खदानीच्या पाण्यात उडी मारून पंजाब सुंदरसिंग ठाकूर या तरुणाने केली आत्महत्या.

सिल्लोड,  एका तरुणाने खदानीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्यासुमारास तालुक्यातील तळनी येथे घडली. दरम्यान पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बराच शोध घेतला, पण मृतदेह मिळून आला नाही. अखेर पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. रात्री उशिरा अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होणार होते.
         पंजाब सुंदरसिंग ठाकूर (32 रा. तळनी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
      घटनेची माहिती अशी की, मयत तरुण आपल्या भावासह दुचाकीवरुण तळनी शिवारातील मंदिराकडे जात होते. या दरम्यान रस्त्यातील खदानीजवळ दुचाकी उभी करुण पंजाबने खदानीतील पाण्यात उडी मारली. उडी मारताच त्याच्या भावाने आरडा- ओरड केली. शेजारील शेतकरी मदतीला धावुन येई पर्यंत पंजाब पाण्याच्या तळाशी बुडाला होता. या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक विलास आडे, मुश्ताख शेख, देवीदास जाधव, काकासाहेब सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने बराच शोध घेतला, पण पाणी आधीक खोलवर असल्याने रात्री उशिरा पर्यंत मृतदेह मिळून आला नाही. दरम्यान पोलिस घटनास्थळी ठाण मांडून होते.
अग्निशामक दल पाचारण
      यंदा तालुक्यात तब्बल 23 दिवस अवकाळी पाऊस झाल्याने सर्व जलसाठे तुडुंब भरले होते. यामुळे या खदानीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बरेच प्रयत्न केले. पण यश न आल्याने अखेर अग्निशामक दलाला पाचारण केले. रात्री 11 वाजेच्यासुमारास अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget