Latest Post

श्रीरामपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोरगरीब, गरजू, हातावर पोट असणारे उपाशीपोटी राहू नये यासाठी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कृषक समाज व आदिक कुटुंबियांच्या वतीने ३२ क्विंटल गहू, तांदूळ व १६ क्विंटल हरभरा दाळीचे वाटप करण्यात येणार आहे. हे साहित्य शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना सुपूर्द करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे मजूर, गोरगरीबांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. हा लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढणार असल्याने असंख्य नागरिकांसमोर आता पोटापाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे.
वडिल स्व. ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक याच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र कृषक समाज व अविनाश आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा छोटासा प्रयत्न असल्याचे सांगून नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणीही उपाशी पोटी राहू नये यासाठी शहरातील गरजुंना नगरसेवकांच्या माध्यमातून धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. यात प्रत्येकी ३२ क्विंटल गहू व तांदूळ व १६ क्विंटल हरभरा डाळीचा समावेश आहे. शहरातील ३२ प्रभागातील नगरसेवक राजकारणविरहीत कोणताही भेदभाव न पाळता आपल्यापरीने गरीब, गरजू कुटुंबांना मदत करत आहेत. या मध्यमातून त्यांना हातभार लागावा म्हणून प्रत्येक नगरसेवकाला १०० किलो गहू, तांदूळ व ५० किलो हरभरा दाळ देण्यात येत आहे. या धान्यात नगरसेवक त्यांच्याकडील अन्नधान्याची भर घालून ते आपल्या प्रभागातील गरजुंना वितरीत करणार आहेत.

तसेच शहरातील ४६० दिव्यांगांना मास्क, सॅनिटायझर, टॉवेल व साबण असा किट वाटण्यात येणार आहे. दशमेशनगरला गुरूद्वार व सरस्वती कॉलनी येथील साईमंदिरात अन्नछत्र चालू असून त्यांनाही प्रत्येकी १०० किलो तांदूळ देण्यात येणार असल्याचे आदिक यांनी सांगितले. यावेळी डॉ. रवींद्र जगधने, नगरसेवक राजेंद्र पवार, रवी पाटील, रोहित शिंदे, दीपक चरण चव्हाण, अल्तमश पटेल, डॉ. ऋतुजा जगधने आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )- पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या तांदुळाचे वाटप श्रीरामपूर तालुक्यात सुरु झाले असुन प्रति व्यक्ती पाच किलो देण्यात येणारा तांदूळ विनामूल्य आहे त्याचा लाभ कार्डधाराकांनी घ्यावा असे अवाहन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  यांनी केले आहे    श्रीरामपूर  शहरातील  सरस्वती महीला बचत गट व भाग्यलक्ष्मी महीला बचत गटाच्या वतीने  केंद्र शासनाकडून   आलेल्या तांदुळाचे वाटप जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते या वेळी पत्रकार बद्रिनारायण वढणे उपस्थित  होते  जिल्हाध्यक्ष देविदास देसाई पुढे म्हणाले की केंद्र शासनाच्या वतीने देण्यात आलेला तांदुळ तालुक्यात पोहोच झाला असुन त्याचे वाटप तालुक्यात सुरु झालेले आहे केशरी कार्डधारकासाठी शासनाने धान्य देण्याची घोषणा केली असली तरी ते गहु व तांदूळ मे महीन्यात मिळणार आहे केशरी कार्डावर मिळणारा गहु आठ रुपये व तांदूळ बारा रुपये किलोने दिला जाणार आहे सध्या केशरी कार्डधारकांचा माल दुकानदारांना मिळाला नसला तरी ते कार्डधारक दुकानदारांशी माल मिळण्या करीता वाद घालत आहे  तो माल दुकानात उपलब्ध होताच त्याचेही वाटप केले जाईल कोरोनाच्या संकट काळात दुकानदार जिव मुठीत धरुन आपले काम करत आहे शासन स्तरावर दुकानदारांना कसल्याच सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाही तरीही दुकानदार आपले काम करत आहे अनेक दुकानदारांनी मास्कचे वाटप करुन वाटप करताना सोशल डिस्टनचा नियम पाळलेला आहे मानसिक दडपणा खाली असणार्या दुकानदारांना  कार्डधारकांनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमारामुळे फार त्रास होत आहे  दुकानदारांचा उत्साह  वाढविणे आपल्या हातात आहे  माणूस म्हणून आपणही दुकानदारांच्या पाठीशी उभे रहावे असे अवाहनही देसाई यांनी केले आहे श्रीरामपूर तालुक्यात असणारे मांडवे येथेही मोफत तांदूळाचे वाटप प्रवरा साखर कारखान्याचे संचालक संपतराव चितळकर बाजार समितीचे संचालक मुक्ताजी पटांगरे आण्णासाहेब गेठे यांच्या हस्ते करण्यात आले

सावळीविहीर। राजेंद्र गडकरी।
 सध्या कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे, त्यामुळे सर्वजण आपल्या घराघरात आहे, अशा परिस्थितीत ग्रामीण भागातआता वाड्या, वस्त्यांवर या लॉकडाऊनच्या बंद काळात महिला वर्गाकडून दरवर्षाप्रमाणे घरातल्याघरात पापड लाटणे, शेवाया करणे, कुरडया करणे, फराळासाठी बटाट्याचे वेफर्स , आदी पदार्थ बनवण्याची कामे घरातील कुटुंबातील सदस्यांना बरोबर घेऊन केले जात असल्याचे दिसून येत आहे,   
 तोंडाला मास्क किंवा रूमाल, बांधून व काही अंतराचे बंधन पाळून ही कामे होत असून या लॉकडाऊनकाळात घरातील महिलांना इतर काम नाही म्हणून  घरातील कामे उरकून इतर वेळी  घरातील  सदस्यांना ,मुलांना  बरोबर घेत हे पदार्थ बनवण्याचा  सपाटा लावला असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे,
 सध्या जगभर कोराेनाने हाहाकार माजवला आहे, देशात व राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, सर्वत्र आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे देशभर लॉक डाऊन करण्यात आला आहे, सर्व बंद आहे ,अशा परिस्थितीत सर्वजण आपल्या घरात आहेत, मात्र या लॉकडाऊन काळात ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर असणाऱ्या, गावापासून काही अंतरावर निवांत आशा वस्त्यांवर, महिला या बंद काळात या वेळचा सदुपयोग करून घेण्यासाठी आपल्या घरातल्या घरात आपल्या घरातील कुटुंबाच्या सदस्यांसह पापड लाटणे किंवा अंगणामध्ये कुरडया, शेवया, फराळाचे पदार्थ आदि दरवर्षाप्रमाणे उन्हाळ्यात करण्यात येणारे हे पदार्थ करण्याकडे जोर देत आहेत, ग्रामीण भागात खेड्यापाड्यात वाड्या-वस्त्यांवर असे कुरडया, पापड ,शेवया करण्याकडे महिलावर्ग दिसून येत आहे, घरातील पुरुष ,शाळा-कॉलेजातील मुले, नोकरदार सर्वजण या बंदमुळे घरीच आहेत, त्यामुळे त्यांची मदत हे घरगुती पदार्थ बनवण्यासाठी घरातील महिलांना होत आहे ,लॉक डाऊन च्या बंद काळात ग्रामीण महिलांनी याकडे अधिक जोर दिला आहे ,अनेक ठिकाणी महिला स्कार्फ किंवा मास्क बांधून घरात हे पदार्थ बनवताना दिसून येत आहेत, त्यामुळे या लॉक डाऊन च्या काळातला वेळही चांगला जात आहे,
 दर वर्षी या काळात कुरडया, पापड ,शेवया घरोघरी बनवले जातात, यंदाही ग्रामीण भागात पण निवांत वस्त्यांवर आपापल्या घरी, अंगणात ते बनवणे सुरू आहे, तसेच सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे मुले घरीच आहेत, वस्त्यांवर एकांत राहणारे रहिवाशी निवांत आहेत ,त्यांची मुलेही ही आपल्या अंगणात ग्रामीण खेळ खेळताना दिसतात, गावापासून दूर निवांत वस्तीवर घराच्या अंगणात ,घरातीलच मुले गोटया खेळणे, क्रिकेट खेळणे, आधी दिवसभर टाइमपास करताना दिसतात, या लहान मुलांना लॉकडाऊन किंवा कोरोना याचे काही  सोयरसुतक नाही, अनेकांना काहीही माहिती नाही, मात्र ते खेळात दंग असतात, मात्र हा खेळ आपल्या अंगणातच खेळताना ते दिसतात,
 देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला असताना, मोठे शहर ठप्प झालेले असताना, शहरापेक्षा ग्रामीण भागात मात्र बहुतांशी कुटुंबातील, घरातील जीवन मात्र सुरळीत सुरू आहे ,आता  लॉक डाऊन संपताच  मोठमोठ्या शहरातील  लोकही  ग्रामीण भागात  येण्यासाठी  इच्छुक आहेत ,असे  ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांकडून बोलले जात आहे,  यातून शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन कसे सुखकर आहे, हे मात्र या लॉकडाऊन ने  नक्की दाखवून दिले आहे,

शिर्डी ।जितेश लोकचंदानी ।    निवासी संपादक 
सध्या ग्रामीण भागात सर्वत्र शेतीचे कामे सुरू झाली आहेत, सध्या गहू सोगंणीची कामे जोरात सुरू आहेत ,परंतु या  लॉकडाऊन काळात शेतमजूर मिळेनासे  झाले आहे ,त्याचप्रमाणे परराज्यातून दरवर्षाप्रमाणे येणारे हार्वेस्टर मशीन यावर्षी आले नसल्याने, स्थानिक हार्वेस्टर वाल्यांनी अचानक याचा फायदा घेत गहू काढण्यासाठी प्रत्येक एकराचे भाव वाढवले आहेत, त्यामुळे मुळातच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना हार्वेस्टर मालकांनी भाव अचानक वाढवल्यामुळे आणखीन मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे,
   सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, या लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे, यापूर्वी शेतीचे कामे बंद होते, परंतु केंद्रीय कृषिमंत्र्यांनी नुकतीच शेतीच्या कामाला लॉकडाऊन चे नियम पाळत सवलत दिली आहे, त्यामुळे ग्रामीण भागात शेतातील उभे पीके सोंगणीच्या कामांनी सध्या जोर पकडला आहे ,सध्या गहू करण्याचे काम जोरात सुरू आहे ,मात्र सध्या  शेतमजूरही मिळेनासे झाले आहे ,त्यामुळे  शेतकरी ग्रामीण भागात गहू काढण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा वापर करताना दिसत आहेत, मात्र हार्वेस्टर मशीन मालकाकडून, चालकाकडून  भावही वाढवण्यात आला आहे, सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे , शेतातील उत्पादित धान्य, कांदा , फुले ,फळे, बहुतांशी भाजीपाला व इतर शेतीत उत्पादन होणाऱ्या वस्तू, मार्केट बंद असल्यामुळे बाजारात नेता येत नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक कमाई सध्या बंद आहे, सर्वजण कामधंदे सोडून आत्तापर्यंत घरात होते ,परंतु आता शासनाने शेतीच्या कामांना लॉकडाऊन मधून वगळण्यात आल्यामुळे, आता  शेतकरी शेतीच्या कामावर  जोर देत आहे,गहू सोंगणीला आल्यामुळे व तो  लवकर  काढणे गरजेचे असल्यामुळे मात्र नेहमीप्रमाणे  या लॉक डाऊन काळात शेतमजूर मिळत नसल्याने नाविलाजाने हार्वेस्टर मशीन द्वारे गहू काढले जात आहेत, मात्र त्यामुळे या हार्वेस्टरवाल्यांना मोठा भाव आला आहे, त्यांनी या पंधरा-वीस दिवसातच प्रति एकर पाचशे,सहाशे रुपये भाव अधिक वाढवला आहे, पूर्वी गहू काढण्यासाठी प्रती एकर पंधराशे ते सोळाशे असा भाव होता, परंतु आता हाच प्रति एकर भाव 2000 व त्यापुढे गेला आहे, शिवाय  हार्वेस्टरवाल्यांना अनेकदा सांगूनही  लवकर ते येत नाहीत , आता या हार्वेस्टर वाल्यांकडे नंबर  लावण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे,  शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वैतागले आहेत
  , सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत असताना व शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना, सवलती देत असताना ,दुसरीकडे मात्र हे खाजगी हार्वेस्टर मशीन वाले शेतकऱ्यांना लुटत आहेत, या परिस्थितीचा फायदा हार्वेस्टर
 वाल्यांकडून घेण्यात येत आहेत, मुळातच पंजाब मधून येणारे हार्वेस्टर काही वर्षापासून येथील हार्वेस्टर वाल्यांनी त्यांना या भागात येऊ दिले नाही, स्थानिक हार्वेस्टर वाले परराज्यातील हार्वेस्टर वाल्यांना आपल्या गावात थांबून देत नाही, ते आल्यानंतर स्पर्धा निर्माण होते व त्यातून प्रति एकर गहू काढण्याचे भावही कमी होतात, तरी काही पंजाब हरियाणा मधून गेल्या दहा-बारा वर्षांपासून ठराविक अशी हार्वेस्टरवाले या भागात येत होतेच, मात्र यावर्षी पंजाब, हरियाणा मधून हार्वेस्टर मशीन या लॉकडाऊन मुळे भागात आले नाहीत , ,शिवाय सध्या कोरोणाच्या परिस्थितीमुळे एकही हार्वेस्टर मशीन परराज्यातून आपल्या राज्यात , राहता तालुक्यात यावर्षी आल्याचे दिसत नाही ,याचाच फायदा घेत तालुक्यातील हार्वेस्टर मालकांनी आता गहू काढण्यासाठी प्रत्येक एकरा चे भाव अचानक पाचशे ते सहाशे रुपये वाढवले आहे ,यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना परत एकदा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे ,यावर  जिल्हाधिकारी तहसीलदार  तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी  विशेष लक्ष घालून  या  हार्वेस्टर वाल्यांनी वाढवलेल्या  भावाबद्दल  योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे ,असे मत राहता तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे,

श्रीरामपूर (प्रतिनिधी) आज शुक्रवारी दुपारी दोन ते चारवाजेच्या दिवसा ढवळ्या दरम्यान आऊटर सिग्नल वर उभी असलेल्या मालगाडीच्या एका बोगीचे दार फोडून त्यातील गव्हाची पोती लुटून नेण्याचा गंभीर प्रकार श्रीरामपुरात घडला या प्रकाराबद्दल शहरात सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे दुपारी पचशतांब्या कडून घेणारी एक मालगाडी धान्याच्या पोत्यांची भरलेली होती सदरची गाडी सूतगिरणीच्या पुढे आल्यानंतर सिग्नल नसल्यामुळे अवतरला थांबले बजरंग चौक ते गोपीनाथ नगर भुयारी पूल यादरम्यान रेल्वेच्याएका बोगीचे दार आसपासच्या लोकांनी तोडले व त्यात गव्हाच्या पोत्यांची यथेच्छ लूट केली .बजरंग चौक ते गोपीनाथ नगर या परिसरातील नवी दिल्ली , राजवाडा परिसरात अनेक घरात सदरचे गव्हाचे पोते लोकांनी नेल्याची चर्चा असून रेल्वे पलीकडील भागातूनही ही लूट केली गेल्याची चर्चा आहे . सायंकाळी उशीरा रेल्वे पोलीस व शहर पोलीसांनी या भागातून दोन संशयित ताब्यात घेऊन तपास सुरु केल्याची चर्चा दबक्या आवाजात शहरात सर्वत्र होत आहे .

बुलडाणा - 10 एप्रिल लॉकडाऊनच्या काळात शहरात सर्वत्र शुकशुकाट असतांना आज एका बंद घरातून तब्बल 27 क्विंटल गांजाचे घबाड एलसीबीच्या हाती लागले आहे. अंदाजीत 94 लाख रुपयांचा हा गांजा असल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.बुलडाणा जिल्ह्यात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा पोलिसांच्या हाती लागल्याने एकच खळबळ उडाली आहे आहे. 
        बुलडाणा शहरातील चिखली मार्गावरील बालाजी नगरालगत येळगाव शिवारात एका कुलुपबंद घरात ह्या गांज्याचा साठा मिळून आला.या प्रकरणी मनोज जुलालसिंह झाडे व गजानन सुल्तानसिंह मांझा रा.कुऱ्हा गोतमारा ता. मातोळा या 2 अरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.नशेबाजांमध्ये गांजाची क्रेझ अधिक असून बुलडाणा जिल्ह्यात व शहरात मोठ्या प्रमाणात गांजा विकला जात असल्याचे या कारवाईने स्पष्ट झाले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ गांजाच्या मोठ्या तस्करांवर लक्ष केंद्रित करुन होते. मात्र छुप्या मार्गाने विक्रेते गांजा विक्री व साठेबाजी करीत असल्याने या गांजाच्या तस्करावर बारीक लक्ष ठेवून असताना आज 10 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता एलसीबीच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एमएच 28 एझेड 0236 क्रमांकाची कार थांबविली असता त्यामध्ये गांजाच्या 3 गोण्या आढळून आल्या. आरोपीला पोलिसी खाक्या दाखविला असता आरोपी मनोज झाडे याच्या मालकीच्या कुलुपबंद घरातून तब्बल 94 लाख रुपयांचे 27 क्विंटल 3 किलो गांजा घबाड सापडला आहे. ही कारवाई दुपारी 12 वाजतापासून तर रात्री उशीरा पर्यंत एलसीबी प्रमूख महेंद्र देशमूख यांच्या मार्गदर्शनात सुरु होती.या कार्रवाइत पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख,सपोनि इंगळे पीएसआई इमरान इनामदार , सुधाकर काळे,अताउल्ला खान,सुनील खरात, संजय नागवे, विजय सोनुने, अमोल अंभोरे, नदीम शेख सह इतर कर्मचारी सहभागी होते.

शिर्डी राजकुमार गडकरी - सध्या देशात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभर लॉक डाऊन करण्यात आला असल्याने सर्वकाही ठप्प आहे,  अत्यावश्यक  सेवा सोडून सर्व बंद आहे, मात्र सध्या शेतीचे पिके सोंगण्याची कामे महत्त्वाची असल्याने शेतीच्या कामा करता या लॉक डाउन काळात नियम पाळत व दक्षता  घेत सवलत देण्यात आली आहे ,मात्र या सवलतीचा दुरुपयोग होताना दिसत असून लॉक डाऊन चे नियम व कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पाळण्यात येणारी दक्षता, शेतकरी, शेतमजूर बहुतांशी महिला शेतमजूर अनेक  ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात घेत नसताना दिसून येत आहे, आत्तापर्यंत ग्रामीण भागात  व गावा गावात, खेड्यापाड्यात कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, परंतु जरअसे नियम
पाळले गेले नाहीत तर ग्रामीण भागातही कोरोनाचे मोठे संकट निर्माण होऊ शकते ,अशी भीती काही जाणकार व्यक्त करताना दिसत आहे,
   सध्या जगात त्याचप्रमाणे भारतातही कोरोनाने हाहाकार माजवला आहे, सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढू नये, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभर लॉक डाऊन करण्यात आला आहे ,14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन आहे ,या काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे, मात्र सध्या ग्रामीण भागात शेतीची कामे ,पिके सोगंणीला आल्यामुळे महत्त्वाची आहेत, त्यामुळे हा विचार करून केंद्र सरकारने ,,केंद्रीय कृषिमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून शेतीच्या कामांना लॉकडाऊन मधून वगळण्यात येऊन काही सवलत दिली, मात्र कोरोचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क व सेल्फ डिस्टन्स  ठेवण्याची जरूरत आहे, सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे ,असे असतानाही ग्रामीण भागात अनेक शेतमजुर, महिलामजूर, मात्र शेतीकामासाठी जाताना किंवा  गहू ,मका कापणीसाठी,
कांदा काढण्यासाठी गावातून मळ्यात, किंवा ह्या वाडी वरून त्या वाडी वर ट्रॅक्टर, मालवाहतूक रिक्षा मध्ये एकत्र  जाताना, येताना एकत्रितपणे दिसत आहे, तसेच शेतात पिकांची सोगंणी करताना, एकत्रित गप्पा मारताना, शेजारी शेजारी बसून जेवण करताना, दिसून येत आहे ,त्याच प्रमाणे हार्वेस्टर व इतर शेती उपयोगी मशनरी यांचा शेतीसाठी वापर करताना शेतमजूर कोरोनाचा संसर्ग होईल म्हणून घेण्यात येणारी कोणतीही दक्षता घेताना दिसत नाही, सोशल डिस्टन्स  पाळला जात नाही  अनेकदा तोंडाला रुमाल किंवा मास्कही नसतो, ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी हा प्रकार सध्या सर्रास पाहायला मिळत आहे, त्यामुळे ग्रामीण भागात वाड्या,  वस्त्यावर लॉकडाऊन काळात नियमाची ऐशीतैशी तशी झाल्याची दिसून येत आहे, आत्तापर्यंत ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढलेला नाही, परंतु अशा पद्धतीने ग्रामीण भागात जर दक्षता न घेता, शेतीची कामे सामूहिक पद्धतीने करण्यात आली, तर मात्र कोरोनाचा धोका ग्रामीण भागात वाढवू शकतो, त्यामुळे जरी  केंद्रसरकारने शेतीच्या कामांसाठी लॉक डाऊन मधून सवलत दिली असली तरी स्वतःची सुरक्षा,  व कोरोना चा संसर्ग होऊ नये, म्हणून घ्यावयाची दक्षता पाळणे प्रत्येकाची जबाबदारी आहे व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी ही आपल्या गावात शेतकरी शेतमजूर, महिला कामगार, यांची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे, ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर  अशिक्षित, गोरगरीब  लोकांची संख्या  अधिकआहे,  त्यामुळे त्यांना रोजीरोटीसाठी काम करणे गरजेचे आहे , ह्याचाच मुळे  मजूर व विशेषतः महिला शेतमजूर  सध्या शेतीच्या कामाला  जातायेत , परंतु म्हणावी तशी दक्षता  त्यांच्याकडून घेण्यात येत नाही ,या अशिक्षित व आडाणी लोकांना  कोरेना संबंधी अधिक माहिती नाही ,
त्यामुळे प्रत्येक  गावात, वाड्या-वस्त्यांवर शेतीत काम करताना किंवा ट्रॅक्टर, इतर वाहना मधून एकत्रित शेती कामाला जाणारे मजूर, विशेषता महिला शेतमजूर,कांदा काढण्यासाठी एकत्रित शेत ,रानात दिसणारे शेतमजूर,महिला, यांनाही माहिती व जनजागृती करून लॉकडाऊन काळात व इतर वेळीही मास्क लावून व सोशल डिस्टंन्स पाळत शेतात काम करावे, शेतमजूर, महिला शेतमजूर व शेती मालकाच्या कुटुंबाने सुद्धा दक्षता घेण्याची सूचना संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी करावी, असे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक बोलतआहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget