, शिर्डी व परिसरातील सुमारे 40 ते 42 संशयितांचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, मात्र एकही त्यामध्ये पॉझिटिव्ह नाही.

वैद्यकीय अधिकारी गोकुल घोघरे याण्च्या माहीती वरुण शिर्डीत एकही रुग्ण नाही शिर्डी राजेंद्र गडकरी/जय शर्मा  जगात, देशात , देश-विदेशातील साईभक्तांनी गजबजलेली शिर्डी मात्र या कोरेणापासून मुक्त आहे, व श्री साईबाबांच्या कृपेनेच शिर्डीत हे घडत आहे व पुढेही कोरोना पासून शिर्डीला श्री साईबाबा वाचवतील। अशी श्रद्धा साईभक्तांमधून सध्या व्यक्त होत आहे ,
 श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून या शिर्डी शहरात
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त देश-विदेशातून येत असतात ,सध्या लॉकडाऊन मुळे श्री साई मंदिर दर्शनासाठी बंद आहे, मात्र त्या अगोदर येथे भक्तांची दररोज मोठी गर्दी होत होती, अशा नेहमी देश-विदेशातील साईभक्तांनी गजबजलेल्या शिर्डीत मात्र गेल्या महिनाभरापासून सर्व काही शांत आहे ,येथे कोरोनाचा एकही रुग्ण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने अजून आढळलेला नाही, शिर्डी व परिसरातील सुमारे 40 ते 42 संशयितांचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, मात्र एकही त्यामध्ये पॉझिटिव्ह आला नाही, ही सर्व किमया श्रीसाईबाबांचीच असल्याचे येथे चर्चा आहे ,,।शिर्डीत श्री साईबाबा हयात असताना  मानमोडी  महामारी ची साथ सर्वत्र मोठ्या प्रमाणात आली होती, देशात सर्वत्र
हाहाकार उडाला होता ,मात्र त्यावेळी सुद्धा शिर्डीत ही महामारी आली नव्हती, कारण त्यावेळी शिर्डीत ह्या मानमोडीची साथ येऊ नये म्हणून श्री साईबाबांनी शिर्डीच्या वेशीवर स्वता दळून पीठ  टाकले होते, त्यानंतर शिर्डीत  महामारी कधीच आली नाही, आत्तासुद्धा लॉकडाऊन सुरू होण्याअगोदर शिर्डीतील महिला साईभक्तांनी संपूर्ण शिर्डी शहराच्या वेशीवर पीठ टाकून रांगोळ्या काढत कोरोना हमारी शिर्डीत येऊ नये म्हणून श्री साईनाथ साकडे घातले होते, त्यानंतर शिर्डीकरांनी,व।साईभक्तांनी श्री साईबाबांवर श्रद्धा ठेवत स्वतःहून शिर्डी परिक्रमा काढली होती व त्यात श्री साईबाबांना कोरोनाची साथ शिर्डीत येऊ नये, म्हणून साकडे घातले होते ,त्यामुळे की काय
,श्री साईबाबांच्या शिर्डीत अद्याप एकही रुग्ण कोरोणाचा आढळून आला नाही ,ही साईबाबांची ही कृपाचआहे, असे शिर्डीकर व साईभक्त सध्या बोलत आहेत,
श्री साईबाबा हयात असताना श्री साईबाबांनी विविध प्रकारच्या रुग्णांवर प्रथम जडीबुटी नंतर उदी देऊन त्यांचा आजार बरा केला, हे सत्य असताना सध्याच्या या कोरोना मुळे झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीत देशातील सर्व शहरे ,गावे मोठ्या चिंतेत असताना शिर्डीत मात्र दररोज देश-विदेशातील हजारो साईभक्त येत जात असताना येथे मात्र एकही कोरोना चा रुग्ण अद्याप आढळला नाही, हे एक विशेष असून श्रीसाईबाबांची ही कृपा असल्याचे येथे सध्या बोलले जात आहे,
 सध्याचे विज्ञान युग आहे ,मात्र या विज्ञान युगात एक शक्ती मोठी आहे ,तीच सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून श्रीसाईबाबा असल्याचे आता सध्या शिर्डीत दिसून येत आहे,कोरोना विषाणू पुढे अमेरिका, इटली ,स्पेन, ब्रिटन अशाअनेक देशांनी हात टेकले आहे, मात्र या सर्व गोष्टी  दैवी शक्तीवर अवलंबून आहे व हे प्रत्येकाला सध्या मान्य करावे लागेल, असे आता शिर्डीतून आपापसात चर्चा ऐकू येत आहे, कोणी हिला श्रद्धा किंवा अंधश्रद्धाही म्हणतील। पण शिर्डीकर व साईभक्तांच्या दृष्टीने ही साईवरील श्रद्धा आहे व शिर्डीत कोरोनाचा रुग्ण आढळला नाही ही साईचीच पुण्याई समजली जात आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget