Latest Post

भैरवनाथ नगर-प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील गोन्धवनी भैरवनाथ नगर येथे  मावलया मळा रोडवर स्मशान भुमी समोर भर दुपारी महावितरनच्या विजेच्या तारा खाली लोळ घेतल्यामुळ जनावरांचा ज्वारी चा कडबा  घेऊन जात आसलेली मालवाहू पिक अप MH -16 Q 6467 या गाडीचा विजेच्या तारेला स्पर्श होताच मालवाहू पिक अप ने पेट घेतला त्यात गाडी सह ज्वारीचा कडबा जळुन खाक झाला.       
  दरम्यान गाडी मालक प्रकाश रावसाहेब वायकर यांनी अग्नीशमक बोलवुन आग विझवन्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतू तोपर्यंत पिकअप चे मोठ्या प्रमाणात आगीने नुकसान झाले आहे. आधिच को रो ना च्या संकटात शेतकरी संकटात सापडलेला आसताना महावितरन च्या गलथान पनामुळे अशा घटना घडायला लागल्या आहेत.                        तरी या भैरवनाथ नगर परीसरातील झोळ खाउन खाली आलेल्या तारा महावितरन ने व्यवस्थित करुन घ्याव्यात व प्रकाश  वायकर  या होतकरु तरुनास नुकसान भरपाई मिळावी  अशी मागणी भैरवनाथ नगर चे तंटामुक्ती चे अध्यक्ष बाळासाहेब दिघे व सामा.कार्यकर्ते  दत्तात्रय कांदे यांनी केली आहे.

सोनई -बांजोळी ता. नेवासा येथील खडी चोरणा.या तीन चोरांना अटक करुन त्यांचेकडुन चोरीस गेलेली खडी. जे सी
बी मशीन व दोन उपर असा एकुण १९ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त- सोनई पोलीसांची
कारवाई दि. 4/०४/२०२० रोजी भाउसाहेब.सोपान सोनवणे, वय ५३ वर्ष, धंदा सिव्हील कॉन्ट्रैक्टर, रा सोनई, ता नेवासा ।
यांचे मालकिवी वांजोळी ता.नेवासा येथील ३ लाख रुपये किंमतीची १५० बारा खड़ी दि.२१/३/२०२० व दि. २२/03/२०२० ।
रोजी कोणीतरी अज्ञात चोरटयाने घोरुन नेली आहे." अशी फिर्याद दिल्याने सोनई पो.स्टे.ला ग.र.न.१२६/२०२० भादवि ।
कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता,सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे
यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका/१५९६ दत्तात्रय मोहन गावडे, पोहेकॉ/२९२ संजय बाबुराव चहाण, पोना/२०२२ शिवाजी
नामदेव माने व पोका/३१६ विठठल पोपट थोरामा य पोकॉ गणेश कुंडलीक आडागळे यांनी सदर गुन्हयाचा कौशल्याने व
कसोशीने तपास करान गुणा बातमीदारां मार्फत बातमी काढुन गुन्हयातील आरोपी नामे १) विजय एकनाथ पवार यय २९ वर्ष
रा.शिगवेतुकाई ता.नेवासा २) सतिष शिवाजी खंडागळे यय २८ वर्षे रा वांजोळी ता नेयासा ३) शानेश्वर बाळासाहेब पटारे ।
वय २८ वर्षे रा पटारे वस्ती लोहोगाव ता नेवासा यांना अटक करुन त्यांचेकडुन खडी भरण्यासाठी वापरलेला जे.सी.मा.
मशिन नबर एम.एच.१६, AM६८९९, व दोन ढपर नंबर.एम.एच.१७.ए.जी.०२११ य एम.एच. ०४.सी.य.७१४३ य थोरीस
गेलेली खडी जप्त करण्यात आली आहे.असम एकुण १९ लाख ६० हजार किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.'
सदर कारवाई हा मा.पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह सो अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती
दिपाली काळे महम श्रीरामपुर, मा पोलीस उपअधिक्षक मंदार जावळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग
शेवगाव याच मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोहेकॉ दत्तात्रय मोहन
गावंडे , पोहका संजय बाबुराव चव्हाण, पोना शिवाजी नामदेय माने, पो कॉ विठठल पोपट थोरात, पोको बाबा अशोक
वाघमोडे, पोकॉ गणेश कुंडलीक आडागळे यांनी केली आहे..


( शिर्डी,राजेंद्र गडकरी )-राहात्यामध्ये आढळलेल्या एकमेव रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले असून त्यामुळे राहाता तालुका कोरोनामुक्त झाला असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली. कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. तालुका कोरोना रुग्णमुक्त झाला असला तरी  तालुक्यातील लॉकडाऊन स्थिती पुर्वीप्रमाणेच 3 मे, 2020 पर्यंत कायम राहणार असून जनतेने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सहकार्य केले तसेच पुढील कालावधीतही सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
            कोरोनबाधीत रुग्णावर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु होते. चौदा दिवसाच्या कालावधीनंतर या रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या व्यक्तिच्या संपर्कात आल्यामुळे राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपूर, लेाणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, पाथरे, हणमंतपूर व हसनापूर या परिसरातील 55 व्यक्तींना निघोज ता.राहाता येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम फेज-2 धर्मशाळा, हेलीपॅड रोड येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण होऊन कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून न आल्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.
            राहाता तालुका कोरोनामुक्त झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करावे. नागरीकांनी खबरदारी घेतानाच जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

(शिर्डी जितेश लोकचंदानी )
राहता तालुक्यातील सावळीविहीर येथील हॉटेल बाबाज परमिट रूम चे शटर फोडून या हॉटेल मधील दारू चोरनारे सहा आरोपी व त्यात आणखी एक महिला  असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती, व त्यानंतर या आरोपींना उशिरा जामीनही मंजूर झाला आहे,
     शिर्डी जवळील सावळीविहीर येथील नगर मनमाड महामार्ग लगत असणारे हॉटेल बाबाज परमिट रूम हे लॉक डाऊन मुळे बंद होते ,याचाच फायदा घेत काही चोरट्यांनी ह्या हॉटेलचे शटर तोडून या हॉटेल मधील सुमारे एक लाख सात हजार 840 रुपयाची देशी-विदेशी दारू, बियर चोरून नेली होती, अशा काही आरोपींना पोलिसांनी तातडीने हालचाली करून पकडले, त्यामध्ये महेश नारायण कापसे, विशाल अशोक आगलावे आशिष बबन शेलार, भोलेनाथ विजय चंदनकर, तसेच  चोरीची दारू घेणारे व दाम दुप्पट किमतीला विकणारे मनोज विश्वनाथ वाघ व विजय भानुदास चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली होती, या सहा जणांना आज पर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती, आज दि,२१ला त्यांना न्यायालयात नेले असता याआरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे,  शिवाय या दारू चोरीप्रकरणी या 6 आरोपीबरोबरच। सोनी विनोद जाधव या महिला आरोपी सावळीविहीर चीच आहे या चोरी प्रकरणाचा तपास ए
.पी.आय रूपवते करीत आहे ,यात आतापर्यंत सात आरोपी झाले अजूनही काही ही चोरीची दारू घेणारे बाहेर फिरत असल्याची चर्चा शिर्डी व परिसरात होत आहे, या बड्या व राजकीय संबंध असणाऱ्या लोकांना मोकळीक दिली जात आहे की काय अशी चर्चा आहे , त्यांची कसून चौकशी व्हावी व यात चोरी प्रकरणात आणखी कोण कोण आहे । तसेच  हॉटेल बाबाच परमिट रूम दारू चोरी प्रकरणात  एक लाख सात हजार आठशे चाळीस रुपयाची दारू चोरीस गेली होती  मात्र  पोलिसांनी या आरोपींकडून  दहा ते पंधरा हजार रुपयाची दारू विविध ठिकाणाहून जप्त केली  ,मात्र  बाकीची दारू कुठे गेली  ,असा प्रश्न  या परिसरातील नागरिक विचारत आहे  ,तेव्हा  उर्वरित  चोरी गेलेला दारूचाही तपास करावा व त्यांच्यावरील कारवाई व्हावी ,अशी मागणी परिसरातून होत आहे.

(शिर्डी राजेंद्र गडकरी /जितेश लोकचंदानी)
  सध्या देशात  व  असून  या कारोणामुळे  डॉक्टर ,नर्स ,पोलीस  यांच्या बरोबरच आता पत्रकारांनाही  या कोरोणाचा विळखा  बसू लागला आहे , डॉक्टर ,पोलीस  ,शासकीय कर्मचारी  यांच्याप्रमाणेच पत्रकारही  या कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी, अपडेट  वार्तांकन करण्यासाठी  अहोरात्र धडपडत आहेत,  अशा परिस्थितीत  पत्रकारही आता  या कोरोनाच्या संसर्गाला बळी पडू लागले आहेत, मुंबईतील ५६ पत्रकारांना करोनाची लागण झाल्याने  राज्यात देशात मोठी खळबळ उडाली आहे ,
 मुंबईत कोरोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार होत असून येथील प्रत्येक घडामोडीचे अपडेट्स मुंबईकरांपर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत असणाऱ्या विविध माध्यमांमधील पत्रकार आणि कॅमेरामन्सनाही कोरोना साथीने गाठले आहे. माध्यम प्रतिनिधींसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या व्यापक तपासणी मोहिमेनंतर आता अहवाल प्राप्त झाले असून त्यात मुंबईतील पत्रकार व कॅमेरामन्स मिळून ५३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विविध पत्रकार संघटनांच्या विनंतीवरून मुंबई महापालिकेच्या वतीने माध्यम प्रतिनिधींसाठी करोना चाचणी मोहीम घेण्यात आली होती. पालिकेच्या आरोग्य पथकाने एकूण १६८ जणांचे स्वॅब नमुने घेतले होते. यापैकी बहुतांश नमुन्यांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात ५३ जणांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आढळले आहेत तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता ही संख्या 56 झाली आहे, करोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर व पत्रकारांचा समावेश आहे. यात ज्यांच्यात तीव्र लक्षणे आहेत ,त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर सौम्य लक्षणे असलेल्या बाकी सर्वांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाइनच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील ५६पत्रकारांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चिंता वाढली आहे. या सर्वांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचवेळी या पत्रकारांच्या कुटुंबीयांची तपासणी केली जाणार आहे तसेच हे पत्रकार ज्या इमारतींत राहतात त्या इमारतींमध्ये निर्जंतुकीकरण करून इमारती सील करण्याची कारवाई पालिकेच्या पथकांकडून सुरू करण्यात आली आहे. प्रतीक्षानगरमध्ये पत्रकारांचे वास्तव्य असलेली एक इमारत कंटेनमेंट एरिया म्हणून जाहीर करत आज दुपारनंतर सील करण्यात आली आहे. या इमारतीतील सर्व कुटुंबांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले आहे. काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पत्रकारांना कोरोना झाल्याची बातमी चिंता वाढवणारी आहे. पत्रकार अत्यावश्यक सेवेत येतात. ते स्वत:चा जीव धोक्यात घालून वार्तांकन करत असतात. त्यामुळे सर्व पत्रकार बंधूंना ५० लाखाचा विमा सरकारने द्यावा, अशी मागणी  पत्रकार संघटनेकडून करण्यात येत आहे, याबाबत त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचेही गरज आहे.
सध्या कोरोना मुळे सर्व जग ,देश राज्य हैराण झाले आहे, अशा परिस्थितीत पत्रकार ,डॉक्टर पोलीस शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जीव धोक्यात घालून काम करत आहे ,मात्र पत्रकारिता करताना पत्रकारांनी आता दक्षता घेत वार्तांकन करणे गरजेचे आहे, आपले जीवन व आपले कुटुंब याकडे लक्ष देणे गरजेचे आहे ,त्यामुळे यापुढे तरी राज्यातील प्रत्येक पत्रकारांनी काम करताना दक्षता ठेवून काम करावे, असे आवाहनही सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येऊ लागले आहे.

शिर्डी  (राजेंद्र गडकरी/जितेश लोकचंदानी)
सध्या देशात व राज्यात कोरोनामुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली असून सध्या सर्वत्र लॉकं डाऊन सुरू आहे ,त्यामुळे सर्वत्र बंद आहे, अशा परिस्थितीत.  सर्वसामान्य गोरगरीब व मजूर असंघटित कामगार यांची आर्थिक चणचण सुरू झाली असून अशा गरजू व्यक्तींना व कुटुंबातील सदस्यांना राज्यातील विविध देवस्थाने व ट्रस्ट यांच्या प्रसादालयातून भोजनाची पाकिटे किंवा नाश्ता पाकिटे त्या त्या परिसरात कॅम्पमध्ये ,शिबिरांमध्ये देण्यात यावीत, त्यामुळे प्रशासनाचा भारही हलका होईल ,अशी मागणी सध्या सुज्ञ नागरिकांकडून होत आहे, तसेच राज्यातील विविध सामाजिक संस्था संघटना यांनीही पुढे येऊन त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज असल्याचे ही चर्चा सध्या होऊ लागली आहे,
सध्या कोरोना मुळे देशात, राज्यात हाहाकार उडाला आहे, राज्यात तर कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, देशभरात तीन मेपर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे, राज्यातही लॉक डाऊन मुळे सर्व बंद आहे ,सर्वत्र कामधंदा ,दुकाने बंद आहे, सर्व काही बंद असल्यामुळे व कर्फ्यू लागू असल्यामुळे सर्व जण घरात आहेत, मात्र अशा परिस्थितीत घरात किती दिवस बसणार। असा सर्वसामान्य पुढे प्रश्न निर्माण झाला आहे ,कामधंदा नाही, आर्थिक चणचण भासत आहे, त्याचप्रमाणे परराज्यातून किंवा राज्यातील इतर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात मोलमजुरीसाठी पोटापाण्यासाठी अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत, मात्र सध्याची परिस्थिती पाहता अनेक मजूर ,असंघटित कामगार हे वाहने बंद असल्यामुळे रात्रीचे आपल्या मुला-बाळांना व सामान घेऊन जाताना दिसत आहे ,किंवा काहीजण आपल्या छोट्याशा झोपडीत कसेबसे जीवन जगत आहे, प्रशासन अशा सर्व लोकांसाठी आपल्या परीने  मदत करण्याचा प्रयत्न करत आहे ,परंतु तरीही ती अपुर्णच पडत आहे ,गावागावात, शहराशहरात असे अनेक कुटुंबे आहेत की त्यांना सध्या रोजीरोटीचा प्रश्न पडला आहे, त्यामुळे राज्यात मोठे श्रीमंत देवस्थाने आहेत, शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान ,पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट, तुळजापूरचे श्री तुळजाभवानी माता संस्थान, कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी देवस्थान,  शेगावचे गजानन महाराज संस्थान अक्कलकोट, शनिशिंगणापूर सिद्धिविनायक ,असे अनेक मोठे व श्रीमंत देवस्थाने राज्यात आहेत, व ह्या देवस्थानाकडे प्रसादालय ,कर्मचारी, किराणा मालाचा पुरवठा, स्वच्छता, दवाखाना ,डॉक्टर, सर्व यंत्रणा तत्पर आहे, सध्या ही सर्व देवस्थाने बंद आहेत, कर्मचारीही मोजकेच कामावर आहेत, बाकीचे घरीच आहेत ,अशां देवस्थाना मार्फत गरजू व्यक्तींना भोजनाची पाकिटे ,अन्नाची,नाष्टाची पाकिटे आपल्या प्रसादालयात नित्य प्रमाणे बनवून ती प्रशासनाच्या सहकार्याने आपापल्या परिसरात  प्रशासनामार्फत ती गोरगरीब व हातावर पोट भरणारे झोपडपट्टी , वसाहतीमध्ये वाटपकेली तर प्रशासनावरचा ताण हलका होईल तसेच कोणाचा मुकाबला करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स नर्स आरोग्य कर्मचारी सेविका पोलीस सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी विविध क्षेत्रातील व्यक्ती घ्या या संकट समयी काम करत आहे परंतु सर्व काही बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी चहा नाष्टा भोजन मिळणेही दुरापास्त आहे तेव्हा देवस्थाने सामाजिक संस्था यांनी स्वच्छता चे नियम पाळत अशा गोष्टींची वस्तूंची खाद्यपदार्थांची योग्यरीतीने प्रशासनामार्फत राज्यातील विविध भागात विविध ठिकाणी अडचणीच्या दुर्गम भागात मदत करणे गरजेचे आहे त्यामुळे प्रशासनाला व शासकीय अधिकाऱ्यांनाही मोठा हातभार लागेल, कारण सध्या कोरोना मुळे देशात राज्यात सर्वत्र मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे ,अशा परिस्थितीत राज्य सरकार केंद्र सरकार जरी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करीत असले तरी ती अपूर्णच पडत आहे ,त्यामुळे देशहित व माणुसकीचे नाते जपत प्रत्येक देवस्थानने तसेच सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे, राज्यातील  काही देवस्थानांनी  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहेच, देवस्थानानीं आर्थिक मदत केली आहे ,परंतु आता या संकट समयी सर्वकाही यंत्रणा बंद असल्यामुळे  मनुष्यबळ  सुद्धा गरजेचे आहे स्वयंपाक बनवणे ,वाटप करणे व तेही लॉक डाऊन चे नियम पाळत हे सर्व करणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी देवस्थानचे कर्मचारी यांचा उपयोग होऊ शकतो, सर्वसामान्य गोर-गरीब व मजूर कामगार ,असंघटित कामगार, अशा हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबासाठी पुढे येऊन प्रशासनाला मदत करत प्रशासनाच्या सहकार्याने अशा गोरगरीब ,गरजूना भोजनाची पाकिटे किंवा अन्नाची पाकिटे पोहोचून दिली तर ती मदत खूप महत्त्वाची ठरणार आहे तर याचा राज्यातील देवस्थानानी विचार करावा व राज्य प्रशासनाने सुद्धा देवस्थानला तशा सूचना कराव्यात अशी मागणी आता सुज्ञ नागरिकांकडून होऊ लागली आहे,

( शिर्डी,जय शर्मा ):-कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर गरजू लाभार्थींना अन्नधान्य मिळण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांनासुध्दा मे व जून,2020 साठी गहू व तांदुळ वितरीत करण्यात येणार आहे.  प्रतिमाह प्रतिव्यक्ती  8 रुपये किलो दराने 3 किलेा गहू आणि प्रतिमाह प्रतिव्यक्ती 12 रुपये किलो दराने 2 किलो तादूळ वितरीत करण्यात येणार आहे    केशरी शिधापत्रिकाधारक शिधापत्रिका घेऊन आल्यावर स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकेवरील व्यक्ती संख्या तपासून, देय असलेल्या धान्याच्या परिमाणाची शिधापत्रिकेच्या मागील पानावर शिक्का मारुन नोंद घ्यावी. शिधापत्रिकाधारकाला धान्य वितरण केल्यानंतर विहित नमुन्यातील नोंदवहीमध्ये नोंदी अद्ययावत करण्यात याव्यात. धान्य वाटप पूर्ण झाल्यानंतर दैनंदिन प्राप्त धान्य, धान्याची विक्री, शिल्लक साठा याबाबतचा गोषवारा नोंदवहीत घेणे आवश्यक आहे. गांवपातळीवरील क्षेत्रीय अधिकारी तसेच पालक अधिकारी यांनी दररोज याबाबत‍ प्रत्यक्ष पाहणी करुन धान्य साठा प्रत्यक्ष मोजून नोंदवहीत स्वाक्षरी करावी. कोणताही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारींचे तेथेच निराकरण होईल याची दक्षता क्षेत्रीय अधिकारी व पालक अधिकारी यांनी घ्यावी. धान्य वाटपाबाबत गांवामध्ये, स्थानिक पातळीवर जनजागृती करण्यात यावी. केशरी शिधायपत्रिकाधारकांना देय असलेल्या धान्याचा पुरवठा लवकरच करण्यात येणार असून, धान्य प्राप्त झाल्यानंतर त्याचे वाटप करण्यात यावे. सदरील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. यामध्ये हयगय अथवा टाळाटाळा केल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम,1955, नैसर्गिक आपत्ती अधिनियम,2005 अन्वये संबधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget