प्रांताधिकारी पवार यांच्या अवाहनाला बेलापूरात प्रतिसाद वीस कुटुंबांना मदत.

बेलापूर  (प्रतिनिधी  )प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अवाहना नुसार बेलापूरात वीस अति गरीब कुटुंबाना किराणा व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले -             प्रत्येकाने आपापल्या ईच्छेप्रमाणे गावातील गरीब कुटुंबांना मदत करावी असे अवाहन प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार पाटील यांनी केले होते  त्याच्या अवाहनाला प्रतिसाद देत  महावितरणचे चेतन जाधव मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी व पत्रकार देविदास देसाई यांच्या सहयोगातुन २० कुटुंबांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप सरपंच राधाताई बोंबले पोलीस नाईक गणेश भिंगारदे बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांच्या हस्ते करण्यात आले  मंडलाधीकारी बाबासाहेब गोसावी यांनी गावातील पाच गरीब कुटुंबांना मोफत किराणा देण्याचा निर्णय घेतला ही बाब महावितरणचे कर्मचारी चेतन जाधव यांना समजताच त्यांनी गरीब कुटुंबाकरीता पाच हजार रुपयांचा किराणा दिला पत्रकार देविदास देसाई यांनी देखील या उपक्रमात सहभाग नोदविला मंडलाधिकारी गोसावी महावितरणचे कर्मचारी चेतन जाधव पत्रकार देविदास देसाई यांच्या सहकार्यातुन वीस  गरीब कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंचे व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले या वेळी मिलींद दुधाळ पाणी पुरवठा समीतीचे उपाध्यक्ष मनोज श्रीगोड  दिलीप दायमा मनोज क्षिरसागर ज्ञानेश्वर भांड विष्णुपंत डावरे दिपकसा क्षत्रियआदि उपस्थित होते
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget