बेलापूर ( प्रतिनिधी )- कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अशोक सहकारी साखर कारखान्याने ईतर कारखान्या प्रमाणे आर्थिक मदत करावी तसेच सँनिटायझर किटचे वाटप करावे अशी मागणी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले व ईतर शेतकऱ्यांनी केली आहे. या बाबत प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात नवले यांनी म्हटले आहे की कोरोना मुळे परिसरातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले शेतात तयार झालेला भाजीपाला तसेच द्राक्ष डाळींब कांदा गहु मका आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तयार झालेला भाजीपाला द्राक्ष टरबुज खरबुज मातीमोल भावाने विकावे लागले अशोक कारखान्याने नेहमीच परिसरातील शेतकऱ्यांना मदत केली आहे या संकट काळात अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वतीने हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात यावा शेतकऱ्यांना ईतर कारखान्या प्रमाणे आपल्याही कारखान्याने मदत करावी अशी मागणी बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांनी केली आहे या निवेदनावर सुधीर नवले यांच्यासह शिवाजी पा वाबळे प्रकाश नवले ,भाऊसाहेब वाबळे ,मधुकर अनाप ,शाम चव्हाण ,कारभारी कुताळ ,नामदेव बोंबले ,गोरक्षनाथ कुर्हे ,सविता मेहेत्रे आदिच्या सह्या आहेत.
Post a Comment