माहामानव बाबासाहेब अंबेडकर जयंती साद्या पद्दतिने साजरी तरुनांनि केले रक्तदान.

शिर्डी। राजेंद्र गडकरी । शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान चे रक्तपेढी सुरू असून येथे साईभक्त व शिर्डीकर नेहमीच रक्तदान करीत असतात, आज भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  निमित्त येथील रहिवाशी रक्तदान करण्यास श्री साईनाथ रक्तपेढीमध्ये गेले असता रक्तपेढीत रक्त साठा अधिक असल्याने रक्त घेता येणार नसल्याचे सांगून दहा पैकी फक्त दोन जणांचे रक्तदान घेण्यात आले, त्यामुळे इतर रक्तदात्यां मध्ये मोठी नाराजी निर्माण झाली, इच्छा असूनही डॉ,बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान करता आले नसल्याचे शल्य या तरुणांमध्ये होते,
सध्या देशात लॉकडाऊनची परिस्थिती आहे सर्वत्र बंद आहे,त्यात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, सर्वत्र ती साध्या पद्धतीने साजरी होत आहे, त्यामुळे शिर्डीतील व परिसरातील काही तरुणांनी व व्यक्तींनी जयंती निमित्त रक्तदान करण्याचे ठरवून येथील श्री साईबाबा संस्थान रक्तपेढीत सर्वजण गेले, तेथे त्यांनी विनंती केली ,मात्र येथील श्री साईबाबा संस्थानच्या रक्तपेढी ने त्यांना आमच्याकडे रक्तसाठा सध्या अधिक आहे ,त्यामुळे आपले रक्तदान घेता येणार नाही, त्यामुळे रक्तदान करण्यासाठी गेलेल्या दहा पैकी फक्त अविनाश शेजवळ, विशाल कोळगे या दोघांचे रक्तदान घेण्यात आले, मात्र उर्वरित व्यक्तींचे रक्तदान घेण्यात आले नाही, त्यामुळे ह्या रक्तदान केलेल्या व मनात इच्छा असतानाही रक्तदान करता न आल्याने या तरुणांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती, आज डॉ,बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना म्हणून, अभिवादन म्हणून आम्ही रक्तदान करणार होतो ,मात्र ते करता न आल्याने आम्ही तीव्र नाराज झालो आहोत, रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना यापुढे असे प्रकार घडू नये ,रक्तदान घेऊन दुसर्‍या रक्त पिढीला पाठवावे रक्तदात्यांना नाराज करू नये,,अशी मागणी या तरुणांकडून सध्या होत आहे, तसेच त्या रक्तपेढीत यावेळी  सिमोन जगताप यांनी आम्ही डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करण्यासाठी येथे आलो होतो, मात्र आम्हाला रक्तदान करता आले नाही, तरी नंतर आम्ही रक्तदान करू, प्रत्येकाने मात्र लॉकडाऊन चे नियम पाळावे कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी मास्क वापरणे, शक्यतो घराबाहेर पडू नये, दक्षता घ्यावी ,असे आवाहनही सिमोन  जगताप व  एडवोकेट अविनाश शेजवळ यांनी यावेळी केले, यावेळी रक्तपेढीतही सोशल डिस्टंन्स व नियम पाळले गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून यावेळी या तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत त्यांना अभिवादन केले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget