Latest Post


श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )- वांरवार सांगूनही नागरीक रस्त्यावर फिरताना दिसत आहे आता रस्त्यावर फिरु नका हे सांगण्यासाठी पोलीसांनी रुट मार्चचे नियोजन केले असुन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हे आपल्या सर्व पोलीसा सहीत रस्त्यावर ठाण मांडून आहे विनाकारण फिरणार्यावर कडक कारवाई  करण्याचा ईशारा पोलीसांच्या वतीने देण्यात आलेला आहे     
रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हे स्वतः रस्त्यावर उभे असुन रस्त्याने जाणार्या येणार्यांची कसुन चौकशी केली जात आहे कुणालाही विनाकारण फिरु न देण्याचा चंगच पोलीसांनी बांधला आहे पोलीस अधिकारी प्रत्येकाची कसुन चौकशी करत आहे ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशांची देखील  कसुन चौकशी केली जात आहे खरोखर काम आहे की विनाकारण फिरत आहे याची शहनिशा केली जात आहे कुणालाही दुचाकी वरुन शहरात फिरु दिले जाणार नाही विनाकारण फिरणार्या वहानावर देखील  कारवाई  सुरु करण्यात आलेली आहे या माध्यमातुन नागरीकांनी घराबाहेर न पडण्याचे व आपली  व आपल्या कुटुंबाची काळजी आपणच घ्यावी असे अवाहन करण्यात आले आहे        कोरोनाचा फैलाव होवु नये या  करीता शासकीय पातळीवर विविध उपाय योजना केल्या जात असुन पोलीस बांधव आपल्या जिवाची बाजी लावुन नागरीकांना  घरात थांबण्याचे अवाहन करत असताना नागरीक मात्र बिनधास्त भटकंती करताना दिसत आहे काही ठिकाणी  विनाकारण फिरणार्यावर कारवाई देखील झालेली आहे तरी देखील  परिस्थितीचे गांभीर्य फिरणारांना वाटत नाही त्यामुळे आता पोलीसांनी कठोर पाऊल उचलले आहे अति महत्वाचे काम असेल तरच घराबारेहा पडा अन्यथा कारवाईला सामोरा जा असा ईशारा पोलीसांनी दिला आहे चौकाचौकात पोलीस कडक पहारा देत आहे असे असले तरी काही लोक हा विषय गांभिर्याने घेताना दिसत नाही सुरुवातीला पोलीसांनी विनंती करुन पाहीली रस्त्यावर दिसणारी गर्दी कमी होत नसल्याचे पाहुन आता पोलीस आधिकार्यांनीच कारवाईचा बडगा उगारला आहे यातुन तरी नागरीकांनी बोध घ्यावा व घरातच थांबावे असे अवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी केले आहे.

 बेलापूर  (प्रतिनिधी  )-लाँक डाऊन असातानाही बेलापूर झेंडा चौकात भाजीपाला घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडायची  अनेक वेळा सांगुन देखील  काहीच फरक न पडणार्या लोकांना बेलापूर पोलीसांनी चांगलाच हिसका दाखविला अन काही मिनिटातच गर्दी सामसुम झाली  कोरोना पसरु नये म्हणून सर्वत्र उपाय योजना चालु आसताना गावात मात्र दररोज सकाळी झेंडा चौक परीसरात बाजार भरत होता अनेक जण कारण नसताना तेथे गर्दी करत होते या बाबत बेलापूर पोलीसांनी अनेक वेळा
दररोज भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी                          आज पोलीसांच्या  कारवाई नंतर मोकळा झालेला चौक
सुचना केल्या विंनत्या केल्या परंतु लोक तात्पुरते दुर जात व पोलीस निघुन जाताच पुन्हा बाजार भरत असे कोरोना पसरु नये म्हणून  संयम  नियम पाळणे आवश्यक असताना सर्व नियम धाब्यावर बसवुन बिन दिक्कत खरेदी विक्री चालायची अखेर बेलापूरातील कार्यकर्ते प्रकाश जाजु यांनी या बाबत मा प्रांताधिकारी अनिल पवार यांना दुरध्वनी करुन कळविले प्रांताधिकारी पवार साहेबांनी तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना सुचना केली अन उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल मदने यांनी बेलापूर पोलीसांना गर्दी हाटविण्या बाबत सुचना केल्या त्या सुचने नुसार आज साकाळी नेहमी प्रमाणे भाजी विक्रेते व खरेदीदार यांची गर्दी  झाली अन पोलीसांनी आक्रमक पावित्रा घेतला अनेक मोटार सायकलीच्या हवा सोडून देण्यात आल्या काही गाड्याचे ईंडीकेटर फोडण्यात आले काहींना लाठीचा प्रसादही मिळाला अन काही मिनिटातच हा परिसर सामसुम झाला  पोलीसांनी अशीच भुमिका ठेवावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अवाहना नुसार बेलापूरात वीस अति गरीब कुटुंबाना किराणा व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले -             प्रत्येकाने आपापल्या ईच्छेप्रमाणे गावातील गरीब कुटुंबांना मदत करावी असे अवाहन प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार पाटील यांनी केले होते  त्याच्या अवाहनाला प्रतिसाद देत  महावितरणचे चेतन जाधव मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी व पत्रकार देविदास देसाई यांच्या सहयोगातुन २० कुटुंबांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप सरपंच राधाताई बोंबले पोलीस नाईक गणेश भिंगारदे बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांच्या हस्ते करण्यात आले  मंडलाधीकारी बाबासाहेब गोसावी यांनी गावातील पाच गरीब कुटुंबांना मोफत किराणा देण्याचा निर्णय घेतला ही बाब महावितरणचे कर्मचारी चेतन जाधव यांना समजताच त्यांनी गरीब कुटुंबाकरीता पाच हजार रुपयांचा किराणा दिला पत्रकार देविदास देसाई यांनी देखील या उपक्रमात सहभाग नोदविला मंडलाधिकारी गोसावी महावितरणचे कर्मचारी चेतन जाधव पत्रकार देविदास देसाई यांच्या सहकार्यातुन वीस  गरीब कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंचे व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले या वेळी मिलींद दुधाळ पाणी पुरवठा समीतीचे उपाध्यक्ष मनोज श्रीगोड  दिलीप दायमा मनोज क्षिरसागर ज्ञानेश्वर भांड विष्णुपंत डावरे दिपकसा क्षत्रियआदि उपस्थित होते

शिर्डी। जितेश लोकचंदानी ।निवासी संपादक।  सध्या देशात कोरोना मुळे मोठे संकट निर्माण झाले असून महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे, देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात झाले आहेत, त्यामुळे राज्यात  मोठी आपत्कालीन परिस्थिती  निर्माण झाली आहे  ,राज्यात सध्या लॉक डाऊन सुरू आहे ,अशा लॉक डाऊनच्या आपत्कालीन काळात राज्यातील आमजनतेला कोणतीही अडचण भासू नये किंवा काही अडचण असल्यास शासनाला किंवा त्या खात्याशी संबंधित मंत्री सचिव यांच्याशी संपर्क करता यावा म्हणून शासनाने सर्व मंत्री व सर्व जिल्ह्याचे पालक मंत्री व  मुख्य सचिव यांचे मोबाईल नंबर जनसामान्यांसाठी दिले असून सर्वसामान्यांनी जर आरोग्याविषयी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाचे हप्ते भरण्याविषयी तसेच नियमित धान्यपुरवठा होण्यासंदर्भात काही अडचणी असल्याबाबत त्वरित खाली दिलेल्या त्या-त्या विभागातील मंत्री, पालकमंत्री सचिव यांच्याशी संपर्क साधावा, अशा आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही अडचण असल्यास आम जनतेने शासना पर्यंत आपले प्रश्न, समस्या या मंत्री,  अधिकारी यांच्या नंबरवर संपर्क  साधावा, त्यामुळे शासनाला अशा अडचणी ,प्रश्न सोडवण्यासाठी त्वरित निर्णय घेता येतील, तसेच प्रत्येकाने कोरेनाचा संसर्ग टाळण्यासाठी व या कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी आपापल्या घरातच या लॉकडाऊनच्या काळात राहून सहकार्य करणे गरजेचे आहे, प्रत्येकाने दक्षता घेऊन व लॉक डाऊन चे नियम पाळून शासनाला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे, हे शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लवकरच या आपत्कालीन परिस्थितीतून आपण बाहेर निघू असा विश्वास राज्य शासना द्वारे देण्यात आला आहे व एका पत्रकाद्वारे जातील आम जनतेसाठी  सर्व पालकमंत्र्यांचे मोबाईल नंबर अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासनाने खुले केले आहेत, त्याचा अवश्य व गरजू व्यक्तींनी लाभ घेऊन अडचणी च्या काळात हहसरकारकडे आपले गाऱ्हाणे मांडणे व त्या सोडून घेण्यासाठी प्रयत्न करावा, असे
  फोन नंबर व मंत्री व पालकमंत्री यांची नावे पुढील  प्रमाणे आहेत,
राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांचा लँडलाईन नंबर।022_26590077,022_26590066 असा असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मोबाईल नंबर 985 0051222असा आहे, तसेच शेतकऱ्यांना कर्ज हप्ते भरण्यासाठी काही अडचण आल्यास सहकार विभागाचे ,सचिव श्रीमती आभा शुक्ला यांचा मोबाईल नंबर 9910010807 असा आहे, तसेच अन्नधान्य पुरवठा संबंधी काही अडचण असल्यास अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव श्री महेश पाठक यांचा मोबाईल नंबर 93 23 78 7007  असा त्याचप्रमाणे आरोग्य संदर्भात आम जनतेला काही अडचण असल्यास त्यांनी शासनाशी संपर्क करण्यासाठीh सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव श्री व्यास यांच्याशी9870505956यावर संपर्क साधावा ,त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री यांचे नावे व फोन नंबर पुढील प्रमाणे आहेत,नामदार अजित पवार पुणे(९८५००५१२२२) नामदार असलम शेख मुंबई शहर (९८९२९१५५५७)नामदार आदित्य ठाकरे मुंबई उपनगर(९८२१३५६५२९) आमदार एकनाथ शिंदे ठाणा(९८२०९७५७७९),नामदार अदिती तटकरे रायगड(९८३३१२५३२३) ना,अनिल परब रत्नागिरी(९८२०४१३५०५) नामदार उदय|सामंत सिंधुदुर्ग(९८६०३९०९०९)नामदार दादाजी भुसे पालघर(९४२२०७०५९३) नामदार छगन भुजबळ नाशिक(९९३०३३९९९९) नामदार अब्दुल सत्तार धुळे(९९२२०४३६७) आमदार के सी पाडवी नंदुरबार(९८६९२०३०६०)नामदार गुलाब पाटील जळगाव(९४२२७५८४४)
 नामदार हसन मुश्रीफ अहमदनगर(९८१२४१९४६२) नामदार बाळासाहेब पाटील सातारा(९८२२०५०४४४)ना, जयंत पाटील सांगलीB (९८२१२२२२२८)ना,दिलीप वळसे-पाटील(९८२०२२३९२३) ना,बाळासाहेब थोरात कोल्हापूर(९८५०५५२७७७ ना,सुभाष देसाई औरंगाबाद(९८२१०३७०४०)ना,राजेश टोपे जालना (९६१९१११७७७)नवाब मलिक परभणी (९८६७३५५०१४)श्रीमती वर्षा गायकवाड (७७३८२२३३४५)ना,धनंजय मुंडे(९८५०७७७७७७) ना,अशोक चव्हाण नांदेड (९८१९३२४९९९)ना,शंकराव गडाख उस्मानाबाद (९८२२४३७९९९ना,)अमित देशमुख लातूर (९८२१४७७७७७)यशोमती ठाकूर अमरावती (७७४५०८११११)बच्चू कडू अकोला(९८९०१५३४९१) शंभूराजे देसाई वाशिम (९८२२७७१५५५)ना,राजेंद्र शिंगणे बुलढाणा (९९२११२९६६९)ना, संजय राठोड यवतमाळ (९७६५५९४१११)नितीन राऊत नागपूर (९४२२१०२४३४)सुनील केदार वर्धा( (९४२२१०८३६०)सतीश पाटील भंडारा (९८२३०१२९०५)ना,अनिल देशमुख गोंदिया (९८६९०१०४००)ना,विजय वडेट्टीवार चंद्रपूर(९६६५६९९९९९)ना, जितेंद्र आव्हाड सोलापूर९८२००५५३००)आदी पालकमंत्र्यांचे वरील नंबर असून योग्य व महत्वाचे समस्‍या निर्माण झाली तर आपण या नंबरवर थेट संपर्क करून पालकमंत्री किंवा शासनाकडे आपली अडचण मांडू शकतो, मात्र उगाच किरकोळ अडचणी संदर्भात या संकट समयी पालकमंत्री किंवा शासकीय अधिकाऱ्यांचा वेळ घेऊन टाइमपास करणे योग्य नाही, तरी त्याचीही सर्व आम जनतेने काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

शिर्डी प्रतिनिधि - दि.7: कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा प्रशासन करीत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांनी या लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नये. सार्वजनिक संपर्क टाळावा. सर्व नागरिकांनी हे नियम पाळले, तर ही परिस्थिती बदलेल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यात एकूण 25 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील एक युवक हा पुणे येथे ससून हॉस्पिटल येथे आयसोलेशन कक्षात भरती असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्या घशातील स्त्रावही तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत म्याकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
            यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील आतापर्यंत ७६० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी जिल्हा सामान्य रुग्णालयातून पाठविलेल्या पैकी २४ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले तर श्रीरा्मपूर येथील युवकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तो पुणे येथील ससून रुग्णालयात भरती आहे. बाधित रुग्णांपैकी ११ जण नगर (परदेशी रुग्णांसह), जामखेड ०६ (परदेशी रुग्णासह), संगमनेर ०४, राहाता-०१, नेवासा- ०२ आणि श्रीरामपूर ०१येथील आहेत. या बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. काल रात्रीपर्यंत ८४ व्यक्तींचे घशातील स्त्राव पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तर ६१ व्यक्तींचे स्त्राव घेण्यात आले असून ते आज पाठविण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
            जिल्हा यंत्रणेने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, कोरोनाची संख्या वाढली तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे सध्या औषधी साठा आहे. जास्त संख्येने पीपीई कीट मिळण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलणे झाल्याचे ते म्हणाले.
            कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने जिल्हा बंदी जाहीर केली. त्यामुळे बाहेरील स्थलांतरित, मजूर यांची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. प्रशासनाने आणि खासगी आस्थापनांनी सुरु केलेल्या २९ निवारा केंद्रातून २ हजार नागरिकांची व्यवस्था केली असून तेथे त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच. नियमितपणे त्यांची आरोग्य तपासणी होत असल्याचेही ते म्हणाले. त्यांना मानसिक आधार दिला जात असल्याचेही ते म्हणाले.

शिर्डी, दि.07-संगमनेर तालुक्यातील 32 संशयीत व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी सामान्य रुग्णालय,अहमदनगर येथे पाठविण्यात आले होते. राष्ट्रीय विषाणु संस्था,पुणे येथून त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून या 32 व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येऊन त्यांना अधिग्रहीत केलेल्या इस्तितळात ठेवण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार कंटेनमेंट प्लॅन लागू करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली असून यासाठी संगमनेर येथे 13 पथके तर आश्वी बुद्रुक येथे 6 पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

            लॉकडाऊन काळात संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच संगमनेर शहर व परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, संगमनेर यांनी प्रतिबंधाचे आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी तसेच दुपारी 12 ते 3 या वेळेत जीवनावश्यक वस्तू पायी चालत जाऊन खरेदी कराव्यात, उपद्रवशील व्यक्तींमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन असे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार, संगमनेर अमोल निकम यांनी केले आहे.

शिर्डी । ।राजकुमार गडकरी।।   कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन च्या काळात  आलेली  श्री हनुमान जयंती शिर्डी  परिसरात साध्या पद्धतीने व घराघरात श्री हनुमान चालीसा वाचून साजरी करण्यात आली,व कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांना शक्ती मिळो, अशी श्री हनुमान चरणी प्रार्थना करण्यात आली, देशात  सर्वत्र कोराेनाने हाहाकार उडाला असून महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे सर्वत्र लॉक डाऊनआहे, शिर्डी व परिसरातही लॉक डाऊन मुळे सर्व बंद आहे, अशा काळात हनुमान जयंती आज  आल्याने येथे  दरवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात गर्दी करून व विविध कार्यक्रम घेऊन हनुमान जयंती साजरी न करता श्री साई सेवा समितीच्या वतीने रावसाहेब एखंडे,  रवी कापसे,यांनी करण्यात आलेल्या आवाहनानुसार सावळीविहीर येथे अनेकांनी आप आपल्या घरातच राहून श्री हनुमान चालीसाचे वाचन करत श्री हनुमान जयंती साजरी  केली, व श्री हनुमान चरणी ,कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आम्हाला शक्ती मिळू दे ।अशी मनोमन प्रार्थना करण्यात आली,  तसेच सावळीविहीर येथील श्री हनुमान मंदिरात सौ बेबीताई सोनवणे, मनोज बिडवे, पत्रकार राजेंद्र गडकरी, सौ, वैशाली जपे ,यांनी लॉक डाऊन चे नियम व दक्षता पाळत मंदिरात पाळणा बांधून त्यात श्री हनुमानाची प्रतिमा ठेवून आज सूर्यदया च्या वेळेस हनुमान जन्मोत्सव प्रथा व परंपरेने परंतु गर्दी न करता मोजक्या दोन-तीन लोकांच्या उपस्थितीत साजरा केला, हनुमान जयंतीनिमित्त श्री हनुमान मंदिरा ला आंब्याच्या पानाचे तोरण व पुष्पहार माळा लावण्यात आल्या होत्या, यावेळी कोणत्याही आकर्षक विद्युत रोषणाई व दरवर्षाप्रमाणे  मोठी सजावट करण्यात आली नव्हती, साध्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला, शिर्डीत श्री हनुमान जयंती निमित्त श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिरात  गर्दी न करता साध्या पद्धतीने  जन्मोत्सव साजरा करण्यात आला, दरवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम यावर्षी लॉक डाऊनमुळे करण्यात आले नाहीत,तसेच शिर्डी परिसरातील निमगाव ,निघोज, रुई ,कोहकी, पिंपळवाडी, नांदुर्खी अशा प्रत्येक गावात साध्या पद्धतीने श्री हनुमान जयंती यावर्षी साजरी करण्यात आली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget