
बेलापूर (प्रतिनिधी )-लाँक डाऊन असातानाही बेलापूर झेंडा चौकात भाजीपाला घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडायची अनेक वेळा सांगुन देखील काहीच फरक न पडणार्या लोकांना बेलापूर पोलीसांनी चांगलाच हिसका दाखविला अन काही मिनिटातच गर्दी सामसुम झाली कोरोना पसरु नये म्हणून सर्वत्र उपाय योजना चालु आसताना गावात मात्र दररोज सकाळी झेंडा चौक परीसरात बाजार भरत होता अनेक जण कारण नसताना तेथे गर्दी करत होते या बाबत बेलापूर पोलीसांनी अनेक वेळा
 |
दररोज भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी आज पोलीसांच्या कारवाई नंतर मोकळा झालेला चौक |
सुचना केल्या विंनत्या केल्या परंतु लोक तात्पुरते दुर जात व पोलीस निघुन जाताच पुन्हा बाजार भरत असे कोरोना पसरु नये म्हणून संयम नियम पाळणे आवश्यक असताना सर्व नियम धाब्यावर बसवुन बिन दिक्कत खरेदी विक्री चालायची अखेर बेलापूरातील कार्यकर्ते प्रकाश जाजु यांनी या बाबत मा प्रांताधिकारी अनिल पवार यांना दुरध्वनी करुन कळविले प्रांताधिकारी पवार साहेबांनी तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना सुचना केली अन उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल मदने यांनी बेलापूर पोलीसांना गर्दी हाटविण्या बाबत सुचना केल्या त्या सुचने नुसार आज साकाळी नेहमी प्रमाणे भाजी विक्रेते व खरेदीदार यांची गर्दी झाली अन पोलीसांनी आक्रमक पावित्रा घेतला अनेक मोटार सायकलीच्या हवा सोडून देण्यात आल्या काही गाड्याचे ईंडीकेटर फोडण्यात आले काहींना लाठीचा प्रसादही मिळाला अन काही मिनिटातच हा परिसर सामसुम झाला पोलीसांनी अशीच भुमिका ठेवावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
Post a Comment