांनी हादीसच्या सांगितल्यानुसार तुम्ही ज्या वेळेस पहिले चंद्रकोर बघाल त्यावेळेस अल्लाहा(परमेश्वरा )जवळ शुभ- शुभ चांगले जे तुम्हाला मागता येईल ती करुणा मागता येईल तेवढी करूणा मांगा , सुखरूप आरोग्य मांगा ,अल्लाहाकरीमचा वाद आहे की मी ती पुर्ण करेल व त्यावेळचे पूण्य तुम्हाला
नक्कीच प्राप्त होईल .
अब्दुल्लाह बिन उमर( रजी .)हे प्रेषितांचे मिञ सांगतात की प्रेषित मोहम्मद ( स्व) यांनी म्हटले आहे की" चंद्रदर्शन बघून दुसऱ्या दिवशी रमजान चा रोजा (उपवास )धरा व चंद्रदर्शन करूनच रोजाची ( सांगता )ईप्तार करा "(बुखारी शरीफ(ह. 1906),
आबु-हुरैरा( रजि.) ही हेच सांगतात की "चंद्रदर्शन करुनच रोजा धरा व ईप्तार ही(,रोजा समाप्त ) करा , जर पावसाळ्यात आकाशात ढग आलेले आसल्यास ,चंद्रदर्शन होत नसल्यास ३० रोजे पुर्ण करावेत"(बुखारी शरिफ - हा.१९०९)
त्याच राञी पविञ रमजानुल मुबारक पर्वाची भक्तीभावाने सुरुवात होवुन बांधव आपल्या दैनंदिन गरजा पुर्ण करुन मगरिबच्या नमाज नंतर रमजान महीन्याच्या विशिष्ट पुण्यप्राप्ताची खास " तरावीह नमाज" ची तय्यारीला लागतात व घरातील भगिनी ,माता ,सकाळच्या " सेहरी " च्या तैय्यारीस लागतात ,लहानबाळगोपाळांचा उत्साह तर गगऩात मावेानासा राहतो ,
परंतु यंदाच्या वर्षांचे सर्व जगामधे जो CORONA Virus ,COVID-19 या महाभयंकर महामारीने हाहाकार,. धुमाकुळ घातल्यामुळे व आपल्या भारत देशात सुध्दा धुमाकुळ चालु आहे, त्या महामारीच्या आजारापासुन बचाव करण्यासाठी,व कुणालाही corona ची लागण होवु नये म्हणुन आपल्याला सरकारने व WHO या जागतिक आरोग्यसंघटनेने ,सांगितलेल्या protocol , व आदेशानुसार व आप- आपल्या मौलाना व संबधीत मस्जिद प्रमुखांच्या
सुचनेनुसार
"आपुन स्वत:च्या घरामधेच राहुन नमाज , रोजा , तरावीह नमाज , कुराण तिलावत ,ई जी काही रमजानुल मुबारक चे पुण्य कर्मे आहेत सर्व घरामधे राहुनच करावेत , व पुण्य हासील करावेत ,आपल्या
दररोजच्या दुआमधे आल्लाहा करीम जवळ दुआ ,याचना ,करुणा करा ,की जगात जे corona ,covid-19 ने जो धुमाकुळ चालु आहे त्यातुन जगातील सर्व मानव जातीची पशु ,प्राणीमाञांची सुखरुप व निरोगी राहण्याची प्रार्थना करावी ""
आप- आपल्या घरामधे SOCIAL- DISTANCES ,पाळुन व साबणाने वारंवार हात स्वच्छ धुऊन , घरामधेच राहुन , मास्क MASK चा वापर करुन , स्वतःहाला ,घरातील सर्व मंडळींना ,मोहल्ले ,गल्लीतील,गावातील,.शहरातील ,भारतातील,सर्वांची काळजी घ्यावी व सरकार ,प्रशासनास सहकार्य करुन corona च्या युध्दात ,आपण विजयी होवू ।।।
लेखक- डॉ. सलीम सिकंदर शेख ,
बैतुशशिफा दवाखाना, श्रीरामपुर, ९२७१६४००१४ )
STAY HOME ,
STAY HEALTHY ,
Post a Comment