कोरोना संकटात शासकीय अधिकारी-कर्मचारी देश चालवण्यासाठी सक्षम असतील तर निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींची गरज काय?- सुधीर भद्रे
शिर्डी- जितेश लोकचंदानी-सध्या कोरोना मुळे जगात हाहाकार उडाला आहे , देशातही कोरोनाने मोठी संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे , त्यामुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे , अशा परिस्थितीत देशातील सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र व सक्षमपणे काम करत आहे, असे असताना राजकीय नेते व लोकप्रतिनिधी यांचे मग कामच काय । असा सवाल भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केला आहे,
एका पत्रकान्वये त्यांनी पुढे म्हटले आहे की , देशात सध्या कोरोना मुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत देशातील, राज्यातील सर्व शासकीय अधिकारी ,कर्मचारी ,शिपाई सर्व जो तो आपापल्या परीने या संकट समयी अहोरात्र कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी झटत आहे ,स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहे व हा देश चालवत आहे ,जर सरकारी अधिकारी ,कर्मचारी सक्षम पणे हा देश चालवत असतील तर मग निवडून गेलेले लोकप्रतिनिधी यांचे काम तरी काय आहे।। हे लोकप्रतिनिधी व राजकीय नेते सध्या आपल्या घरात शांतपणे बसून आहे, संकटसमयी त्यांना ना आपल्या मतदार संघाची ,ना आपल्या राज्याची, ना देशाच्या नागरिकांची चिंता आहे, फक्त निवडणुका पुरतेच घरोघरी फिरणारे वेगवेगळ्या वस्तू ,,पैसे वाटून गोरगरिबांची सेवा करतो असे दाखवणारे मात्र आता सध्या कोठे आहेत । असा मोठा सवाल निर्माण होत आहे, आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकीमध्ये तालुका अथवा जिल्हा विकास आघाडी स्थापन करून पक्ष बदलून अनेक प्रतिनिधी निवडणूक लढवतात .निवडणुकीच्या काळात प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचतात. विशेष म्हणजे बाहेरगावी असलेल्या मतदारांना सुद्धा मतदानासाठी अनेक युक्त्या वापरून घेऊन येतात .स्वतः निवडून येण्यासाठी वस्तू आणि पैसे वाटप करण्याचे गैरप्रकार निवडणूक काळात उघडकीस आलेले आहेत. निवडणुकीच्या काळात कायदा धाब्यावर बसवून अनेक उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे .ज्या पक्षाने वाढवले ,मोठे केले, अनेक पदे दिली त्या पक्षाला निवडणुकीमध्ये सोडचिठ्ठी दिल्याची अनेक उदाहरणे आहेत .चुकीचे वर्तन केले तरी या सर्व बाबी आम्ही जनहितासाठी करीत असल्याचा संबंधितांनी मुलामा दिला व निवडणुका लढवल्या . मग आज जागतिक संकट असलेल्या कोरोनाच्या काळात काहीच जनहित करता येणार नाही का ?असा खडा सवाल श्री सुधीर भद्रे यांनी केला आहे .
हाताच्या बोटावर मोजण्याइतके जे लोकप्रतिनिधी छान काम करत आहेत त्यांचे भारतीय जनसंसदने कौतुक करून आभार मानले आहेत. लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांना अन्न नाही ,पाण्याची अडचण जाणवते आहे ,मजुरांना किमान वेतन नाही , शेतकरी ,मजूर ,काच -कागद -पत्रा गोळा करणारे इत्यादी अनेक समाजघटक जन्मापासून कधीही न अनुभवलेला लॉक डाऊन अनुभवत आहेत. आधीच जीवनाचा संघर्ष त्यांना कठीण जात होता ,त्यात कोरोनामुळे आभाळ फाटल्यासारखे वाटत आहे . अनंत अडचणी त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या आहेत .अशा वेळी निवडून आलेल्या आमदार, खासदार व द्वितीय क्रमांकाची मते मिळविणाऱ्यांनी फक्त स्वतःच्या कुटुंबाची काळजी न घेता सध्या निवडणुकीचा माहोल असल्याप्रमाणे प्रत्येक मतदार व त्याच्या कुटुंबाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवाव्यात .यासाठी घराबाहेर येण्याची अजिबात आवश्यकता नाही ,कारण लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ता रुपी घट्ट जाळे शहरी आणि ग्रामीण भागात आहे .लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक काळासारखे सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आर्थिक , धान्य , सॅनिटायझर , पीपीई किट , अशा एक ना अनेक स्वरूपात मदत करावी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लोकप्रतिनिधींची सुद्धा देशाला गरज असल्याचे सिद्ध करून द्यावे ।असे आवाहन सर्वश्री अशोक सब्बन, अॅड.कारभारी गवळी, कैलास पठारे, अशोक ढगे, विर बहादुर प्रजापती, बबलू खोसला सुनील टाक , भगवान जगताप व जिल्हाध्यक्ष श्री सुधीर यांनी केले आहे.