किराणा दुकानाचे गोडवून फोडून खाद्य तेलाचे डबे चोरणारे चोरटे जेरबंद करुन ५ लाख ७ हजार ६२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई.

पाथर्डी : येथील किराणा दुकानाचे गोडवून फोडून खाद्य तेलाचे डबे चोरणारे चोरटे जेरबंद करुन ५ लाख ७ हजार ६२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रंगनाथ दिलीप गायकवाड (वय २०, रा.हंडाळवाडी, ता.पाथर्डी), सुरज शामराव दहिवाले (वय २५,रा.इंदिरानगर, पाथर्डी), असीफ लाला शेख (वय २५, रा.तकीया मस्जिद, चिंचपूररोड, पाथर्डी), फिरोज लाला पठाण (वय २९, रा.रंगारगल्ली, पाथर्डी), अजहर सलीम शेख (वय २५, रा.रंगारगल्ली, पाथर्डी) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी शहरातील नगरपालिका शाँपिंग गाळ्यामध्ये होलसेल किराणा मालाचे गोडवून लाँकडाऊनमध्ये बंद आहे. दि.१३ ते १९ एप्रिल या दरम्यान, गोडाऊनचे शेटर तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ५० हजार ९२० रुपयाचे खाद्यतेल डबे चोरुन नेल्याची पाथर्डी पोलीस ठाण्यात अल्पेश अशोक भंडारी यांनी फिर्याद दिली होती. हा गुन्हा रंगनाथ गायकवाड व त्याच्या साथीदार मिळून केला असल्याची माहिती खबऱ्यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली होती, त्यानुषंगाने पाथर्डी येथे जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलीसांनी चौकशी केली असता, रंगनाथ दिलीप गायकवाड (वय २०, रा.हंडाळवाडी, ता.पाथर्डी) याने सुरज शामराव दहिवाले (वय २५,रा.इंदिरानगर, पाथर्डी), असीफ लाला शेख (वय २५, रा.तकीया मस्जिद, चिंचपूररोड, पाथर्डी), फिरोज लाला पठाण (वय २९, रा.रंगारगल्ली, पाथर्डी), अजहर सलीम शेख (वय २५, रा.रंगारगल्ली, पाथर्डी) अशा सर्वांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली टेम्पो (क्र.एमएच २४, एबी ५८१३) आणि चोरलेले तेलाचे डबे असा एकूण ५ लाख ७ हजार ६२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुढील तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाँ दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, देवीदास काळे, पोना रविंद्र कर्डीले, रोहित मिसाळ, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, विनोद मासाळकर, दीपक शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget